तुफानी वादळात मिणमिणता दिवा !...........

Submitted by Mandar Katre on 22 September, 2012 - 13:12

6. Hindu Monument in umerkot.jpg

जिहादी,आतंकी ,माथेफिरू पाकिस्तान मध्ये चक्क हिंदू बहुसंख्य असलेली शहरे!!!!!!!!!
होय! विश्वास बसणार नाही,पण असंख्य हाल-अपेष्टा आणि दू:ख /तिरस्कार झेलून सुद्धा आज फाळणीनंतर ६५ वर्षांनीही पाकिस्तानात हिंदूबहुल शहरे आहेत!!!

उमरकोट ,संघर,मिरपूर खास,थरपरकार ,हैदराबाद,कराची ,जाकोबाबाद आणि इतर सुमारे ५० लहान-मोठ्या पाकिस्तानी शहरात अजूनही हिंदू आपला धर्म आणि संस्कृती जपत आहेत ! यापैकी काही शहरात तर हिंदूंची संख्या ४० ते ५० % पर्यंत सुद्धा आहे ! तरीही चहूबाजूनी जिहादी इस्लामचे आणि जबरदस्तीने धर्मांतराचे भयं या हिंदुना सतत जाणवत असतेच! नुकत्याच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील हिंदू मुलींना जबरदस्तीने धर्मांतर करावयास लावणे, जबरदस्तीने मुस्लीम तरुणाशी निकाह लावणे इत्यादी प्रकार सृच आहेत

या थोर जिद्दीच्या माझ्या हिंदू बांधवाना सलाम!!!!!!! त्यांच्याकडून आपण भारत-वासीयांनी शिकण्यासारखे खूप काही आहे ,प्रश्न असं आहे की ते मायभूमी म्हणून आपल्याकडे आशेने पाहत असताना आपण त्यांच्यासाठी काय करणार ?

संदर्भ-विकिपीडिया ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! हो का?
मला वाटत होतं की अत्तापर्यंत सब की सुन्नत हो जाती थी.. व्हाट विथ लव्ह जिहाद अँड स्टफ..

मला वाटते कि या हिन्दु लोकान्ची अवस्था फारच कथिन असुन त्यन्ना जबरदस्तीने मुसलमान बनवण्यासाथि खुप त्रास दिला जातो.
तरिहि इत्के लोक हिन्दु अजुनहि तिक्दे अहेत हे वाचुन बरे वातले.

प्रश्न हा आहे कि ते मायभूमी म्हणून आपल्याकडे पाहत असताना आपण त्यांच्यासाठी काय करणार?

पाकिस्तानच्या हिंदुंची भारत ही मायभूमी कशी होऊ शकते? बरं, कोणे एके काळी हिंदुस्तान ही मायभूमी होती, हाच बेस मानायचा झाला तर बांग्लादेशी मुसलमानानाही भारताकडे अपेक्षेने पहायचा अधिकार मिळायला नको का?

चर्च वाले मदत करतात कारण त्यांच्याकडे भक्कम आर्थिक पाठबळ आहे.जगभरातील ख्रिश्चन लोक दरवर्षी चर्च ला नियमित देणग्या देतात ,तसेच अनेक युरोपियन व अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या या आपल्या प्रचंड नफ्यातील ठराविक भाग चर्च ला दरवर्षी दान देतात, मग मानव-सेवेचे टुमणे पुढे करून जगभर पसरलेल्या या मिशनरीज ख्रिस्ती धर्म-प्रसाराचा आपला कुटील डाव अगदी बिन-दिक्कत सिद्धीस नेतात.
हिंदू धर्माचे तसे नाही .भारतात /इतरत्र मंदिरातून दक्षिनेच्या रूपात जो पैसा जमा होतो, त्यातील ३८% सरकारी तिजोरीत जातो व उर्वरित पैसा संस्थांची भक्तोपयोगी विकासकामे आणि सामाजिक कार्ये/हॉस्पिटल यासाठी खर्च होतो,त्यात पुन्हा भ्रष्टाचारी ट्रस्टी आणि त्यांचे काले धंदे निराळेच!
इतर बाबा-बुवा यांच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो, तो त्या बाबांची वैयक्तिक प्रोपर्टी असते. हिंदू धर्म-प्रसार किम्वा जागतिक स्तरावर हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला/धर्मांतराला रोखणारी यंत्रणा /किंवा त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आजतरी कुठेही अस्तित्वात नाही,हे वास्तव आहे!

उगाच दुगाण्या झाडू नयेत!

जागतिक स्तरावर हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला/धर्मांतराला रोखणारी यंत्रणा /किंवा त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ आजतरी कुठेही अस्तित्वात नाही,हे वास्तव आहे!

मीही हेच मत वेगळ्या शब्दात लिहिले आहे. बाय द वे, हिंदु धर्मात कुबेर, लक्ष्मी इ इ पैशा अडक्याच्या देव देवता आहेत, त्याना समजत नाही का? हिंदु समाजाची जितकी गरज आहे, तितका पैसा या देवानी तयार करायला नको? उपयोग काय मग त्यांचा?
Light 1

हिंदू धर्माचे तसे नाही .भारतात /इतरत्र मंदिरातून दक्षिनेच्या रूपात जो पैसा जमा होतो, त्यातील ३८% सरकारी तिजोरीत जातो व उर्वरित पैसा संस्थांची भक्तोपयोगी विकासकामे आणि सामाजिक कार्ये/हॉस्पिटल यासाठी खर्च होतो,त्यात पुन्हा भ्रष्टाचारी ट्रस्टी आणि त्यांचे काले धंदे निराळेच!
इतर बाबा-बुवा यांच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो, तो त्या बाबांची वैयक्तिक प्रोपर्टी असते.

वा!
संस्थांची सामाजिक कार्ये! रडू यायचंच बाकी आहे फक्त.
परवा परवापर्यंत शिर्डीतून आरपार जाणार्‍या गाड्यांकडूनही १०-१० रुपये करून 'ट्याक्स' घेणारी 'ग्रामपंचायती' गुंडगिरी किती लोकांनी अनुभवली आहे इथे? 'सामाजिक कार्यां'चं एकही धड उदाहरण देता येत नाही :-s

अन बाबा/बुवांचा वैयक्तिक पैसा कित्ती भारी!

३८% ट्याक्स Wink

बाबा बुवांना ट्याक्स लावावा अशी जोरदार मागणी मी इथे करतो. रामदेव बाबांच्या प्रॉपर्टीवरील ट्याक्स मधून किमान १०० प्राथमिक आरोग्य केंद्रे सुखेनैव चालतील. (११०० करोड 'डिक्लेअर' केली आहे म्हणे. नॉर्मली ४०% 'डिक्लेअर' करतात 'आपल्या'कडे. ११अब्ज रुपयांचे ३८% किती होतात हो?)