करू कुणाची, कशास पर्वा? मला कुणाचा धाक?

Submitted by सतीश देवपूरकर on 9 September, 2012 - 04:22

रसिकमित्रमैत्रिणिंनो! ही एक गैरमुरद्दफ गझल आहे जी, आज सकाळी ईश्वरी कृपेने एकटाकी लिहिली गेली. साधारणपणे मी एकटाकी लिखाण फारच कमी वेळा केले आहे. पण आजचा उचंबळच इतका तीव्र होता की, मला राहवले नाही, व ही रचना, माझ्या पांडुरंगाने माझ्याकडून लिहून घेतली. ह्या गझलेत एकच काफिया (नाक) मी ७ वेळा वापरला आहे. हे सर्व शेर वाक्प्रचारांचा वापर गझलेत कसा करता येतो, हे दर्शविण्यासाठी दिलेले आहेत. एका गझलेत एक काफिया फार फार तर दोनदा वापरावा, अधिक वेळा नव्हे, असे जाणकार म्हणतात. इथे फक्त वाक्प्रचारांचे गझललेखनातील महत्व अधोरेखित करण्यासाठी नाक काफिया मी इतके वेळा वापरलेला आहे!
...........प्रा.सतीश देवपूरकर
............................................................................................

गझल
करू कुणाची, कशास पर्वा? मला कुणाचा धाक?
जळणा-यांनो! जळा कितीही खुशाल, अन् व्हा खाक!

उगारल्याने हात, कुणाचे होते केव्हा काम?
जे जे सुंदर, अलौकीक, तू त्याच्या पुढती वाक!

जगात असती नमुने ऎसे किती तरी ते पहा......
अपशकून करतात कापुनी स्वत:चेच ते नाक!

हवी कशाला गुबगुबीत तुज गादी झोपायला?
लगेच तुज लागते झोप! तू तुझी पथारी टाक!

करू कशाला दारूची मी, उगा बुराई तरी?
सोसत नाही ज्यांना दारू, त्यांनी प्यावे ताक!

कालचक्र ते फिरते आहे, कोण फिरवते तया?
कोणासाठी थांबत नाही, गरगरते ते चाक!

दुनियेसाठी निव्वळ झिजला! दर्शन त्याचे करा.....
झुकला आता किती बिचारा! पहा तरी तो बाक!

कशास दवडू स्वास्थ्य मनाचे? चिडू कशाला? सांग..
खुशाल ते खाजवोत त्यांचे सातत्याने नाक!

शेराची सव्वाशेराशी, पडते जेव्हा गाठ.....
वर केलेले खाली होते, आपोआपच नाक!

पुन्हा पुन्हा तो, दवडत बसतो, तोंडाची ती वाफ!
“माफ करा” म्हणताना बसतो गुंडाळत तो नाक!!

निलाजरेपण किती असावे तुडुंब कोणामधे?
खरेच आहे....भोके उरती, गेल्यावरही नाक!

बोला, झोडा, टाळा त्यांना, भले कितीही, तरी.....
पुन्हा पुन्हा ते धावत येती, घासत त्यांचे नाक!

अडला नारायण म्हणती ते उगाच नाही अरे....
मूर्खाच्याही पडती पाया, मुठीत धरुनी नाक!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उचंबळ फार तीव्र होता ..असेलही..पण त्या मुळे झालेली निर्मिती अगदीच सुमार झाली आहे.

जाता जाता सहजच रणजीतची ही गझल स्मरली.

सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक
मी हसताना पाहुन माझे दु:ख मुरडते नाक !

जबाबदाऱ्या वाढत गेल्या जसे वाढले वय
ओझे वाहुन पाठीला ना कधीच आला बाक

संसाराच्या रहाटगाड्याची अडखळती चाल
परंतु वंगण सरल्यावरही पुढेच जाते चाक

लळा जिव्हाळा नको वाटतो, करून झाले प्रेम
तोंड पोळल्याचे कळल्यावर फुंकुन प्यावे ताक

एकच होता तुझ्या स्मृतीचा मनात जपला क्षण
स्वर्गाच्या दारावर लिहिले होते 'झटकुन टाक!'

मनात म्हटले बघुन मंदिराचे छोटेसे दार
'जितू, जबरदस्तीने आता दगडासमोर वाक !'

