मायबोलीची १६ वर्षे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १६ वर्षे पूर्ण केली (तारखेप्रमाणे १६ सप्टेंबर) आणि १७व्या वर्षात पदार्पण केले आहे. सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!
गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

मायबोलीची सुरुवात मराठी साहित्य, कविता यांसारख्या विषयांपासून सुरु झाली असली (आणि भविष्यातही तो एक महत्वाचा भाग राहणार आहे) तरी फक्त याच विषयांमधे ती अडकून पडू नये यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करतो आहोत. याच दृष्टीने मायबोलीवर वेगवेगळ्या विषयांचे ग्रूप आहेत ते ही लोकप्रिय झाले आहे. या वर्षीपासून मराठी वेबविश्वात पहिल्यांदाच, माध्यम प्रायोजकत्व हा नविन उपक्रम आपण सुरु केला. बातम्या.कॉम मायबोलीसमुहात सामील झाल्यामुळे मराठी बातम्याही एकत्रित वाचायची सोय आपण केली आहे.

मायबोली व्यतिरिक्त अनेक जागा आज आंतरजालावर मराठी वाचकाला उपलब्ध आहेत याची आम्हाला जाणीव आहे. आणि तरीही तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

मायबोली हा एक किंवा दोन खांबी तंबू नसावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. १ ऑगस्टपासून मायबोलीच्या व्यवस्थापन टीम मधे चिन्मय दामले (चिनूक्स) सामील झाले आहेत. त्यांचे अभिनंदन.

मायबोली.कॉम

गणेशोत्सव २०११:
(मामी) मीरा ताम्हाणे- यांच्या नेतृत्वाखाली , गणेशोत्सव समितीने २०११ चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला. मायबोली शीर्षक गीत स्पर्धा प्रमुख आकर्षण होते.

दिवाळी अंक २०११:
श्यामली (कामीनी केंभावी) यांच्या नेतृत्वाखाली आपण २०११ चा अंक प्रकाशित केला. अंकासाठी संकल्पना निवडताना बरेच विषय सुचले आणि शेवटी शिक्कामोर्तब झालं ते 'थांग-अथांग' या नात्यांवर आधारित संकल्पनेवर.मायबोलीकरांबरोबरच बाहेरुनही भरभरुन साहित्य आलं. काही घेता आलं, काही वेगवेगळ्या कारणांनी नाकारावं लागलं, याचा खेद आहेच! डॉ. नागनाथ कोतापल्ले सरांनी लिहिलेला 'विठ्ठल रामजी शिंदे' यांच्यावरचा संशोधनपर लेख आमच्या विनंतीवरून आम्हाला पाठवला. दिवाळी संवादांसाठी रंगमंच कलाकार ते चित्रपट कलाकार, कवी ते पटकथाकार, अशा बर्‍याच जणांचा विचार करता करता, 'निर्माण' च्या अमृत बंग यांच्या मुलाखतीची विचारणा आली. तोवर आम्ही, राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री 'मिताली जगताप-वराडकर' हिच्या मुलाखतीची देखील तयारी केली होती. तिसरी मुलाखत अगदी वेगळ्याच कारणासाठी काम करणार्‍या शरयू आणि नागेश घाडी या दांपत्याची मिळाली.

मायबोली शीर्षकगीतः
मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. जगभरातील पाच देशातील विविध शहरांमध्ये स्थायिक असलेले आणि वय वर्षे चार ते साठ या वयोगटातील असे २१ मायबोलीकर गायक, संगीतकार, संगीत संयोजक व वाद्यवृंद. मुंबई, पुणे, दुबई या शहरांतील स्टुडियोंमध्ये व ईंग्लंड, अमेरिका, कुवेतयेथिल मायबोलीकरांनी घरीच केलेले ध्वनिमुद्रण, अनेकविध वाद्यांचा वापर, तसेच आंतरजालावरील इमेल, वेबचॅट, स्काइप, सारख्या तत्सम तंत्रांच्या सहाय्याने या गीताच्या शब्द, सूर यांची झालेली देवाणघेवाण, सरावसत्रे, आणि शेवटी आंतरजालावरच (मायबोली.कॉम) या गीताचे होणारे प्रकाशन असे या शीर्षकगीताच्या विस्मयजनक वाटचालीचे व्यापक स्वरूप आहे. या अभिनव उपक्रमाचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल श्री. योगेश जोशी यांचे मनःपूर्वक आभार.

