महिला राज

Submitted by Prajakta C. Kulkarni on 10 September, 2012 - 03:45

सकाळची वेळ होती.शाल्मलिची कामाला जाण्याची गडबड उडाली होती.तिचई आई तिचा डबा भरत होती,तिचे बाबा पेपर वाचत बसले होते.
"अग शालु ,ही बातमी वाचलिस का? तुझ्यासाटी खास आहे " शालुचे बाबा
"कोणती बाबा?" शालु
" आज पासुन तुमच्या जागेवर जर कोणी पुरुष लोक बसले तर आणि ती व्यक्ती उट्ली नाही तर बस सरळ पोलिस स्टेशनवर नेण्या चा नवा नियम झाला आहे,खास महिला दिना ची भेट आहे ही" शालुचे बाबा तिला सागतात.

तोच शालुचा भाऊ विश्वास बोलतो,

" ओ बाबा ,तिला काहीही सागु नका, ती बस आता पोलिस स्टेशन वर नेइल्,ती रोज बस मधे भाडते"

" वा रे वा आमच्यआ जागेवर तुम्ही बसता, कळत नाही का तुम्हाला?"शालु
" मी बसत नाही ,पण तु किती भाडतेस हे मला मन्या सागतो रोज आणि आज बाबानी अशी बातमी दिली आहे की " विश्व्वास

" बाबा ,दादाला सागा ना"शालू

" विश्व्वासराव , तुमच्या बहिणाबाइची माफी मागा, आज जागतिक महिला दिन आहे त्यानां शुभेछा द्या. अन्यथा आमच्याशी गाठ आहे"
शालुचे बाबा

" बाबा साहेब, आपली आड्ण्आ शिरसावंद्य" विश्वास

" ताइसाहेब आम्हाला माफ करा ,आमची चु क झाली" विश्वास माफी मागतो.

शालु विश्वास कडे बघतच नाही. आणि आत जाते.

" आई माझा डबा दे," शाल्मली आईला हाक मारते.
"हा घे,शालु आणि हो ,बसमधे कुणाशी वाद घालु नकोस ,बाबाच्या बातमी कडे लक्श देउ नकोस" शालुची आई वसु,
"बर" शालु

त्यानंतर विश्वास शालुला बसस्टाप वर सोडतो.,वाटेत त्याला त्याचा मित्र मन्या भेटतो.त्याच्या नोकरीचा आज पहिला दि वस होता.विश्वास त्याला शुभेछा देतो आणि सांगतो शालु वर लक्श ठेव म्हणु न.
इकडे बसस्टाप वर नेहमी ची च गर्दी होती.नु सतेच निय म आणि कायदे ब नवा अमंलबजावणी च्या नावाने बोंब.,शालु तणतणत होती.तेवड्यात ह्ड्पसर येते निम्मी गर्दी घेउ न जाते.आता आपल्या बसला गर्दी कमी असे
वाट ते,पण गर्दी वाडत होती. मग शालुची बस येते. ती चड्ते, मन्या चड्तो.

"चला चला पुढे सरका,आगे स रको,मागे थांबु नका, पुढे सरका"माळ्वाडी चा कडंक्टर ओरड्त होता.

तशी शालु त्या कडंक्टर ला विचारते
"काय हो बसस्टाप कुठे ? बस थांबवता कुठे का तुम्ही थांबवाल तिकडे आम्ही पळायचे का?"

" ताई चिडु न का.मध्ये रिक्षा होती ना" कडंक्टर

.शाल्मलि पुढे जाते आणी बघते, महिलांच्या राखी व जागांवर महिलाच बसल्या आहेत की नाही
.बस सुरु होते तरीसुधा मागे बरेच जण लट्क त होते, तसा कडंक्टर ओरड्तो,

" दारात उभे राहु नका,मागे पडाल"

" ओ कडंक्टर जरा शुभ बोला ना राव" मागे लट्कलेला एक प्रवासी

" कडंक्टर जरा बहिरट वाडी आली की सांगा" एक नमुनेदार प्रवासी

" जरा कशाला अखखी बहिरट वाडी आली की सांगतो" कडंक्टर

पुढ्च्या busstop ला बस थांबते,बसमध्ये एक college ला जाणारि तरुणी चढ्ते, लाल रंगाची डीझायर
साडी,मोकळे सोड्लेले केस . बसमधली गर्दी पाहुन चिड्ते.तिच्या पाठोपाठ एक तरुण पारंपारिक वेषात चढ्तो.काही वेळ बसमधली सगळी माणसे या दोघांकडे बघत अस तात. बस सुरु होते. आणि तो नमुनेदार प्रवासी विचारतो ,

