फिक्स्ड डिपॉझिट बद्दल..

Submitted by mansmi18 on 8 September, 2012 - 08:15

फिक्स्ड डिपॉझिट साठी पुढील संस्था/बँकाबद्दल मत हवे आहे:
१. लोकमान्य क्रेडिट को ऑप सोसायटी.(१२%)
२. डी एस के डेवलपर्स (११%)
३.PMC Bank (Punjab and Maharashtra Co op Bank)

माझे वडील वरील दोन संस्थामधे काही रक्कम गुंतवायचे म्हणत आहेत. मिळणारा व्याजदर आकर्षक आहे पण यात गुंतवणुक करणे किती सुरक्षित आहे? कोणी या मधे गुंतवणुक केली आहे का?

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mansmi18 ,

डी एस के डेवलपर्स (११%)
एच. डी. एफ. सी. (९.७५ %)

हे पर्याय त्यातल्या त्यात खात्रीलायक वाटतात

किंवा सरळ नॅशनलाईज बँक्स

१-२ ट्क्य्यांकडे आकर्षित होवून मुद्दल धोक्यात घालण्यात अर्थ नाही, असे आपले माझे प्रांजळ मत!

-सुप्रिया.

PMC Bank is a better choice as the Bank deposit has Insurance up to Rs.100000/-.

The way the credit co-operative societies are managed in India, it is very difficult to predict their survival. Also there is no Insurance.

DSKDL is a company engaged in real estate & everybody knows there is no transparency in real estate dealing. Secondly considering the current economic situation in India & world the future of Real estate sector may not be very bright. Thirdly please click on the following links to know about the recent decision of Supreme Court about Sahara Group, which may create further problems for the deposit accepting real estate companies.

http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-03/news/33563196_1_...

http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-02/news/33536186_1_...

HDFC could also be a better choice.

पहिले दोन बाद करा. सरळ एस बी आय किंवा कोणत्याही राष्ट्रियीकृत बँकेतच पैसे ठेवा. पुण्यातील कॉसमॉस बँकेत
सिनीअर सिटिझन्स ना अर्धा का एक टक्का जास्त व्याज मिळते. रिअल इस्टेट फील्ड मध्ये मंदी आहे म्हणून त्यांना पैशांची गरज आहे. परताव्याच्यावेळी प्रॉब्लेम येऊ शकतो. सहारा च्या कोणत्याही स्कीम मध्ये शक्यतो गुंतवू नका.

धन्यवाद सुप्रिया, विक्रम, अश्विनीमामी..
.. मलाही १२% वगैरे जरा धोकादायकच वाटते आणि डी एस के सुद्धा.

३०% ते ५०% रक्कम (एकूण ठेव रक्कमपैकी) चांगल्या नामांकनच्या खासगी संस्थेत गुंतवू शकता.. अधिक व्याज, कमी काळ आणि जोखमी शेअर बाजारापेक्षा कमी... रिअल इस्टेट/ सहकारी पतपेढीत ठेवू नका...

मी टाटा मोटर मध्ये एक लाख ठेव २००९ मध्ये ठेवली होती.. तीन वर्षानी मला सुमारे १,४०,००० मिळाले.. १२% वार्षिक (तिमाही/सहामाही व्याज) होते..

fd.jpg

Dont go for any Company Deposite. Place 50% in Nationalised Bank & remaining 50% in at least 3 different Co-operative Banks to mitigate the Risk

श्रीराम ट्रान्सपोर्ट १२.५० टक्के देत आहे. ५ वर्ष
मुथूट फायनान्स १२.५० टक्के देत आहे.५ वर्ष
रॅलिगेअर १२.५० टक्के देत आहे.५ वर्ष

हे सर्व क्रिसिल ने रेट केलेले आहेत. शिवाय हे ट्रेड होतात.

टाटा पावर बॉन्ड १०.७५%, १० वर्षांसाठी.

लोकमान्यबद्दल मला काही विशेष माहिती नाही पण DSK आणि PMC मध्ये ठेवायला काहीच हरकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे DSK सुरवातीलाच पोस्ट डेटेड चेक्स देतात. शिवाय कार्पोरेटसना अश्या ठेवी घेण्याआधी काही परवानग्या घ्याव्या लागतात. रिस्क कमी करण्यासाठी विभागून दोन्हीकडं ठेवू शकता.

