तुझी नजर अलीकडे भिडस्त वाटते मला! (तरही)

Submitted by सतीश देवपूरकर on 18 September, 2012 - 12:53

कविवर्य श्री. भूषण कटककर यांनी एक अलौकिक ओळ तरहीसाठी
दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे व त्यांचा आभारी आहे.
सुप्रसिद्ध गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड यांनी तरही गझलेचा धागा सुरू केल्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे!
या उपक्रमांतर्गत या तरही गझललेखनातील हा माझा विनम्र सहभाग!
गोड मानून घ्यावे, ही समस्त सहृदयी मायबोलीकरांना माझी नम्र विनंती!
>..............प्रा.सतीश देवपूरकर

गझल(तरही)
तुझी नजर अलीकडे भिडस्त वाटते मला!
(तुला दुरून भेटणे, प्रशस्त वाटते मला!!)

कशास मी नटू, थटू? गबाळ मी असा बरा!
सुटाबुटामधेच, भारग्रस्त वाटते मला!!

असाच ऎसपैस मी, जगेन सर्व जिंदगी!
असेच राहण्यात, भारदस्त वाटते मला!!

विवाद! वाद! अन् प्रवाद! सत्य कोण जाणते?
असत्य ते असत्य......वादग्रस्त वाटते मला!

जगास जागवू किती? बरेच रक्त आटले....
करू किती प्रयास मी? शिकस्त वाटते मला!

अनेक तोतये गझल लिहावयास लागले.....
नजीक येत चाललाय अस्त....वाटते मला!

न लक्ष मी दिले जरी कुणी असभ्य बोलले;
न बोललो कधी कुणास....त्रस्त वाटते मला!

तुझाच ध्यास लागतो! तुझेच स्वप्न पाहतो!
तुझ्यात दंग राहण्यात मस्त वाटते मला!!

विचारपूस आजही कुणी तरी करे म्हणे!
बघून एवढेच, तंदुर(रु)स्त वाटते मला!!

रसिक! तुझ्यामुळेच ही, जिवंत आज लेखणी!
तुझी उपस्थिती सुरेख गस्त वाटते मला!!

सुरेश भट रुचायला, पचायला समज हवी!
महागडे तुम्हास, तेच स्वस्त वाटते मला!!

रहायचो इथेच मी, जिथे उभ्या इमारती;
बघून या इमारतीच, ध्वस्त वाटते मला!

सुवर्ण शुद्ध वा असो रजत, झळाळतेच ते!
झळाळ पाहुनी समस्त जस्त वाटते मला!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी गझल तरही मुशायरा यात एक अट वाचली---

<<< तरही मिसरा मतले में इस्तेमाल न करें. >>>

असा नियम असतो का ?
कुणी जाणकार मार्गदर्शन करतील काय ?

अरविंदराव! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

तरही मुशाय-यासाठी, माझ्या महितीप्रमाणे मतल्यातलाच एक मिसरा दिलेला असतो, जो आपण उला (पहिला) वा सानी (दुसरा) मिसरा म्हणून जसाच्या तसा वापरायचा असतो. दिलेला मिसरा वाचल्यावर गझलचे वृत्त, काफिया व रदीफ लक्षात येतात.
म्हणजेच गझलेची जमीन समजते. काफियातील अलामत लक्षात येते. ही अलामत सांभाळून आपण वेगवेगळ्या काफियांचा वापर करून किमान ५ शेर लिहावेत अशी अपेक्षा असते.

तरही मुशाय-यांचा उद्देश काय असतो?
१)ही काही कुठली स्पर्धा नसते.

२)इथे कोण मोठा, कोण छोटा अशी तुलना अपेक्षित नसते.

३)तरही गझल लेखन एक गझल लेखनाचा सर्वांग, निकोप व्यायाम आहे असे मला वाटते!

४)मतल्यातील एक मिसरा दिल्यावर प्रत्येक शायर त्याच्या त्याच्या वकूबानुसार, प्रज्ञेनुसार, प्रतिभेनुसार, शैलीनुसार, पिंडानुसार, जीवनात आलेल्या भल्याबु-या प्रत्ययांनुसार, सौंदर्यबोधानुसार, कल्पकतेनुसार, चिंतनप्रक्रियेनुसार मतल्यातली उरलेली ओळ पुरी करतो जी, दिलेल्या ओळीशी बेमालूमपणे एकजीव होवून एक कामयाब मतला तयार होतो, ज्यात दिलेली ओळ कोणती व शायराने लिहिलेली दुसरी ओळ कोणती हे ठरवणे मुश्किल जावे. जणू एकाच शयराने तो मतला लिहिलेला आहे, असे ऎकणा-याला वाटावे! दोन्ही ओळीतले नाते हे एकदम घट्ट असावे.