" कडंक्टर जरा बहिरट वाडी आली का? याचा पुढ चा स्टा प का?" एक नमुनेदार प्रवासी

"नाही हो, मी बहिरट वाडी आली की सांगतो, बोला तुमचे काय ? कडंक्टर त्या तरुणा ला

" कुठे काय आज आमचा traditional day आहे ना आणी तिचा साडी डे आहे" तरुण

"एकाच college मध्ये असुन दोन वेगवेगळे डे कसे काय?" महिलांच्या रांगेत पहिल्या सीट्वर बसलेल्या काकु

" त्याचे असे आहे काकु ती SNDT ला आहे आणि MIT ला आहे" त रुण

"बस MIT ला जात नाही" कडंक्टर त्या तरुणा ला

" मग दोन SNDT द्या"त रुण
"बोला तुमचे काय ?" कडंक्टर शालु ला
"पास" शालु

"चला काळेवाडी फाटा , पुढे सरका" कडंक्टर

या स्टाप ला शालुची friend गौरी चढ्ते ती पण शालुच्याच ऑफिस मध्ये काम करत असते. याच दरम्यान तो त रुण आणि मगाचच्या काकुंचे काका यांचे चांगले मेतकुट जमले होते.

" काका तुम्ही पण कविता करता ,मी सुद्धा कविता करतो" त रुण
"ही आत्ताच सुचली बघ

पहाटवेडी प्राजक्तफुले
रंग उषेचा ह्ळुच नेती
गंध तयांचआ कुणी न्यावा" काका

"वा वा, टाळ्या टाळ्या" त रुण ओरड्तो

सगळे जण टाळ्या वाजवतात.

" आता माझे विडंबन " त रुण

खड्ड्यात पड्तो मी तो जाता जाता
पण सावरलो उभा राहता राहता
तो गोल आहे ना
पण खोल आहे ना" तरुण

" ओ कवि संमेलन जरा गप्प बसा, आमच्या आज exam आहेत" मागच पुस्तकी किडा

"अहो अहो" काकु काकांना

" काय आहे?" काका

" लक्ष कुठाय?" काकु

" कवितेकडे" काका

" कविता मरु दे आधी मला एक रुपाया द्या अहेराच्या पाकिटा त घालायचा आहे" काकु

" कविता मी म्ह्ट्ली आणी तुला रुपाया कशाला? उतरल्यावर बघु" काका

चला जगताप डेअरी , पुढे सरका" कडंक्टर

गौरी पुढे सरकत शालु जवळ येते.आज शालुचे ल्क्ष फ क्त महिलांच्या राखी व जागांवर महिलाच बसल्या आहेत की नाही इक्डेच होते.तिच्या समोर एक आजोबा पेपर वाचत बस्ले होते,त्या पेपरच्या मागच्या
बाजुला " ती बातमी होती" शालुच्या बाबांनी तिला सांगीतलेली. शालु ती बातमी वाचत होती.याच दरम्यान
ब्रेमेन चऊक येतो ,तिथे शालु आणखी एक friend रिटा चढ्ते ती पण शालुच्याच ऑफिस मध्ये काम करत असते . आज ठरवुन त्या तिघीं ही बस प़कड्ली होती.

" कडंक्टर जरा बहिरट वाडी आली का?

" नाही आली,चला पुढे सरका" कडंक्टर

या स्टॉपला रिटा समोर दोन कॉलेजचे तरुण महिलांच्या जागेवर बसतात .शिवाय त्यांच्या समोर आण्खी एक चाळीशीचा माणुस सुद्धा महिलांच्या जागेवर बसतो मुद्दा म ठरवुन .त्याची बायको ती मात्र उभी असते.
या सगळ्या गोष्टी रिटाच्या डोक्यातच जातात.इतर मुली नुसत्याह्च बघत बसतात .

ओ उठा ,ही जागा महिलांसाठी राखीव आहे," रिटाने असे म्ह्ट्ल्यावर इतर बायका तिच्याकडे बघु लागतात.मग

गौरी पण पुढे येते आणि रिटाची बाजु घेते.

