मी कुठे आहे ?

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 10:35

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा काय प्रकार आहे, श्री सन्तोश?

ही कविता आहे तर ती ललित लेखाच्या भागात का?

आणि हे लिखाण खरच तुमचे स्वतःचे आहे का? असल्यास कृपया कविता भागात हलवा.
नसल्यास हा प्रकार त्वरित थांबवा. इथे फक्तं तुमचं स्वतःचं साहित्यं अपेक्षित आहे.
दहा दिवसांच्या भुकेल्या लहान पोरानं केलेली एका पावाची चोरी मी समजू शकते. साहित्याची चोरी... एक अत्यंत हीन प्रवृत्ती आहे.
(मूळ कविता चांगली असावी... अशीच बर्‍याच ठिकाणी पोचलीये बिचारी)

पातिल, इथलं तिथलं उचलून मायबोलीवर पोस्ट करण्यापेक्षा इथे जे साहित्य आहे ते वाचा. भरपूर आहे. उत्तम आहे. आणि कुणी सांगावं ते वाचून तुम्हाला काही स्वतः लिहिण्याची स्फुर्तीही येईल. Happy