मायबोली माध्यम प्रायोजकः
मराठी चित्रपटांच्या जाहिराती व त्यांची माहिती सर्व प्रेक्षकांसमोर पोचत नाही अशी एक तक्रार नेहेमीच असायची, मायबोलीने यावर्षीपासून या क्षेत्रात प्रवेश केला असून आतापर्यंत देऊळ, पाऊलवाट, जन गण मन, हा भारत माझा, चींटू, चँपियन्स अश्या अनेक पारितोषीक विजेत्या चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व स्विकारले आहे. मराठी चित्रपटांमध्ये पडद्यावर मायबोलीचा लोगो झळकला. असा प्रयोग करणारे मायबोली हे पहिलेच संकेतस्थळ आहे.
सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ’हा भारत माझा’ या चित्रपटाचा खास खेळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), पुणे येथे मायबोलीकरांसाठी आयोजित केला आहे. या प्रसंगी दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर व चित्रपटातले कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित राहून मायबोलीकरांशी संवाद साधला. अनेक मान्यवरही या खेळाला उपस्थीत होते. हाउसफुल उपस्थीती दाखवून मायबोलीकरांनीही या उपक्रमाला पसंती दर्शवीली.

मदत समिती आणि स्वागत समिती:
सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

मराठी उद्योजक:
आतापर्यंत ग्रूपचे ११४ सभासद झाले आहेत. "उद्योजक तुमच्या भेटीला" या उपक्रमाअंतर्गत या वर्षी ५ मराठी उद्योजकांशी मायबोलीकरांना संवाद साधता आला. या ग्रूपचे पुण्यातले काही सभासद दर महिन्याला सातत्याने भेटू लागले आहेत.

संयुक्ता:
"संयुक्ता" चं हे तिसरं वर्ष. महिला सदस्यांसाठी असलेल्या या विशेष ग्रूपात अनेक माहितीपूर्ण विषयांवर चर्चा होत असतात. तसेच सेवाभावी संस्थाना संयुक्ता सदस्यांनी मोलाची मदत केलेली आहे. या उपक्रमाच्या व्यवस्थापनात भाग घेतलेल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार.

मराठी भाषा दिवस:
या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतुने सुरु केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षी संयुक्ता बाहेरच्या सदस्यांनीही उपक्रम संयोजनात भाग घेतला.

अक्षरवार्ता:
चिन्मय दामले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.

महिलादिन विशेषांकः
महिला दिन २०१२ निमित्ताने 'निरभ्र': लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री हा परिसंवाद विशेषांक प्रकाशीत केला गेला. 'संयुक्ता'तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने विशेष उपक्रम करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या विशेषांक संयोजनात संयुक्ताबाहेरील सदस्यही होते.

वर्षाविहार २०१२:
यावर्षीच्या वर्षाविहाराच्या जाहिराती नेहमीपेक्षा वेगळ्या होत्या. विशेष म्हणजे यात काही मायबोलीकरांनी मॉडेल म्हणून स्वतःचे फोटो वापरायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार.

यंदा वर्षाविहाराचे १०वे वर्ष होते आणि या मेळाव्याला अजय गल्लेवाले यांची उपस्थिती होती.

मायबोली गटगच्या ग्रूप फोटोचे जतनः
मायबोलीच्या गटग ना आता १६ वर्षांची परंपरा आहे. १० पेक्षा जास्त मायबोलीकर एकत्र जमलेल्या ग्रूपफोटोंचे जतन करण्याचा उपक्रम आपण या वर्षीपासून सुरु केला.