५)अलामत सांभाळून आपण काफिये निवडायचे असतात व ते काफिये वापरून, त्याच वृत्तात आपले खयाल विविध शेरात सशक्तपणे अभिव्यक्त करायचे असतात!

६)इथे जर काफियेच मर्यादीत असतील, तर अनेकांच्या तरही गझलेत एकप्रकाराचेच काफिये येवू शकतात. तरीही, शायराची सोच व पोच आपणास पुढील शेरांवरून ध्यानात येते, व शायरांचे वेगळेपण लक्षात येते.

७)तरही मुशाय-यातून काय शिकायचे असते?.........ते हे की, एकच काफिया अनेक शायर कसे वापरतात? त्या काफियात, त्या रदीफात कोणते काव्य दडलेले आहे? विविध शायरांची विचार करण्याची त-हा, धाटणी कशी असते हे आपणास कळून येते.

८)अशा मुशय-यातून आपल्या चिंतनाला, आपल्या अभिव्यक्तीला, आपल्या कल्पकतेला एक नवी दिशा मिळते.

९)उर्दू शायर चांगल्या शेरांना मनापासून दाद देतात व एकमेकांच्या गझलांचा सखोल अभ्यास करततात, व माणूस कोण आहे हे विसरून, जिवाचे कान करून ते सर्व शेर सहृदयतेने ऎकतात, गुणगुणतात, व स्वच्छ मनाने त्याच्यावर चिंतन करतात.

१०)असे मुशायरे ऎकणे ही एक शायरांसाठी परवणीच असते. आपल्याच गझलेचा आपणच जणू इस्लाह करायला शिकतो.

११)श्रेष्ठ शायर कसे लिहितात, कसा विचार करतात, आपण अजून कोठे आहोत, याचा बोध आपणास होतो.

१२)काफियांत, शब्दांत कोणते काव्य दडलेले असते, ते कळू लागते.

अरविंदराव, माझी वैयक्तिक मते वर दिलेली आहेत!

मी स्वत: तरही गझलेकडे/मुशाय-यांकडे या दृष्टिकोनातून पहातो.
जे समजले ते इथे दिले आहे. धन्यवाद!
.............प्रा.सतीश देवपूरकर

भारग्रस्त हा काफिया मस्त!! (बट, तयार केलाय की शब्दकोशात आहे हा शब्द?)

जवळ्जवळ बाकीचे सर्व काफिये आधीच्या तरहींमध्ये येवून गेलेले असल्याने व तदनुषन्गे आलेले खयालही त्यात्या तरहीतील खयालान्शी मिळते जुळते असे वाटत असल्याने असेल कदाचित 'वॉव फॅक्टर' मला व्यक्तिशः कमी जाणवला (अर्थात कोणी तरहीत कोणता कफिया कसा वपरलाय हे पाहणे इस माय पर्सनल पॉइन्ट ऑफ इन्ट्रेस्ट).
...........त्यामुळे म्हणावेसे वाटते की काही शेराना पर्यायीचा फ्लेवर आलाय बरका

मतल्यातला कंस मस्त वापरला गेलाय आय लईक्ड इट

सुरेश भट... , गझल लिहिणारे तोतये ...., मुद्दाम खुन्नस काढून लिहिल्यासारखे झालेत

वादग्रस्त व त्रस्त मधे नेमका काय अर्थ अपेक्षित आहे ते समजले नाही ..........पॉसिटिव्ह की निगेटिव्ह असे!!

असो
तुमचा 'मस्त' चा शेर मी ; हा तर माझ्या विठ्ठलासाठीच आहे असे समजून वाचला ! फार फार आवडला !!

रसिक! तुझ्यामुळेच ही, जिवंत आज लेखणी!
तुझी उपस्थिती सुरेख गस्त वाटते मला!!>>>>>>>>>> ग्रेट शेर !! माझ्यासाठी हासिल-ए-गझलच !!!

इन टोटल गझल आपल्या लौकिकास साजेशी झालीये सर
खूप छान झालीये
वा वा मस्तच

तंदुर(रु)स्त वरून याद आली
कसे आहात सर ? तब्येतीला जपा ..........उद्या सकाळी मी आपणास फोन करणारच आहे म्हणा !!

काही शेर आवडले.
उदा : वादग्रस्त , शिकस्त , मस्त , ध्वस्त - हे शेर आवडले.

सुरेश भट रुचायला, पचायला समज हवी!
महागडे तुम्हास, तेच स्वस्त वाटते मला!!

हा शेर आजीबात आवडला नाही. दोन्ही ओळींचा परस्परांशी काडीचा समंध नाही. आता यात सुरेश भट महाग झाले कि स्वस्त ते तुम्हीच ठरावा.

