मुतखडा

Submitted by अविगा on 10 September, 2012 - 07:52

मला मुतखडा बद्द्ल माहिति हवी आहे! तो कशामुळे होतो?
आयुर्वेदिक उपायाने ८ मि.मि.चा मुत्खडा विरघळु शकतो का?
किंवा ओपरेशनचा साधारण किति खर्च होतो?
कोण्त्या टेस्ट कराव्या लागतात?
माझ्या एका स्त्रि नातेवाइकाला झाला आहे....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहारातुन फळ आणि भाज्या बंद केल्या तर इतर जिवनसत्व कशी मिळतिल???
लाल मांस बंद करायला सांगते .व्हाईट मांस चालेल ना?

मला तीन दिवसात फरक पडला होता, पथरीना आणि गोक्षुरादी गुग्गुळने.

भाज्यांपैकी फक्त पालक, वांगे, अळू, टोमॅटो, अशा भाज्या कमी करायच्या, चिंच, मूळा खायचे.

चिनूक्स | 11 September, 2012 - 12:22 नवीन
अर्थातच..सरसकट अल्कलायझर कसं देता येईल? खडा कुठे, आणि कसा आहे, ते बघायला लागेलच. पण 'खडा विरघळतच नाही', आणि 'सायट्रेटचा उपयोगच नस्तओ' हे आल्यामुळे पुढचं लिहावं लागलं.

<<

चिनूक्सजी,
खडा कुठे, आणि कसा आहे, ते बघायला लागेलच.
हे आपलेच वाक्य आहे, अन हेच मी माझ्या नेहेमीच्या इब्लिस स्टाईलने लिहीले की सिटालने स्टोन वितळत नाही. उद्देश हा की कुणी सेल्फ मेडिकेशन करू नये.
तपासून कुठे काय आहे हे पाहून 'मूत्ररोगतज्ञाने' ट्रिटमेंट म्हणून औषध लिहून द्यायचे आहे. ब्ल्यांकेट 'सिटालने खडा वितळतो' असे म्हणून लोक आणून सिटाल प्यायला लागलेत, तर सिस्टेमिक अल्कलोसिस होऊ शकेल ना? मग आहेतच 'अ‍ॅलोपथीचे साईड इफेक्ट्स' Happy
रिमोट कन्सल्टेशन्स वैद्यकव्यावसायिकाने सुद्धा देऊ नयेत. व इतरांनी एकमेकांना अ‍ॅलोपथी वा इतर औषधे तर अजिबात सुचवू नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मला अमुक होतंय, काय करू? अशा स्टाईलचे धागे वाचताना उगाच चिडचिड होत रहाते.
असो. चर्चा होऊन गेलीच आहे. वरील पोस्टमधे माझा मुद्दा आपणच नीट मांडला आहात.

मला फार माहिती नाही पण गेली १५ वर्षे हा त्रास अनुभवला आहे. Lithotripcy, होमिओपथी, आयुर्वेद सगळे करून झाले आहे आणि माझा सल्ला -
१. सर्वप्रथम डॉक्टर कडे जा आणि KUB ( Kidney Urinary Bladder) X-Ray / Sonography करून खड्याची नेमकी size, आकार,location समजून घ्या.
२. ८ मिमि पेक्षा मोठा खडा असेल तर शक्यतो lithotripcy ने फोडून त्याचे बारीक धूळीसारखे तुकडे मुत्रावाटे बाहेर काढा. ( वेळ - छोटीशी शस्त्रक्रिया, लेजर प्रक्रिया आणि स्टेंट नंतर मुत्रावाटे खड्याचे तुकडे बाहेर - साधारण ४-५ दिवस)
३. बाहेर पडलेले तुकडे collect करा आणि कशाचे बनले आहेत ते तपासायला Lab ला पाठवा. ( डॉक्टर सांगतीलाच काय आणि कसे करायचे ते)
४. Most Likely, हा खडा Calcium Oxalate चा असेल. ( संदर्भ - स्वानुभव)
५. एकदा निदान झाले की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि जीवनपद्धतीत बदल करा.
६. Use anything that works - Alopathy, Homeaopathy, Aayurved. It doesn't matter! मी बरेच उपाय ऐकलेत आणि केलेत. Bottom line - kidneys flush व्हायला हव्यात. आणि भविष्यकाळात परत stone होवू नये.
७. बीअर, सोडा, alkalines, Vitamin-B, Niacin, Coke w/ ASparagus, Lemons, Olive Oil, guggul, cranberries, diet वगरे ठीक आहे पण दररोज २-३ लिटर मूत्र शरिराबाहेर पडले पाहिजे तेवढे कटाक्षाने बघा.

सुलु ताई,
लव्ह अँड बेली नामक सर्जरीचं बायबल आहे.
त्यात एक वाक्य आहे..
'वन्स अ स्टोन, ऑलवेज अ स्टोन..'
रीनल पेन काय असते ते मला चांगलेच ठाऊक आहे. तुम्हाला सहानुभूती व शुभेच्छा!

दररोज २-३ लिटर मूत्र शरिराबाहेर पडले पाहिजे तेवढे कटाक्षाने बघा. >>>> ++++
मलाही ह्याचा फायदा झाला होता.....
लहान खडा असेल तर तो जेव्हा move होतो त्यावेळेस जिवघेन्या वेदना होतात , हयावर अ‍ॅलोपॅथीच्या डाक्टरांनी मला mussle relaxation करानारी एक गोळी दिली होती की त्यामुळे वेदना कमी होतील, मला फायदा झाला होता....

दिनेशदा
पथरीना आणि गोक्षुरादी गुग्गुळने बद्दल सान्गाल का ?? कुठे भेटेल....

लहान खडा असेल तर तो जेव्हा move होतो त्यावेळेस जिवघेन्या वेदना होतात>>> +१.
तो त्रास आठवला तरी आता नकोसं वाटत.

टोमेटोच्या बिया त्रास्दाय्क असतात ना!!!! कि पुर्ण टोमेटोच??? टोमेटो भाजितुन काढला तर भाजी कशी लागेल??
आहारातुन फळ आणि भाज्या बंद केल्या तर इतर जिवनसत्व कशी मिळतिल???
लाल मांस बंद करायला सांगते .व्हाईट मांस चालेल ना?

nakkich aayurvedic upcharane aapnas fayda hoil .
aamhi niyamit asha swarupachya rugnana yashasvi chikitsa dileli aahe
10-12 mm .paryantache stones hamkhas shastrkriya n karta nightat.

Pages