....रसप....
६ सप्टेंबर २०१२

१. फक्त बहर (२७ मात्रा - कितीही अनवट का असेना!) आणि काफिया समान आहेत. खयाल फारच वेगळ्या पातळीचे आहेत. पण हे तर नक्कीच की प्रेरणा घेतली असावी. मी सरांच्या जागी असतो आणि सर माझ्या, तर सौजन्य म्हणून मी प्रेरणा 'इथून' घेतली हे लिहिलं असतं. असो. हा वैयक्तिक विचारांचा भाग झाला...

२. समजा, जर प्रेरणा नसेल.... आणि खरोखरच उत्स्फूर्तपणे असंच सुचलं असेल तर हे योगायोग जरा फारच होताहेत.

३. गझलेविषयी... खरंच नाही आवडली.

बेसुमार लिहिणं आणि सुमार लिहिणं ह्यातलं नातं आता मला उमगायला लागलं आहे. बेसुमार लिहिणारे सुमार लिहितात आणि सुमार लिहिणारे बेसुमार लिहू शकतात.

मलाही रणजीतची हीच गझल आठवली होती पण मी काहीतरी बोलावे अन वाद सुरू व्हावा असे कालपरवाच झाले होते व देवपूरकरसराना त्रास झाला होता म्हणून मी काही बोललो नाही !!
इतकेच काय माझ्या पहिल्या प्रतिसादात प्रयोग या शब्दास "दुहेरी अवतरण" देणे देखील मी टाळले.

पण हे तर नक्कीच की प्रेरणा घेतली असावी>>>>>>>>>>>> १०१ टक्के सहमत !!

मी प्रेरणा 'इथून' घेतली हे लिहिलं असतं>>>>>>>>>> हो हो मला माहीत आहे रणजीत
मागे एकदा माझा एक विठ्ठलाचा शेर तुला आवडला अन तूही विठ्ठलावर एक गझल रचली होतीस . शेवटी माझा तो शेर आवर्जून उर्धृतही केला होतास ...... मी विसरूच शकत नाही ते!!

असो

एक सुखद आठवण ताजी केल्याबद्दल धन्यवाद

पण हे तर नक्कीच की प्रेरणा घेतली असावी>>>>>>>>>>>> १०१ टक्के सहमत !!

वैभू कशाला रे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतोस?

बेसुमार लिहिणारे सुमार लिहितात आणि सुमार लिहिणारे बेसुमार लिहू शकतात.

---------------- खरय, पण तो काय योगायोग असा ? हां ... योगायोग असा?

वैवकु,

आठवण अजून स्पष्ट करतो -

ऐक ना आता स्वतःला विठ्ठला
लाव ना माझा लळा तू लाव ना

- वैवकु.

वाटते की झोपलो नाही किती वर्षांत मी
पावलांपाशी 'जितू'ला जोजवा हो विठ्ठला !

....रसप....


"उचंबळाला लिहुन काढले, एकच घेउन टाक,*
माबोवरती त्या गझलेला स्पर्शुन गेले काक !"

*टिप १) 'टाक' हा शब्द बोरू किंवा लिहिण्याचे साधन या अर्थी वापरला आहे. (संदर्भ- एकटाकी गझल.)
टिप २) हा शेर आत्ताच इथेच विठ्ठलाच्या प्रेरणेने सुचला आणि मी लिहिता झालो. सौजन्य म्हणून मी नोंदवतो आहे की या शेराची प्रेरणा हीच गझल आहे.

माझी कुनी आटवन काडली????

कुणी म्हणे कावळा मला तर कुणी म्हणाले ''काक''
इकडे तिकडे चोर्‍या करुनी बुद्धिस आला बाक

चला करूया म्हटले मी आपणही शेर झपाक
गुलाबजामन संम्पुन गेले उरला केवळ 'पाक'

सगळे कफिये सम्पल्याने केवळ पाक हाच एक उरला होता त्यामुळे हा शेर जरा कफियानुसारी झालाय प्लीज खपवुन घ्यावे ही विनन्ती

टीपः ज्ञानेशजीनी दिलेली " टिप-२)" कॉपी-पेष्ट !!

धन्यवाद

चित्रपट आणि नाटकांची नावे जशी रजिस्टर करावी लागतात, तशीच व्यवस्था काफियांबद्दल व्हायला हवी. काफिये निवडताना ते आधी कोणी वापरले नाहीत याची खात्री करता येईल. पॉप्युलेशन कंट्रोल होईल हा साइड बेनिफिट.

