हल्ली

Submitted by श्रावण१८ on 20 September, 2012 - 10:09

झालेय माणसाचे जगणे महाग हल्ली
मोजून श्वास काही घेतो उधार हल्ली

गाळून घाम पडतो फुटका छदाम हाती
खातोय आंधळ्याचे कुत्राच पीठ हल्ली

पोटात भूख असता दाणा न एक खाया
मिळता बदाम नाही कवळीत दात हल्ली

विश्वासघात आहे भिनला नसांत त्यांच्या
बाहीत पाळलेले डसतात साप हल्ली

टाळून खेकड्यांना जा 'श्रावणा' पुढे तू
पाडी स्वकीय कोणी ओढून पाय हल्ली
@ 'श्रावण' ( शंकर पाटील) - २०/०९/२०१२
कोल्हापूर.
मो. ८०८७०१६०६९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रावण १८, मराठी गझलेत 'अ'कारान्त स्वरकाफिया न योजण्याचा संकेत पाळला जातो. रचनेतील दोन तीन ओळी आवडल्या. शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

झालेय माणसाचे जगणे महाग हल्ली
मोजून श्वास काही घेतो उधार हल्ली

गाळून घाम पडतो फुटका छदाम हाती
खातोय आंधळ्याचे कुत्राच पीठ हल्ली

विश्वासघात आहे भिनला नसांत त्यांच्या
बाहीत पाळलेले डसतात साप हल्ली

हे खयाल खूप आवडले.
सफाईदार वृत्त हाताळणी वाटली.

बेफिजींची सूचना समजून घ्यावी, ही विनंती.