चालणार नाही मी .....

Submitted by सुधाकर .. on 16 September, 2012 - 06:35

चालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.
झाले गेले गतकाळी ते मनात ठसते पुन्हा पुन्हा.

जिंकावे मी कसे स्वत:ला लढून हे युध्द जीवना?
नियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा

सत्यापाठी पळता पळता विरून जाता स्वप्नेही,
उपहासाने नशीब माझे मलाच हसते पुन्हा पुन्हा.

आभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी
अंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा

जखमांवरती फुंका टाकत, आनंदाने जगू अता
याच मानवी योनीमधले जीवन नसते पुन्हा पुन्हा

आशेच्या या हिंदोळ्यावर, आनंदाने झुलू जरा
स्वप्नांचेही येणे जाणे कधीच नसते पुन्हा पुन्हा

..................... http://chandrabilor.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचे तीन शेर वाचनीय आहेत
शेर क्र.२ व ३ जरा तन्त्रात सदोष वाटत आहेत

असो
लवकरात लवकर सुधारणा घडवून आणा आता

पु ले शु

वा अनेक ओळी प्रवाही झाल्या यावेळी, अभिनंदन ऑर्फीयस Happy

============

चालायाचे नाही मजला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.
झाले गेले गतकाळी ते मनात ठसते पुन्हा पुन्हा.

(पूर्णविराम देण्याची गरज नाही. रस्ते हा काफिया खरे तर या गझलेत नाही बसणार, पण सध्या ठीकच! 'चालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा' असे केलेत की अधिक सुलभ होईल). खयाल ठीक आहे.

जिंकावे मी कसे स्वत:ला लढून संगर जीवना?
नियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा<< ठीक

सत्यापाठी पळता पळता विरून जाता स्वप्नही,<< स्वप्नेही असे करायला लागेल.
उपहासाने नशीब माझे मलाच हसते पुन्हा पुन्हा.<< ही ओळ मस्त आली आहे

आभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी
अंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा<<< छान (अंदाजाचा ऐवजी खरे तर आभाळाचा हवे होते, पहिल्या ओळीत इतर काहीतरी, आभाळाऐवजी) Happy

जख्मांवरती फूंका टाकत, आनंदाने जगू अता << जखमांवरती असे करावे लागेल, तसेच फुंका असे! Happy
याच मानवी योनीमधले जीवन नसते पुन्हा पुन्हा<< वा वा, दुसरी ओळ मस्त

आशेच्या या हिंदोळ्यावर, आनंदाने झुलू जरा<< छान!
स्वप्नांचेही येणे जाणे कधीच नसते पुन्हा पुन्हा << छान आहे

पण शेवटच्या शेरात दोन्ही ओळींचे कनेक्शन जरा अधिक दृढ करायला लागेल Happy

एकंदर आश्वासक रचना व शुभेच्छा

-'बेफिकीर'!

जिंकावे मी कसे स्वत:ला लढून हे युद्ध जीवना?
नियती माझी मला हरवण्या, कंबर कसते पुन्हा पुन्हा>>>>असे वृत्तात बसेल बघ रे ऑर्फी.........

वैभू - बेफि... धन्यवाद.

बेफिजी,

आपण सुचविल्याप्रमाणे काही दुरुस्ती केली आहे, परंतू --
चालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा' असे केलेत की अधिक सुलभ होईल ------ पण नेमका असाच बदल का व्हायला हवा हे कळले नाही? म्हणजे वृत्तास अनुरूप म्हटले तरी लघू-गुरूची जागा बदलते त्याचे काय? की केवळ ओळ्/मिसरा प्रवाही व्हावे म्हणून.

गझलेत स्वच्छ शब्दरचना अपेक्षित असते.

>>>चालायाचे नाही मजला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा.<<<

ही ओळ स्वच्छपणे म्हणायची झाल्यास :

चालायचे नाहि मला जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा

अशी होईल.