"तुम्ही उठा त्या आजी उभ्या आहेत, त्यांना जागा द्या"

नाही उठ्णार तुम्हाला काय करायचे आहे ते कर" तो चाळीशीचा माणुस

"स्री दाक्षिण्य नावाचा प्रकार आहे की नाही" रिटा

"तुम्हाला पुरुष दाक्षिण्य नावाचा प्रकार माहिती आहे का?" कॉलेज पहिला तरुण

"ओ उठा कशाला राव नाट्के करताय, तुम्ही चांगले शिकलेले वाट्ताय आणि असे अडाण्यागत काय वागताय?" कडंक्टर

ओ कडंक्टर ,स्री -पुरुष समानता आहे आणि कुठे आरक्षणाच्या गप्पा मारता" दुसरा तरुण

आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करत आहे ,मग बस मध्ये आरक्षण कशाला ? " पहिला तरुण

"शाब्बास मित्रा, योग्य तेच बोललास" मागचा एक प्रवासी

बसमधल्या इतर बाय का पण आता बड्बड करु लागल्या होत्या ते पाहुन त्या चाळीशीच्या माणसाची बायको
त्याला म्हणते

"उठा सगळे जण बोलतात ,उठा ना त्या बाय का बड्बड करत आहेत्,उगीच तमाशा कशाला?

"मी तमाशा करतो का? ,आणि हो तुझी बड्बड बंद कर, घरीदारी बायकांची दादागिरी आता सहन होत नाही मला.मी उठ्णा र नाही" चाळीशीचा माणुस चिडतो.

"ओ उठा कशाला राव नाट्के करताय, तुम्ही चांगले शिकलेले वाट्ताय ,हे बघा तुम्ही जर उठ्ला नाहीत तर मला
कारवाइ करावी लागेल"कडंक्टर

ओ कडंक्टर ती कारवाइ नंतर करा आधी माझे सुट्टे दोन रुपये द्या" पुढ्च्या दारात उभी असलेली एक बाई

उद्या देतो" कडंक्टर

उद्या देतो असे म्ह्णुन माझे दिड्शे रुपये आहेत तुमच्याकडे" बाई

दिड्शे रुपयांची मी काय माडी बांधणार आहे का? कडंक्टर

"माडी नाही निदान बायकोसाठी साडी तरी घ्याल ना " ती बाइ उतरते.

ओ "बहिरट" वाडी आली की सांगा" एक नमुनेदार प्रवासी

शाल्म ली हा सगळी प्रकार शांतपणे बघत असते.तेवढ्यात रिटा म्हणते

"तुम्ही उठणार आहात की नाही ,मी पोलि सांनाच बोलाविते"

"थांब रिटा पोलि सांनाच बोलाविण्यापेक्षा आपणच जाऊया पोलिस स्टेशनम ध्ये , काल पासुन नविन कायदा झालाय महिलांच्या जागेवर जर कोणी पुरुष लोक बसले तर आणि ती व्यक्ती उट्ली नाही तर बस सरळ पोलिस स्टेशनवर नेण्या चा नवा नियम झाला आहे,खास महिला दिना निमित्त . काय कडंक्टर " शालु

"हो हो चला त्या निमित्ताने उदघाट्न होइल या नियमाचे"

मग त्या ड्रायवरचे आणि कडंक्टर चे बोलणे होते. बस आपला रस्ता बद्लते,हे प्र वाशांच्या लक्षात येते आणि
ते ओरडु लागतात,

" ओ आम्ही बसलो आहोत का तुमच्या जागे वर मग आम्हाला त्रास का ,आम्हाला उतरावा आमचे आम्ही जातो कामाला ,तुमचे तुम्ही जावा पोलिस स्टेशनवर " एक विचारी माणुस

" हो हो"

"हो हो काय करता आता बस कुठेही थांबणार नाही सरळ पोलिस स्टेशनला थांबणार"

"अग शालु आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे असे करु नकोस ग " मन्या अचानक जागा होतो .

बसचा रस्ता बद्ललेला पाहुन त्या mit च्या तरुणाला बड्बड करायला जोर चढ्तो.

"GOOD MORNING ,शुभ प्रभात सर्व प्रथम बसमधल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या लाख लाख शुभेछा

" आता सकाळ्चे नऊ वीस झाले आहेत यावेळी आपली बस कुठे असते तुम्हाला आठवत असेल यावेळी आपली बस बहिरट वाडी ला असते , पण आज एक आश्चर्याची गोष्ट घड्ली आहे ,

" महिला आरक्षणाचा नियम मोड्ला गेल्या मुळे आपली बस आता जाणार आहे पोलिस स्टेशनला, ही अतिशय
आनंदाची गोष्ट आहे ,की आज महिलांच्या बाजुने नियम आहे. टाळ्या"

" आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या नविन नियमाचे उदघाट्न होइल , टाळ्या"

हा सगळा गोंधळ पाहुन आणि बस पोलिस स्टेशनला, जात असल्याचे पाहुन त्या माणसाची बायको
त्या माणसाला सांगते

" ओ उठा , बस खरेच पोलिस स्टेशनला जातेय ,"

" तु गप्प बस ,पोलिस स्टेशन काय मला नविन नाही ,याआधी चार वेळा जाऊन आलोय " तो

" हो ,पण त्यावेळी माझा भाउ होता ,तुम्हाला बाहेर काढायला "

"पुरे माहेरचे कौतुक पुरे" तो

ती गप्प बसते

" या ठिकाणी तीन मुलींनी पराक्रमाची बाजी मारली आहे ,रिटा ,शालम्ली आणि गौरी .या तिघीचे पुन्हा

एकदा अभिनंदन . आपल्या सोबत आहेत ,रिटा ,काय वाट्ते आपल्याला

" ही यांची नेहमीचीच नाट्के आहेत त्यांना एकदा धडा शिकवायचा होता" रिटा

"आपण काय करता?"

" आम्ही एका कंपनीत कामाला आहोत ,कोथरुड्ला"

आता आपल्या सोबत आहेत सौ. शकुंतला ,तुमचा नवरा आत्ता पर्यंत चार वेळा पोलिस स्टेशनला जाऊन आले
आहेत काय वाट्ते आपल्या ला,

" मला काय कौतुक वाट्णार का त्याचे ,आणि हा काय प्रश्न झाला विचारायचा?" ती त्या तरुणावर ओरड्ते.

बस मधला हा गोंधळ रस्त्यावरची माणसे बघत होती,

आपल्या सोबत आहेत मानस शास्राच्या student आपर्णा ताई ,
सांगा आपर्णा ताई हा माणुस असे का वागतो आहे ? त्याच्या डोक्या वर काही परिणाम झाला आहे का?"

" हो हो वेडा आहे मी ,काय म्हणणे आहे तुमचे ?

" मला असे वाट ते की मुद्दामुन च महिलांच्या जागे वर बसले आहेत" आपर्णा ताई.

" आता आपली बस पोलिस स्टेशन जवळ आली आहे "

इकडे ऑफिस मध्ये या तिघींमुळे एक मिटींग बुड्ते ,त्या तिघी दुपारी बारा वाजता ऑफिस मध्ये
पोहोचतात.त्या फार विजयाच्या मुड मध्ये असतात. पण त्या उशिरा येतात म्हणुन त्यांचे सर खुप ओरड्तात.
त्या तिघींना खुप वाईट वाट्ते.

लंच च्या वेळी त्यांचा टिमलीडर आणि सर गप्पा मारत असतात.

" सर तुम्ही त्या तिघींना एवढे बोलायला नको होते, निदान आज तरी"पहिला टिमलीडर

" का आज काय आहे?" सर

" जागतिक महिला दिन आहे " दुसरा टिमलीडर

"हे पाहा नियम म्हणजे नियम .दुपारचे बारा ही काय कामाला यायची वेळ झाली , आणि जागतिक महिला दिन आहे आपल्या ऑफिसचा foundation day नाही " सर

"सर आपल्या ऑफिस मध्ये मुलींची संख्या जास्त आहे आणि project ची deadline जवळ आली आहे. किती ही
झाले तरि त्यांच्या मुळे आपले project वेळे वर पुर्ण होतात "पहिला टिमलीडर

" मी त्या तिघीचे आत्ता च बोलणे एकले आहे त्या कामाला हात देखील लावणार नाहीत जो पर्यंत तुम्ही त्यांना party देत नाही . शिवाय त्यांच्या डोक्यात ह्वा गेली आहे आणि तुम्ही त्यांचा इतका अपमान केलाय की त्या लंच नंतर कामाला हात देखील लावणार नाहीत आत्ताच त्यांची tv वर मुलाखत झाली आहे [" दुसरा टिमलीडर

" मग party ची तयारी करा." सर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज माझी पहिली कथा मायबोलि वर प्रकशित झाली आणि त्या कथेला वाच क मिळाले .ही अतिशय आनंदाची
गोष्ट आहे. इतके दिवस मी नुसतेच लिहित होते ,पण माझ्या कथा कुठे छापल्या गेल्या नव्हत्या .मायबोली सारखा उत्तम लिखाणाचा मार्ग सापड्ला.
आता माझी ही कथा तुम्हाला विनोदी वाट्ली नसेल ,पण त्यातले एखादे वाक्य तरी तुम्हाला नक्की आवड्ले असेल आणि
नाही आवडले तरी काही प्रश्न नाही. मला विनोदी असे कधी सुचत नाही , पण ही सुचली आणि इथे लिहिली.

निंबुडा,

मला सापडला विनोद! Happy त्याचं काये की कायद्याप्रमाणे बस पोलीस स्टेशनात नेली. पण गुन्हा दखल करायचा कायदा नसल्याने तशीच परत मूळ मार्गाकडे वळवली.

तात्पर्य : कायदा गाढव असतो.

झाला किनाय विनोद? मग हसा पाहू!

आ.न.,
-गा.पै.

पण माझ्या कथा कुठे छापल्या गेल्या नव्हत्या .मायबोली सारखा उत्तम लिखाणाचा मार्ग सापड्ला.>>>

अगदी सहमत आहे तुमच्याशी. लिहीत रहा. आम्ही वाचूच.

धन्यावाद ,

सगळ्यांना.मी इतके दिवस वेड्यासारखी लिहायची आज ,माझ्या कथांना वाचक मिळाला.

..

@Prajakta C. Kulkarni | 5 October, 2012 - 10:54 नवीन
..... मायबोली सारखा उत्तम लिखाणाचा मार्ग सापड्ला.<<
सहमत.

पहिला प्रयत्न म्हणून स्वागत आहे. छोटी कथा असती तर बरे झाले असते. प्रतिसादांवरून हुरळून जाउ नका नि निराशही होऊ नका.
अल्पसंतुष्ट असणे हेही माबोवर टिकून राहायला उपयोगी पडते.
मि तर सुमारे वर्षभर नुसता वाचकच होतो. वर्षानंतर सदस्य होण्याचे धाडस केले. इथे एकापेक्षा एक प्रतिसाद-महामेरू आहेत हे लक्षात आले नसले तर लक्षात घ्या. शब्द नेहमीच्या अर्थाने येथे वापरले जातीलच असे नाही. तरीही कांही अतिप्रतिष्ठित आय्डींची अपेक्शा असते की त्यांच्या मनातले अर्थ तुम्हाला समजलेच पाहिजेत. अशांना जमल्यास अर्थ विचारणे किम्वा प्रतिसादच न देणे म्हणजे उपेक्षा करणे म्हणजे फाट्यावर मारणे हा सर्वात उत्तम मार्ग.
नव्या आहात म्हणून जरा विस्ताराने लिहिले इतकेच.

सगळ्यांना.मी इतके दिवस वेड्यासारखी लिहायची आज ,माझ्या कथांना वाचक मिळाला.
>>> काळजी करू नका ईथेही सगळे वेडेच आहेत आणि जे काही वेडेवाकडे लिखाण सापडेल ते वेड्यासारखे वाचून काढतात.... Happy

दिवे घ्या

धन्यवाद सगळ्यांना
मी-भास्कर ---

प्रतिसादांवरून हुरळून जाउ नका नि निराशही होऊ नका.
अल्पसंतुष्ट असणे हेही माबोवर टिकून राहायला उपयोगी पडते.
ह्या सल्ला दिला ते बरे झाले.

इथे एकापेक्षा एक प्रतिसाद-महामेरू आहेत हे लक्षात आले नसले तर लक्षात घ्या. हे माझ्या लक्षात आले आहे.पण शब्दांचे अर्थ कधी तरी समजायला हवेत ना

मी इतके दिवस वेड्यासारखी लिहायची म्हणजे घरचे पण ओरडायचे अभ्यास केल्या सारखे काय लिह्तेस्?एवढे काय रहस्य बाहेर पड्णार आहे.

मला सगळया मायबोली करांची टोपण नावे फार आवड्ली.

>>पण शब्दांचे अर्थ कधी तरी समजायला हवेत ना<<
फार सिरियसलि घेऊ नका. अगदी आवश्यक वाटले तर प्रतिसादातच विचारा. बहुतेक मायबोलीकर [माबोकर] मदतीला येऊन तुमची अडचण तत्परतेने दूर करतात असा अनुभव आहे.
विचारपूस मध्ये जाऊन विचारत बसू नका.
शब्दांचे मनाप्रमाणे अर्थ लावणार्‍यांचे अहंकार आणि महत्व वाढवून आपला वेळ वाया घालवू नका.
असे लोक 'रुमाल' हा शब्द गलिच्छ पोतेरे, टॉवेल, सतरंजी, ............ आणि इतर कोणत्याही अनाकलनीय अर्थाने वापरू शकतात. अशांना फाट्यावर मारणे [अर्थ आधीच्या प्रतिसादात दिला आहेच] हा उत्तम उपाय!
हे अनुभवाचे बोल आहेत.