<<<<श्रीराम ट्रान्सपोर्ट १२.५० टक्के देत आहे. ५ वर्ष>>>>>

+१००

माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे.

अश्विनीमामी +१००
माझ्या आईने सुद्धा असेच शेजार्‍यांचे, नातेवाईकांचे सल्ले ऐकुन एका को ऑप सोसायटी आणि एका पतपेढि मधे पैसे टाकले. या दोन्हिच्या पुणे, मुंबई ठिकाणि बर्‍याच ब्रॅंचेस होत्या. या लोकांनि शेअर होल्डर सुद्धा करवुन घेतले सांगुन कि काहिहि झाले तर तुम्हि शेअर होल्डर त्यामुळे तुम्हाला सगळे पैसे परत मिळतिल. आणि आता दोन्हिहि संस्थाना टाळे लागलेले आहे. जवळ जवळ १० लाख बुडाले.आता हे पैसे कधि मिळतिल कि नाहि माहित नाहि.थोड्या जास्त व्याजाकरता मुद्दल सुद्धा गमावलि.
पोस्टाचि सुद्धा चांगली स्किम आहे त्यात टाका नाहि तर कोणत्याही राष्ट्रियीकृत बँकेतच टाका पैसे.

अश्विनीमामी +१००
१ , २ टक्क्यांच्या मोहाने मुद्दल धोक्यात घालू नये असे वाटते.

टाटा पावर बॉन्ड १०.७५%, १० वर्षांसाठी. हे कसे गुन्तवायचे? >>> टाटा पावर ऑफिस मध्ये किंवा कुठल्याही डिमॅट अकाउंट मधून घेता येतील. हे १० वर्षांसाठी असल्यामुळे मला खूप चांगले वाटतात. कारण १० वर्षानंतर १० टक्के व्याज असणार नाही. जसे जसे आपण प्रगत होऊ तसे तसे व्याज दर कमी होणार.

जसजसे व्याजाचे दर अथवा परतावा वाढत जातो तसतशी ठेव अधिक अन्सेक्युअर्ड होत जाते हा साधा व्यावहरिक नियम आहे... पोस्टात सगळ्यात कमी व्याज पण देश बुडाला तरच ठेव बुडते... शेअरबाजारा सगळ्यात जास्त परतावा (मिळू शकतो)पण एका दिवसात लाखाचे बारा हाजार (होऊ शकतात !)

<<<<श्रीराम ट्रान्सपोर्ट १२.५० टक्के देत आहे. ५ वर्ष>>>>>
+१००

माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे.>>>>>>
माझाही. Happy

<<<<श्रीराम ट्रान्सपोर्ट १२.५० टक्के देत आहे. ५ वर्ष>>>>>
+१००

माझा वैयक्तिक अनुभव चांगला आहे.>>>>>>
माझाही.

माझाही. शिवाय फडणिस ईन्फ्रास्ट्रक्चर पण चान्गली आहे.

मी २०१२ मध्ये पिपीएफ मध्ये पैसे गुंतविले आहेत.याचा पुढिल हप्ता दरवर्षी कधि भरायचा असतो.कृपया कोणि जाणकार सांगतील का?

पीपीएफ मध्ये महिन्याला भरले तरी चालते मिनिमम ५०० . ( बहुतेक) पीपीएफ चा फायदा हा की व्हेरीएबल अमाऊंट भरु शकतो .

पीपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात कमीतकमी ५०० आणि जास्तीत जास्त ७० हजार भरता येतात. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १२ वेळा पैसे भरू शकता.

धन्यवाद दिपु आणि मनिष
पण ते आर्थिक वर्ष एप्रिल पासुन येते ना! काहीतरि १ ते ५ तारखेपर्यंत पैसे भरावे लागतात ना? :अओ:नाहीतर दंड बसतो मला नक्की माहीत नाहि अशिच ऐकीव माहिती म्हणुन इथे प्रश्न विचारला

PPF मधे वर्षभरात कमीत कमी ५०० नै भरले तर दंड बसतो. एका वर्षात जास्तीत जास्त १लाख भरु शकता. व्याज मंथली कअॅलक्युलेट होतं. त्यामुळे महीन्याच्या ६ तारखेच्या आत पैसे भरावे. त्यानंतर भरले तरी चालतं, फक्त त्यामहीन्याचं व्याज मिळणार नाही.