वैवकु,

>> 'वॉव फॅक्टर' मला व्यक्तिशः कमी जाणवला <<

हेही म्हणतोस आणि

>> आपल्या लौकिकास साजेशी झालीये सर<<

हेही... हम्म्म्म्म..!!

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

तुझाच ध्यास लागतो! तुझेच स्वप्न पाहतो!
तुझ्यात दंग राहण्यात मस्त वाटते मला!!

हा शेर आवडला..

========================================================

गबाळ की गबाळा ? की दोन्ही ?

(ह्यावर एक प्रबंध अपेक्षित.)

....रसप....

जितू

'लौकिकास' चा कोणता अर्थ काढायचा यावर त्या वाक्याचा अर्थ अवलम्बून आहे !!

लौकिक बरा /वाईट असू शकतो असे माझे मत आहे .......

उदा:खालची वाक्ये मी बोलतोय असे समज
- माझा काहीच लौकिक नाही माबोवर .........!! (चान्गला अर्थ)
-माझा निराळाच लौकिक आहे माबोवर............!! (वाईट अर्थ)

आता मायबोलीवर देवसरान्चा काय लौकिक आहे ते तुला माहितचयना !! -मी लौकिक हा शब्द दोन्ही अर्थाने वापरतोय बरका रे !!!

सरान्ची एक चान्गली व एक वाइट्ट प्रतिमा आहे (उदा: एक ओरीजनल गझलकार अन् एक पर्यायी गझलकार) अशा दोन्हीही प्रतिमा सावरत सावरत योग्य बॅलन्स साधत ही रचना लिहिलिये त्यान्नी

आता त्यान्ची स्वप्रतिमा त्याना स्वतःला नेहमी सर्वोत्तम ,सर्वोत्कृष्ट वगैरे वगैरे वाटत असणार असे त्यान्च्या निदान प्रतिसादलेखनावरून तरी वाटते पण प्रत्यक्षात काय ते त्यानाच माहीत असणार ना
(असे मानून चालूया की माहीत असणार वगैरे, म्हणजे प्रत्येक माणूस स्वतः च्या "स्व" ला थोडाफार तरी ओळखतो असे गृहित धरल्यास!!)

असो ,देवपूरकर सर या विषयावर माझ्या हातून एखादा प्रबन्ध निबन्ध लिहून व्हायचा नाहीतर !
राहुदेच नै का!!

अरे मी आजकाल स्माईलीज मुद्दाम कमी वापरतो त्यांमुळे नेमके कुठे कोणत्या भावनेतून काय म्हटले आहे याचा अन्दाज मलाही बान्धता येत नाही कधी कधी Happy
असो

आपण नन्तर बोलू रे जितू यावर इथे उगाच गझलवाचकान्चे ट्राफिक अडून राहयचे नै तर !!

अनेक तोतये गझल लिहावयास लागले.....
नजीक येत चाललाय अस्त....वाटते मला!
<<< Lol Lol

तुझाच ध्यास लागतो! तुझेच स्वप्न पाहतो!
तुझ्यात दंग राहण्यात मस्त वाटते मला!!<< वा वा! तुझ्यात दंग राहण्यात मस्त वाटते मला - मस्तच ओळ

रहायचो इथेच मी, जिथे उभ्या इमारती;
बघून या इमारतीच, ध्वस्त वाटते मला!<<< व्वा

==============

वर बरीच चर्चा झालेली दिसत आहे, ती आता वाचू पाहतो

इथे महागडे व स्वस्त हे शब्द प्रतिमा म्हणून आले आहेत! मूल्य या अर्थाने नव्हे!
सुरेश भटांचे शेर तुमच्या भले डोक्यावरून जात असतील पण माझ्या मात्र थेट काळजात शिरतात असा भाव या शेरात अंतर्भूत आहे! पहिल्या ओळीत रुचायला(अभिरुची), पचायला (महसूस करायला) हे शब्द स्पष्ट निर्देश करतात महागडे व स्वस्त प्रतिमांचे अपेक्षित अर्थ!

पहिल्या ओळीत रुचायला(अभिरुची), पचायला (महसूस करायला) हे शब्द स्पष्ट निर्देश करतात <<<
ओके मान्य

महागडे तुम्हास, तेच स्वस्त वाटते मला!! >>> ह्याच्या वरुन मला वाटले की बाकीच्यांना सुरेश भट मौल्यवान वाटतात ते प्रोफेसरांना स्वस्त ( चीप ) वाटतात.

वर अर्थ दिला आहे
कविता ही प्रतिमांची भाषा असते, वक्रोक्ती असते !
अन्यथा सरळ आडवे गद्यच लिहावे ना गझलच कशाला हवी?