श्रीकृष्ण - अ‍ॅक्रिलिक रंग वापरून काढलेले चित्र

Submitted by यशस्विनी on 8 September, 2012 - 08:13

अ‍ॅक्रिलिक रंग वापरुन काढलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र...... या चित्रासाठी मी खास अ‍ॅक्रिलिक रंगासाठी वापरायचा जाड कागद वापरला आहे...... आतापर्यंत काढलेल्या चित्रांमध्ये मला हे चित्र सर्वात जास्त आवडले .... हे चित्र मी फ्रेम करुन घेणार आहे...... Happy Happy

539238_448824785162480_2097521496_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..!

खुप छान बासुरी खुप छान जमली आहे.
माफ करा थोड सांगावस वाटत उजव्या बाजुच जस कपाळ दिसते आहे तसा थोडा गाल दिसला असता तर अजुन छान वटल असत.

वर्षा, फेट्याचे व बासरीचे शेडींग खासच!!! बासरी अप्रतिम!!!! सुंदर आल्हाददायक निळा रंग वापरला आहे. मस्त!

वर्षा, मनीष कदमांचं बरोबर आहे, पण फार आवडलं ग चित्र. एक गाणं आठवतंय कृष्णाच्या या
close-up मधल्या acceesories ( :)) बासरी अन मोरपीस) वरती . ऐकवेन कधीतरी.

जाड कागदाबद्दल लिहिलेस, तू कॅनव्हास वर काढतेस का ?

सुंदर !
मलाही फेटा आणि बासरीचे रंग आवडले. Happy
कदाचीत गालावर जरा जास्त उजेड आलाय..

धन्यवाद सर्वांना Happy

भारती ताई जाड पेपर म्हणजे कॅनव्हास नाही वापरला आहे..... मी Daler-Rowney ब्रॅन्डचे Acrylic Paper चे (230g/m2, 140 Ibs) स्केच पॅड घेतले आहे. कागदाचा टेक्स्चर थोडाफार कॅनव्हास सारखाच खडबडीत आहे व जाडी देखील चांगली आहे. आतापर्यंत साधे स्केच बुक वापरुन चित्र काढली त्यामुळे अश्या स्केचबुकचा वापर करताना मस्त वाटत आहे.

व्वा !!! फारच छान.... वर्षा.. दिवसें दिवस हात बसत चालला तुझा!!!!

मला सगळ्या चित्रात हे फारच आवडले ( मीरेला क्रुष्ण आवडणारच म्हणा !!!!)

त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव खुप छान आले आहेत