अस्मिता धन्स. .हे माहित नव्हते. ६ च्या आत भराय्चे. जर समजा आपण एखाद्या महिन्यात ६ नंतर भरले तर ते व्याज पुढं च्या महिन्यात कॅल क्युलेट करतात का?

@दिपु हो ६ तारखेनंतर भरले तर पुढच्या महीन्यापासुन व्याज मिळेल.
तसेच अकाउंट काढुन ६ वर्ष झाली की पार्शल विड्रॉवल करता येतं.. वर्षातून एकदा.. जे FY चालुय त्याच्या ३वर्ष आधीच्या FY मधे जेवढी रक्कम होती त्याच्या ५०%

धन्यवाद दिपु आणि अस्मिता
मला काय म्हणायचे आहे तुम्हाला कसे सांगु? बँकेत पण असेच उत्तर देतात त्यामुळे मी पुर्ण कन्फुज झाले आहे.मी आता एप्रिल २०१२ ला काहि रक्कम भरलि त्यानंतर मी काहिच रक्कम भरली नाहि.साधारण किति काळापर्यंत रक्कम भरली नाहि तरि चालते? जर मी एप्रिल २०१३ पर्यंत काही रक्कम भरलीच नाही, तर नविन आर्थिक वर्षाचे दंड बसेल ना? की मी पंधरा वर्षे काहिच वार्षिक रक्कम भरलि नाहि तर प्रत्येक वर्षिचे दंड बसेल ना? Uhoh

एप्रिल २०१२ ला ५०० रु रक्कम भरली त्यानंतर मार्च १३ पर्यँत काही भरलं नाही तरी चालते.
नंतर एप्रिल १३ ते मार्च १४ दरम्यान कधीही ५०० भरावे लागतील नाहीतर दंड बसेल.

अविगा.. जर तुम्ही एप्रिल २०१२ मध्ये २०१२-१३ आर्थिक वर्षासाठी काही रक्कम (समजा क्ष रक्कम जी ५०० पेक्षा कमी आहे) भरली असेल तर या महिन्यात (मार्च २०१३), ५००-क्ष एवढी रक्कम भरा म्हणजे या आर्थिक वर्षाचे ५०० होतिल आणि तुम्हाला पुढच्या वर्षी काहीही दंड भरावा लागणार नाही.
उदा. एप्रिल २०१२ मध्ये २०१२-१३ या वर्षासाठी भरलेली रक्कम = रू. २००
या महिन्यात भरावी लागणारी रक्कम - ५००-२०० = रू. ३००.

जर तुम्ही एप्रिल २०१२ मध्ये आधिच्या आर्थिक वर्षासाठीचे (२०११-१२) पैसे भरले असतील तर या महिन्यात तुम्हाला कमीत कमी रू.५०० भरावे लागतील नाहीतर पुढच्या वर्षी परत दंड अधिक कमीत कमी ५०० असे भरावे लागतील.

जर मी एप्रिल २०१३ पर्यंत काही रक्कम भरलीच नाही, तर नविन आर्थिक वर्षाचे दंड बसेल ना? >> तो दंड जुन्या आर्थिक वर्षाचा असेल (२०१२-१३).

की मी पंधरा वर्षे काहिच वार्षिक रक्कम भरलि नाहि तर प्रत्येक वर्षिचे दंड बसेल ना? >> रक्कम भरायचीच नसेल तर पीपीएफ अकाउंट काढतायच कशाला? Happy

मनिष धन्यवाद
की मी पंधरा वर्षे काहिच वार्षिक रक्कम भरलि नाहि तर प्रत्येक वर्षिचे दंड बसेल ना? >> रक्कम भरायचीच नसेल तर पीपीएफ अकाउंट काढतायच कशाला? स्मित>>>>मी सहज विचारले मी अकाउंट काढले आहे एप्रिल २०१२ मध्ये बॅकेमध्ये माहिति काहि व्यवस्थित सांगत नाहि Sad

Pages