ज्या नभाशी सुर्य होते पेटले

Submitted by सुधाकर .. on 12 September, 2012 - 12:26

ज्या नभाशी सुर्य होते पेटले
त्या नभाशी पावसाळे दाटले

पावसाने पावसाला गाठले
माणसाने माणसाला लाटले

काय नाही मी मुक्याने सोसले?
भावनेने भावनेला छाटले.

जात नाही धर्म नाही देखिले
मी दुकानी वेदनेला थाटले.

कोळश्याचे कोळशाला वावडे
चांदव्याने काजवेही बाटले.

काय घेऊ काय देऊ मी कुणा
नग्न होते जे मलाही भेटले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तन्त्र बरेच अवगत झाले आहे अताशा ;असे वाट्ते
आता खयालावर अजून बारकाईने विचार व्हावा !
रचना छान झाली आहे अभिनन्दन !!!!