वैभू कशाला रे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतोस?

सुध्या, तुझा गुरू सटपटला की रे इथे? सरळ नाक बाक ते सगळ त्या रसपच घेतल. सगळ्या लाल रंगाच्या कावळ्यांनी मिळून एखादे हिरवे कबूतर मारावे तसे प्रतिसाद आले इथे. आता तू काय करणार सुध्या? पॉपकॉर्नसारखा तडतड उडशील आता. आधीच म्हणत होते की चूकजागी निष्ठा वाहू नकोस. पोपट होईल तुझा, तोही जांभळा पोपट होईल.

चल जिमी, देवमामांचा बीबी म्हणजे मोकाट फिरणार्‍या आय डींसाठी असलेला थांबा झाला आहे आता.

वैभू कशाला रे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतोस?>>>>>>>

मी पायावर धोंडा नाही धोंडयावर पाय मारत असतो Proud

गुडगा फूटून ढोपार मोडलं म्हणून पुन्हा रडत बसतो>>>>>

कै तरीच काय अरे
तुला एक सान्गतो एखादा मणुस पडला की सगळे मजा घेतात बघ ,हसायला लगतात मग मीही पडल्याचे रडल्याचे नाटक करतो अधून मधुन....
इतर वेळेस मी विटेवर उभा असतो माझ्या मनातल्या .अगदी निशचल अन ठाम !!

असो तुला नै कळायचे ते
तुला मजा येतेना मला रडताना पाहुन?.............. मग बास तर !!

तुझा -वैभू

मोहीने इथे कशाला दुसर्‍यांची केळं सोलतेस. जे कोणी पॉपकॉर्नसारखे उडतात त्यांच्यापासून खरंच तू लाब रहा नाहीतर ते तुझा जिमी आणि दुबळ्या जिमीची एका फटक्यात लाल मोहीनी करतील.

जिम्या, हे सुधाकर म्हणजे भूत आहे बरं? जपून जरा. बघ कस डोळे फिरवत आहे. गुरू ऑनलाईन असले तर हे भूत मानवयोनीत येऊन नंगानाच करून दाखवत. गुरू ऑफलाईन गेले की डोळे फिरवत. भूत आहे हे भूत.

जिम्या, घाबरू नकोस, मी तुला काही करणार नाही, मला फक्त तुझ्या बरोबरची ती वचावचा करणारी हडळ हवी आहे.
तुला नै ठाऊक. ती दिसते माण्सावानी पण रात्री अंगात आलं का बघ कशी नाचते बघ ---->DesiSmileys.com

प्रोफेसर या गझलेवर काही उत्तर न देता आणखी नव्यानव्या गझला टाकत सुटलेत. मायबोली गुलमोहराची रयाच गेली.आहे हल्ली.

मायबोली गुलमोहराची रयाच गेली.आहे हल्ली.<<<<<<

कावळ्या, रया ३१ जुलैला गेली, आता तुला माझा किंवा मला तुझा ड्यु आय म्हणतील बघ लगेच लोक विपूविपूत.

बाकी कावळा, रया जाऊ नये यासाठी तू काय करायचे ठरवले आहेस तेही सांगूनच टाक की? च्यायला 'टाक' मध्येही काफिया आला.

प्रोफेसर या गझलेवर काही उत्तर न देता आणखी नव्यानव्या गझला टाकत सुटलेत.<<<<<<

कुठेतरी उचंबळ तीव्र झाला की पुरे

>>प्रोफेसर या गझलेवर काही उत्तर न देता आणखी नव्यानव्या गझला टाकत सुटलेत. मायबोली गुलमोहराची रयाच गेली.आहे हल्ली.<<

'मायबोली' वर एक वेगळं सदर सुरू करावं. - 'देवबोली'

खरोखर फार वाईट हालत झालीय मायबोलीवर गझलेची

(त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझाही खारीचा(?) वाटा अहेच म्हणा .....:()

......... पण अशाप्रकरे खचून चालणार नाही हे जीर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर हाती घेतले पाहिजे आपण सर्वानी मिळूनच ! काय म्हण्ता ??:)

ओके ओके बेफीजी सुचली की लिहीन इथे !!
आपणही अनेक दिवसात लिहिले नैये काहीच
अम्हाला फार ओकेबोके वाटते हल्ली मबोवर