तो नि ती.....

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 September, 2012 - 04:13

तो एक आनंदघन....
ती जिवंत समर्पण

तो प्रशस्त राजमार्ग....
ती जोड्णारी पाऊलवाट

तो अखंड झंझावात...
ती ग्रीष्मातील झुळूक शांत

तो प्रचंड उल्कापात....
ती संथ तेवणारी ज्योत

तो पावसाची जोरदार सर....
थेंबाथेंबात तिचा वावर

तो उंच पर्वत-शिखर....
ती पायथा भरभक्कम

तो गगनातील मुक्त विहंग....
ती घरट्याच्या उंबरठ्यावर

तो प्रगल्भ विचारवंत...
ती नटखट हरणी चंचल

तो उदयाचा दिव्य ध्यास....
घरा-दाराला तिचाच भास

तो टवटवीत फ़ुलांची बाग...
तिचाच गंध निशीगंधास

स्वप्नपूर्ती तिची त्याच्या डोळ्यात...
उशाला मात्र हवा त्याला तिचाच हात !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

Happy

शब्द रचना, विचांराचा ओघ, दोन्ही एकदम. Amazing.
There is a punch to it.
कविता आवडली हे सांगण्याची गरज आहे का ?
अजय सरदेसाई (मेघ)
meghvalli.blogspot.com