शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !

Submitted by रसप on 16 September, 2012 - 23:53

तुझ्या रंगात मैफल रंगवावी
मला माझ्या मनातुन दाद यावी

असे दे दु:ख देवा तू नशीले
सुखाची वासना माझी सुटावी !

कुणी थांबत कुणासाठीच नसते
तुला का वाटले की साद द्यावी ?

नभावर मालकी नाही कुणाची
जमीनीवर तरी रेषा असावी

मला म्हण मूर्ख वा वेडाखुळाही
शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !

असावा बंगला मोठा तिचाही
'जितू'च्या पातळीची ती दिसावी !

....रसप....
१६ सप्टेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/blog-post_17.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे दे दु:ख देवा तू नशीले
सुखाची वासना माझी सुटावी ! >> हे सुर्रेखच......

नभावर मालकी नाही कुणाची
जमीनीवर तरी रेषा असावी<< वा

असावा बंगला मोठा तिचाही
'जितू'च्या पातळीची ती दिसावी !<<< अरे वा? वेगळाच खयाल

पूर्ण गझल सहज्सुन्दर झालीय
आवडली

शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !>>>>>

या शिवी देण्यावरून मला दोन शेर आठवले

एकदा त्याला शिवी मी घातली
अन् जिभेला चावले कितिदातरी

मला तू माफ कर मित्रा शिवी मी घातली होती
विसरलो रे तुला आहे तशी आई मला आहे

धन्स रे जितू पुनःप्रत्ययाचा आनन्द दिल्याबद्दल !!

रणजित,
उत्तम गझल..

मतला छान..

असे दे दु:ख देवा तू नशीले
सुखाची वासना माझी सुटावी !
मस्त शेर...

नभावर मालकी नाही कुणाची
जमीनीवर तरी रेषा असावी
जबरी...अप्रतिम झाला आहे हा शेर..

मला म्हण मूर्ख वा वेडाखुळाही
शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !
हा शेर ही आवडला...
बाकी गझलही सुंदर आहे..
शुभेच्छा.

सर्वांचे खूप आभार !

बेफिजी,

बंगला म्हणजे तिचं मन असं एक रुपक पण साधायचा मी प्रयत्न केला आहे. Happy

असे दे दु:ख देवा तू नशीले
सुखाची वासना माझी सुटावी !

सुरेख !
'रेषा' ही छान...

पुलेशु.

असे दे दु:ख देवा तू नशीले
सुखाची वासना माझी सुटावी !.......व्वा!!

नभावर मालकी नाही कुणाची
जमीनीवर तरी रेषा असावी.... जबरी शेर.

छान झाली आहे गझल.

मला म्हण मूर्ख वा वेडाखुळाही
शिवी मला, प्रोफेसर तुम्हीच द्यावी !