Submitted by भारती.. on 19 September, 2012 - 01:31
येती पाहुणे गणेश ..
चित्तचैतन्याच्या गावी येती पाहुणे गणेश
प्रज्ञाप्रतिभेचे नवे फुलवण्यास उन्मेष
गेले आषाढ श्रावण चिंब ओले भाव-ऋतु
आला भद्र भाद्रपद परिपक्व झाले हेतु
निळ्या करुणेचे पाणी स्वच्छ वाहे झुळझुळा
हिरव्यापोपटी हर्षांना येई झाक सोनसळा
आशयांची जलाशये तुडुंबली सर्वदूर
त्यात डोलती कमळे अभिव्यक्तीची सुंदर
ऋद्धी सिद्धींची समृद्धी ओथंबली जनी-मनी
पुष्टी-तुष्टी सृष्टीचीही ओसंडली वनी -वनी
मंद पाझरे प्रकाश पूर्णावल्या जाणिवेचा
- घेई लपवून मुख चंद्र मनोव्यापारांचा
चित्तचैतन्याच्या गावी होता देव-आगमन
उल्हासाची लगबग, उत्साहाची उधळण ..
भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!मंगल
गणपती बाप्पा मोरया!मंगल मुर्ती मोरया!!
रचना छानच जमली फक्त आशयांची
रचना छानच जमली
फक्त
आशयांची जलाशये तुडुंबली सर्वदूर
त्यात डोलती कमळे अभिव्यक्तीची सुंदर (सुंदर खटकले) अर्थात यमक जुळत नसल्याने. त्या सुंदर ऐवजी सुदूर वापरले तर छान वाटेल. वै.म.
छान..... अगदी भावपूर्ण कविता.
छान..... अगदी भावपूर्ण कविता.
कविता आवडली.
कविता आवडली.
खूप आभार
खूप आभार विभाग्रज,मुक्तेश्वरजी,उल्हासजी, ज्यो..
मुक्तेश्वरजी, सुदूर अन सर्वदूर एकच अर्थ, जवळचाच शब्द आहे म्हणून पुनरुक्तीदोषाने नको वाटतोय.
'सुंदर' चं यमक पर्फेक्ट नाहीय्,पण फारसं खटकतही नाहीय मला गुणगुणताना, म्हणून तोच शब्द ठेवतेय. :)) तरीपण आस्थेने केलेल्या सूचनेसाठी धन्स.
फारच सुरेख रचना.......
फारच सुरेख रचना.......
वा मस्तच सुन्दर हे यमक मला
वा मस्तच
सुन्दर हे यमक मला नाही खटकले .अन तो शब्द बदलूनये अस्सा पर्फेक्ट झालाय असे मला मनापासून वाटते आहे
धन्यवाद
व्वा! भारतीतै सुरेख रचना!
व्वा! भारतीतै सुरेख रचना! आवडलीच
खूपच छान भावना उमट्तेय,
खूपच छान भावना उमट्तेय, भारतीताई
सुंदर रचना!
खूप धन्स शशांकजी,अंजली,विनीता
खूप धन्स शशांकजी,अंजली,विनीता वैभव ..
वैभव तुम्हाला कळले मला लिहिताना कसं वाटलं ते. होय, सुंदर या साध्यासुध्या शब्दातच ते सौंदर्य जाणवतंय.
किती सुरेख वर्णन ऋतूंचे आणि
किती सुरेख वर्णन ऋतूंचे आणि त्यांना पावित्र्य देणार्या श्रीं च्या सृजन कृपेचे! हे प्रसन्न, चैतन्यमय काव्य खूप आवडले, भारतीताई.
आवडली
आवडली
धन्स अमेलिया विक्रांत. हे
धन्स अमेलिया विक्रांत. हे रूपक समजून घेतल्याबद्दल.. हा सण अंतर्यामीचा..