फेसबुकवर मायबोली:
फेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्कींग साईटवरती मायबोलीचं पान अगोदरच होतं. या वर्षात आपण तिथे विशेष लक्ष दिलं. आता फेसबुकवरच्या मायबोलीच्या चाहत्यांची संख्या २५,००० च्या वर गेली आहे. इतकंच नाही तर मायबोलीवरच्या कुठल्याही लेखनाला सहजच फेसबुकवर सांगता येईल अशी सोयही या वर्षापासून आपण केली आहे. याशिवाय मायबोलीवरचं निवडक विविध लेखन आपण मधुन मधुन तिथे प्रकाशित करत असतो. मायबोलीवरच्या लेखकांसाठी, फक्त मायबोलीवरचेच नाही तर मायबोलीबाहेरच्या वाचकांपर्यंत पोहोचण्याची ही संधी मायबोलीने उपलब्ध करून दिली आहे.

बातम्या.कॉम
१८ जुलै, २०१२ पासून बातम्या.कॉम या वेबसाईटचा मायबोली वेबसमुहामधे समावेश झाला आहे. बातम्या.कॉमच्या वाचकांचे आम्ही मायबोली परिवारात हार्दिक स्वागत करतो.

खरेदी विभाग

मायबोली पुस्तकखुणा:
मायबोलीवरच्या कविंच्या काही ओळी घेऊन आपण मायबोलीच्या पुस्तकखुणा तयार केल्या. या खरेदीच्या ग्राहकांना खरेदीबरोबर संग्राह्य भेट (Collectors Item) म्हणून दिल्या जातात.
या पुस्तकखुणांमुळे खरेदीच्या ग्राहकांना नवीन कवींची आणि त्यांच्या कवितेची ओळख होते.
या उपक्रमात भाग घेतलेल्या आणि त्यांच्या कविता वापरायची परवानगी दिल्याबद्द्ल या कवि/कवियत्रींचे आभारी आहोत: नीरजा पटवर्धन, श्यामली, बेफिकीर, मिल्या, पेशवा, जयवी

नवीन प्रकाशक/भागीदार (partners/providers)
या वर्षात चिन्ह प्रकाशन, कॉन्टीनेन्टल प्रकाशन, माधव जोशी, प्रशांत देगावकर, जय गणेश जोशी या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या. मायबोलीवर विक्रिसाठी वस्तू ठेवणारे भागिदार एकूण ३४ झाले आहेत.

खरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.


जाहिराती विभाग

जाहिराती विभागात या वर्षी "महिन्याची जाहिरात" हा उपक्रम सुरु केला. त्याला मायबोलीकरांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे.जाहिरात विभागाचे वेगळे फेसबुकपान ही सुरु केले त्याला आता पर्यंत २०००+ चाहते मिळाले आहेत.

कानोकानी.कॉम
या विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.


इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे

या शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात.

मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

-----------------------------------------------------------------------------
विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः

मदत समिती: रुनी पॉटर, नंद्या, मंजूडी

मराठी उद्योजकः
मिलिंद माईणकर (भ्रमर), दीपक कुलकर्णी (डुआय),मयूरेश कंटक (मयूरेश),गोविंद सोवळे (जीएस), अल्पना खंदारे (अल्पना),अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी),नवीन केळकर (शुभंकरोति), अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई), रूपाली महाजन(रूनी पॉटर),अजय गल्लेवाले (अजय), भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के), समीर सरवटे (समीर), वैशाली कालेकर (आशि), भारत करडक (चंपक), कामिनी फडणिस केंभावी (श्यामली),अदिती हिरणवार (punawa),निलेश डोंगरे (चंबू), निनाद कट्यारे (निनाद)

गणेशोत्सव २०११ - मामी-(मीरा ताम्हाणे) , प्रज्ञा रायकर-कुलकर्णी (प्रज्ञा९), लाजो, प्रमोद देव, नयनीश वैद्य (वैद्यबुवा), दिव्या

दिवाळी अंक २०११
कामिनी फडणीस-केंभावी(श्यामली), अभिजीत धर्माधिकारी (बित्तुबंगा), नचिकेत जोशी (आनंदयात्री), अश्विनी शेवडे (सशल) , सतीश माढेकर (मास्तुरे), अल्पना खंदारे (अल्पना), अंजली भस्मे (अंजली), सीमा पाटील (सीमा), अज्ञात