सहसा हल्ली मजला, तुजला असे वापरत नाहीत आणि अनेकवचन (रस्ते) असल्यास तो 'त' आवश्यक असतो. चालायाचा नाही मजला जुनाच रस्ता पुन्हा पुन्हा ही ओळ (रस्ता - एकवचन) बरोबर झाली असती पण काफिया बदलला असता.

शिवाय, 'चालायाचे' हे 'चालायचे' असे लिहिले जाणे अपेक्षित असते. त्यामुळे:

चालणार नाही मी आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा ही ओळ स्वच्छ होत आहे.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

रसप्,बेफि आणि भारतीजी -- मनपुर्वक धन्यवाद

बेफिजी आपला हेतू मला स्पष्ट झाला पण थोडासा बदल-----

चालणार मी नाही आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा <--- असे केले तर चालेल काय?

बेफिजी आपला हेतू मला स्पष्ट झाला पण थोडासा बदल-----

चालणार मी नाही आता जुनेच रस्ते पुन्हा पुन्हा <--- असे केले तर चालेल काय?<<<<<<

सुधाकर,

चालवून घ्यायला, न घ्यायला, मी कोण? मी तुमचा ' ' ' उस्ताद ' ' ' नाही. तुम्हाला ' ' ' उस्ताद ' ' ' लाभलेला मला दिसतो आहे. तुम्ही जो बदल करून दाखवलात त्यात आणि माझ्या सुचवणीत क्वॉलिटेटिव्ह फरक काहीच नाही. पण 'चालणार नाही मी' हे 'चालणार मी नाही' यापेक्षा 'सुलभ' आहे असे माझे मत!

-'बेफिकीर'!

( आणि मधील 'णि' जो प्रतिसादात 'काही कारणाने' दीर्घ 'झालेला' होता, तो र्‍हस्व केला, हे संपादन)

बेफिजी,
आपल्या सुचवणीत व मी केलेल्या त्याच ओळीत क्वॉलिटेटिव्ह फरक काहीच नाही केव़ळ माझ्या बदल या शब्दामुळे आपला काहीतरी गैरसमज होतो आहे असे वाटते. आपल्या सुचनेप्रमाने दुरुस्ती केली आहे. असो-

दीर्घ 'झालेला -- णि......... मी तर पाहीलाही नव्हता. Happy

ता.क.
तुम्हाला ' ' ' उस्ताद ' ' ' लाभलेला मला दिसतो आहे. Uhoh ??

ऑर्फी सन्गर ऐवजी हे युद्ध असा बदल मी सुचवून पाहिला होता त्याबद्दल काही विचार करतो आहेस का की माझा तो प्रतिसाद वाया गेला असे मानू??

सहज विचारतोय गैरसमज करून घेवू नकोस

आभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी
अंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा>>> वा वा वा... अंदाजाचा डाव बेरकी>> फारच आवडला हा उपयोग येथे.. शुभेच्छा सुधाकर! Happy

येस्स !! आता बघ कुणाची दृष्ट लागूनये असे झाले आहे की नाही हे लेखन ......!!
(अगदी देवपूरकरान्ची सुद्धा !!!)

असो

आभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी
अंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा>>>>>>>>> अगदी हासिल-ए-गझल म्हणावा असा झालाय हा शेर बरका रे ..............

येस्स !! आता बघ कुणाची दृष्ट लागूनये असे झाले आहे की नाही हे लेखन ......!!
पुन्यांदा धन्यवाद वैभू Happy

ही गझल कधीही, कुठेही, कुणासही आवडल्यास यामध्ये तुझा आणि बेफिचा सहयोग मोलाचा आहे असे मी न विसरता सांगेन.

आभाळाला शिवण्यासाठी रोज मारतो उंच उडी
अंदाजाचा डाव बेरकी, छलांग फसते पुन्हा पुन्हा.....

गझल वाचली पुन्हा पुन्हा.....
अन आवडलीही पुन्हा पुन्हा.....:-)