Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 13 September, 2012 - 09:24
पुत्र स्वामींचे
आम्ही पुत्र स्वामींचे
अक्कलकोट वासीचे
आम्हा जन्म मृत्यूचे
भय नाही
धन्य आमुचा जन्म
झाले जन्माचे कल्याण
दृढ धरिता चरण
स्वामींचे
तुटली अवघी बंधन
संसार जाहला खेळण
जाता स्वामींस शरण
संपूर्ण
गेली मनाची तळमळ
सरली बुद्धीची खळखळ
शांती भोगतो निखळ
स्वरूपी
सुख दाटले आत
मावता मावेना मनात
मित्रां सांगतो हि मात
म्हणोनी
मज भेटले काही
वाटे भेटो तुम्हाही
विश्व ओसंडून वाही
कृपा त्यांची
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा चुकून टाकला गेलाय.
हा धागा चुकून टाकला गेलाय. व्यवस्थापकाना डीलिट करायला लिहले आहे. क्षमस्व .
सुन्दर
सुन्दर
छान आहे कि कविता . डीलिट
छान आहे कि कविता . डीलिट करायला कशाला लिहले आहे? अहो पण कवितेचं नाव असं देतात का ?:P