मायबोली शीर्षकगीत:
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)
गायकः
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई(अनिता आठवले), प्रमोद देव, भुंगा (मिलींद पाध्ये), सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका टेंबे (सौ. योग), दिया जोशी (योग व सारिका ची मुलगी), योग (योगेश जोशी), वर्षा नायर
कुवेतः जयवी-जयश्री अंबासकर
इंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा (जयवंत काकडे), अनिलभाई (अनिल सांगोडकर)
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योग
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनिमुद्रण तंत्रज्ञः
नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.
जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.
संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.
मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.
मायबोली विभाग समन्वयकः दक्षिणा (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिलभाई (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR) निर्मिती: maayboli.inc

संयुक्ता व्यवस्थापनः
विद्द्युलता महाबळ (anudon), अरुंधती कुलकर्णी, नानबा, अगो, मृदुला, सुनिधी, मामी, अमृता, सिंडरेला

मराठी दिवस २०१२:
आशूडी, बी, बिल्वा, डॅफोडिल्स, अमर बागुल, UlhasBhide, रैना

महिला दिन २०१२ (लिंगनिरपेक्ष(जेण्डरलेस) मैत्री परिसंवाद ):
नीधप, नानबा, नादखुळा, अगो, सानी, पराग, स्वाती२

वर्षाविहार २०१२
विनय भिडे, मयूरेश , anandmaitri, MallinathK, आगाऊ, नील.प्रणव कवळे, सामी, हिम्सकूल, anandsuju, कविन, निंबुडा, मधुरा भिडे, मनिमाऊ, श्यामली, स्मितागद्रे

माध्यम प्रायोजकः
मंजूडी, श्रद्धा, पौर्णिमा, ऋयाम, फारएन्ड, अनिशा, अरभाट, रंगासेठ, rar, कांदापोहे, महागुरू, कैवल्य, शैलजा, हिम्सकूल, अरुंधती कुलकर्णी, पराग, दक्षिणा, बिल्वा, अवल, सशल, मृण्मयी, अमृतवल्ली, पूर्वा

'हा भारत माझा' विशेष खेळः
चारूदत्त, दक्षिणा, पौर्णिमा, रंगासेठ, कांदापोहे, ऋयाम, अतुल, फारेंड, अवल, मंजिरी सोमण, स्वाती, निलेश (NDA), रुमा, अरभाट, चिनूक्स

***
एखादे नाव नजरचुकीने राहून गेले असेल तर क्षमस्व.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!

मायबोली दिवसेंदिवस अशीच बहरत जावो म्हणून खूप खूप शुभेच्छा!>>>>>अनिताताई +१ Happy

या वर्षात खूपच घडामोडी व दैदिप्यमान कामगिरी केली मायबोलीने!!
अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाओ!!
Happy

एक मुंबईकर या नात्याने; आनंदाच्या, उत्साहाच्या, प्रोत्साहनाच्या प्रसंगी हमखास, एकसुरात दिली जाणारी घोषणा ध्यावीशी वाटतेय...

आज तो मौका भी है, और दस्तुर भी...

गणपती बाप्पा मोरया!

छान

मायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा !
सशल, Lol तारुण्यात पदार्पण करताना मायबोलीत बरेच हवेहवेसे बदल होतायत! Happy

प्रिय 'टिनेजर' मायबोलीला वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा. अशीच भरभराट होत राहो.
>>१६ वर्षे पूर्ण म्हणजे तारुण्यात पदार्पण!>> मग मायबोलीचा लोगो हिरव्या रंगाचा करायला हरकत नाही Wink

मायबोली आणि सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा

१६ वे संपले.....तर मग..यंदा १० वी ची परिक्षा .....जोमाने अभ्यास करा......बोर्डात नंबर आला पाहिजे.....बोर्ड फाटलाच पाहीजे.. Wink
.
.
.
शुभेच्छा........:)

Pages