दरवर्षी प्रमाणे यंदाही हरीतालीका आली, जुन्या नव्या आठवणींना उजाळा देऊन, हरीतालीका महादेवाची वाळूची पिंड तयार करायची त्याला १६ प्रकारची १६ पाने फुले वहायची सोबत बेल कणिस, काकडी, केळ ठेवायचे वरून पेला काळा करुन त्यावर काडीने शंकराचे तिसरे नेत्र काढायचे, आणि मग त्यावर धोत्र्याचे पांढर मोठे फुल वहायचे. एवढे झाले की सायंकाळी फुलांनी परत व्यवस्थित सजवायचे आणि हळदि कुंकु करायचे. रात्री परत कहाणी वाचायची मग पुन्हा नदीवर वा विहीरीवर हे सर्व घेऊन जाऊन विसर्जीत करायचे. कणिस भाजुन काकडी केळ प्रसाद म्हणुन वाटायचे. असा हा कार्यक्रम.
महिलांचा असलातरी. यात आपल्या कुटूंबाला पर्याने नवर्याला दिर्घायु लाभते. शंकर प्रसन्न होतात. अशी आख्याकिका आहे. म्हणुनच पुजा जरी बाया करीत असल्या तरी पुरुषांना हळदी कूंकू सोडुन फुले पाने आणण्या पासुन ते महादेव सजवुन देणे, नदीवरून वाळू आणणे मग धोत्र्याचे फुल शोधायला पळणे , बिहाडे , ईतर सर्व विषक्त फ्ळे पाने आणणे अशी कामे करावी लागतातच.
तर काल ऑफीस मधे महीला सहकार्यानी आठवण करुन दिली उद्या हरीतालीका आहे. झाले मला आठवण आली की धोत्र्याचे फुल शोधायला पळावे लागणार. म्हणून ऑफीस सुटल्या बरोबर सरळ सेकंड गेअर मधे गाडी चालवत बाजुने आसलेल्या झाडीत धोत्र्याचे फुल शोधु लागलो. ८/१० दिवसा पुर्वी याच रस्त्यावर बरीच फुले दिसत होती आज मात्र १ ही दिसत नव्हते. नाईलाज झाला. बाकी सगळे विषक्त पळे विकणार्याची जागोजागी एवढी दुकाने होती की विचारायची सोय नाही. एका लाईनने कित्येक दुकाने. १ जण ओरडला घ्या साहेब १० रु. ला पुर्ण सामान. म्हटले धोत्र्याचे फुल आहे काय? तो नाही म्हणायला म्हटले मग काय फायदा. तसेच ८/१० दुकाने पालथी घातली शेवटी एका जवळ बारीक कळी होती . म्हटले दे ती. पण आता २ पाहीजे होती १ बायकोला आणि १ आईला पुन्हा २ रे दुकान तिथुन एक घेतली , तो पुडा तसाच आवरता घेतला म्हटले एवढेच बस. घरी पोहोचलो . ही म्हणते अहो बांगड्या आणायला जायचे आहे. म्हटले चहा कर मग जाऊ. चहा पिऊन निघालो. तर बाजारात पुन्हा हे गर्दी, कशी तरी दुकानातुन बांगड्याची खरेदी झाली. तस पोरगं ओरडेले बाबा गणपती पहायचा काय? म्हटले उद्या पाहु. आज आता खुप वेळ झाला. झाले हरीतालीकेचा दिवस उजाडला सारी शोभायमान मांडणी झाली. बायको विचारते अहो तुमच्यासाठी भेंडी रस्सा भाजी पोळी देते करुन, आम्हाला उपवास आहे. आणि हो संध्याकाळी लवकर या, महादेव सजवायला. मी ऑफीस मधे आलो . संध्याकीळी आता जेव्हा घरी जाईला तेव्हा तोडा जरी उशीर झाला तर ही आपली रुसणार. महादेव सजवायचा आहे ना? (पर्यायाने नवर्याचीच पुजा आहे ना)
धोत्र्याचे फुल
Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 18 September, 2012 - 02:40
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखाचा उद्देश कळला नाही. लेख
लेखाचा उद्देश कळला नाही. लेख आणि शिर्षक ह्यांचा काहीच ताळमेळ वाटत नाही.
+१
+१
+२
+२
???????????????????????
???????????????????????
सांगायचा उद्देश हा की ,
सांगायचा उद्देश हा की , हरीतालीकेला धोत्र्याचे फुल पाहीजे असते ते ईतर दिवशी दिसते पण हरीतलीकेला मोठा आटापिटा करुन प्राप्त करुन आणावे लागते.
सांगायचा उद्देश हा की ,
सांगायचा उद्देश हा की , हरीतालीकेला धोत्र्याचे फुल पाहीजे असते ते ईतर दिवशी दिसते पण हरीतलीकेला मोठा आटापिटा करुन प्राप्त करुन आणावे लागते.>>>
सहाजिक आहे ना!!! डीमांड सप्लाय थीयरी. जेंव्हा डीमांड असते तेंव्हा त्या वस्तूचा सप्लाय कमी असतो. हीच गोष्ट गणेश चतुर्थीला जास्वंदाच्या फुला बद्दल....
लेख अजुन रंगवता आला असता.
लेखाचा उद्देश बायकाना कसा
लेखाचा उद्देश बायकाना कसा कळणार ? आम्ही बिच्चारे नवरेच ते समझु शकतो.....