अनुभव ..

Submitted by vrishali gotkhi... on 19 September, 2012 - 01:32

सुटी नंतरचा ..दिवस
बँकेत तुफान गर्दी ..अगदी मान वर करायला सुध्धा वेळ नाही ..
माझ्यापुढे चौकशी साठी ही भली मोठी लाईन ..
न् थांबता हसत मुखाने उत्तर देण्याचा माझा चाललें ला प्रयत्न ,
तेवढ्यात चहा वाल्याचे आगमन ...
आता एक पाच मिनिटे तरी मिळेल उठायला ..माझे एक आश्वासन स्वताच्या च मनाला !!
तरीपण परत मी पुढील कामात ‘गर्क..च .
पाच दहा मिनिटात अचानक .एक गोड गोंडस चार पांच वर्षाची बाल मूर्ती
सगळ्या लोकांना बाजूला सारून .माझ्या टेबलापाशी येते ..
“..काकी काकी ,.तुम्ही चहा नाही घेतलात ??उठा ना तो चहावाला..तुम्हाला बोलावतोय पहा “
त्याचे आग्रहाने मला ..सांगणे ..
त्याचे “निरागस रूपडे “..आणी बोलण्यातले “आर्जव “..पाहून मी अगदी “थक्क होते ..
“अरे हे पहा उठते रे ..चहा साठी “
असे म्हणून मी मनोमन त्या गोंडस बाळाचे आभार मानते ..
“ए ..ये ना इकडे ..नाव काय तुझे ..हे घे चोकलेट ‘”..
असे ..म्हणून मी पर्स मधले चोकलेट त्याच्या हातात ठेवते ..
छोटू ..अगदी खुष होवून जातो ...
“मला ना माझी ममी ..”पंकज “..म्हणते ..
असे म्हणून स्वारी चोकलेट हस्तगत करून ...पार पसार होते ..
मनात विचार येतो ..खरेच मी चहा घेतला का नाही याची चौकशी
तर ..माझ्या कुठल्या सहकार्याने ..पण नाही केली ..
आणी ..याला पहा माझी कीती काळजी ..!!
खरेच बालपण कीती निरागस आणी ..निर्मळ असते ना ..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy