भोलागडी ......................!भाग ४

Submitted by श्रीमत् on 7 September, 2012 - 15:06

समोरील द्रुश्य पाहुन पाटील आता फक्त चक्कर येउन पडायचाच बाकी होता. भीतीने त्याचे हात पाय थरथर कापु लागले. एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. कोण असतील ही माणसं? नक्की माणसचं की? आणि तसच आसलं तर ईथ घळीजवळ काय करतायत? तेवढ्यात त्याच लक्ष घळीतल्या प्रकाशाकडे गेलं त्या मिनमिनत्या प्रकाशात आज ऋषी आईची शेंदरी मुर्ती जास्तच रागीट दिसत होती.

ही आगळ्या वेगळ्या पेहरावातली माणसं, त्यांच वाद्य, त्यातुन उमटणारा नादमय आवाज आणि त्या नादावर त्यांची संथ चाललेली हालचाल सार काही विलक्षण. डोक्यावर बांधलेल्या घोंगड्यामुळे जरी त्यांचे चेहरे दिसत नसले तरी चंद्राच्या शीतल चांदण्यात त्यांच्या सावल्या भयान वाटत होत्या. ते फिरत असताना अस वाटत होतं जणु काही प्रत्येक सावली दुसर्या सावलीला गिळंक्रुत करतेय. एवढ्यात अचानक घळीवर बसलेल्या पांढर्‍या घुबडाने मान फिरवत घुगुत्कार केला तसा पाटील झाडीत चाचपडला.

त्या आवाजामुळे रिंगणात बसलेल्या दोघांपैकी एकाने हळुच आपला उजवा हात वर केला. तसे सर्व फिरायचे थांबले. संपुर्ण वातावरणात गुढ शांतता भरुण गेली. तेव्हा मगाच्याच माणसाने हळुच पाटील उभा असलेल्या दिशेने आपली मान वर केली. घोंगड्याच्या आवरणामुळे जरी त्याचा चेहरा पाटलाला दिसत नसला तरी त्याची "ती" तिक्ष्न नजर पाटलाला जाणवली. जणु काही त्या नजरेणे त्याचा ठाव घेतला असावा. आणि परत एकदा घुबडाने जोरात पंख फडफडत घुघुत्कार केला तसा तो इसम त्वेषात ओरडला. "सावज आलय"............".जा धरा त्याला". त्याचे हे विखारी शब्द कानावर पडताच पाटील जीव घेउन काटे कुटे तुडवत गावच्या दिशेने पळत सुटला.

सार गाव झोपेच्या आधीन असताना मध्यरात्री पुन्हा तीच काळीज हेलावणारी किंकाळी सार्‍या आसमंतात भरुन गेली. किंकाळीच्या आवाजाने तात्यांना जाग आली पाहातत तर काय सुमण केस मोकळे सोडुन झप झप पावलं टाकीत बाहेरच्या दिशेने निघाली होती. आज त्यांनी तिचा पाठलाग करायच ठरवल. क्षणाचाही विचार न करता तात्या तिच्या मागे चालु लागले. सारा गाव भितीच्या गोधडीत शांत झोपला होता. सुमन वरचा आवाड ऊतरुन खाली शाळेपाशी आली व अचानक थांबली जनु तिला तिच्या मागावर कुणीतरी आहे ह्याची माहीती असावी. तिने एका झटक्यात मागे वळुन पाहीले. तसे तात्या चपापले. तेच रोखुन बघणारे डोळे आणि ओठांवर छद्मी हास्य. ऐन गारव्यातसुदधा तात्यांच्या कपाळावर घाम साचु लागला. तात्या तिला दिसणार नाहीत अशा रीतीने तिचा पाठलाग करत होते त्यामुळे जशी सुमन थांबली तसेच ते ही कमाणीच्या बाजुला असलेल्या चक्कीजवळ अंग चोरुन उभे राहीले. सुमन ने आज काळी साडी घातली होती पौर्णिमेच्या चांदणात तिचा नितळ गोरा रंग जास्तच उठुन दिसत होता. कपाळाला भल मोठ कुंकु, हातात हिरव्या बांगड्या आणि चालताना तिच्या बांगड्यांचा आणि पैजणांचा होणारा नादमय आवाज सार काही विलक्षण.

सुमण पुन्हा भोलागडीच्या दिशेने चालु लागली आणि मंदीराच्या पुढे जाताच अचानक दिसेनाशी झाली. पाठलाग करत करत तात्या मंदीरासमोर आले. आजुबाजुची भयाण शांतता सोडली तर तिथे कोणीच नव्हतं. अंधारात मंदीरा समोरचा आज्याबा आज जास्तच अक्राळ विक्राळ दिसत होता. त्याच्या प्रत्येक पारंबीत त्यांना नाना आकार दिसत होते. ईतक्यात मध्येच भोलागडीच्या दिशेने त्यांना कोल्हेकुई ऐकु आली. चपापुन त्यांनी झाडीत त्या दिशेने पाहीले असता. त्यांना पुन्हा तेच रागाने तांबारलेले डोळे दिसले. जे त्यांच्याकडेच रोखुन पाहात होते. हळु हळु त्या डोळ्यांची आक्रुती मोठी होत- होत त्यांच्या दिशेने वेगाने सरकायला लागली. तात्यांची बोबडीच वळायची बाकी होती. त्यांनी तडक घरच्या दिशेने धुम ठोकली.

घरात येताच त्यांनी तडक दाराची कडी लावुन दिवा लावला. आणि समोरील द्रुश्य पाहुण ते अचंबित झाले कारण सुमण हॉलमधल्या सोफ्यावर शांत झोपली होती. मग आत्ता आपण जिचा पाठलाग केला ती कोण होती. भीतीने त्यांचे हात पाय थरथर कापायला लागले. त्यांना आपण किती मोठ्या संकटातुन वाचलो आहोत याची जाणीव झाली.

घळीची पायवाट जिथुन सुरु होते तिथेच साबळे हनुमान चालीसा बोलत उभा होता जवळच्याच मोठ्या दगडावर चढुन तो पाटलाची वाट बघत बसला. समोर सारं गाव शांत निजलेल त्याला दिसत होतं. त्याला आता स्वताचाच राग येत होता. घरी गप्प सुरक्षित झोपायच सोडुन इथे असल्या भीतीदायक वातावरणात उगीचच आलो आपण. त्यात मगाशी जरा लघवीसाठी हलकं व्हायला झाडाच्या मागं गेलो तर पाटील त्याच्याच तंद्रीत पुढं निघुन गेला. आपली काय टाप झाली नाय त्याच्या माग जायची. त्यात काहीवेळापुर्वीच त्यानेही "ती" किंकाळी ऐकली होती. आणि थोड्याचवेळात तात्या त्याला चक्कीच्या ईथुन धावत पळत वरच्या आवाडात येताना दिसले. एवढ्या रात्री आणि तात्या आसं का घराबाहेर पडल्यात? का सुमीच काही? नक्कीच काहीतरी झाल आसल पाहीजे. तो दगडाच्या जरासा खाली उतरुन तात्यांच्या घराकड पाहु लागला.

इतक्यात हळुच आपला हात कोणीतरी साबळेच्या पाठीवर ठेवला. तसं दचकुण त्याने मागे पाहील. दोन तांबारलेले डोळे त्याच्याकडेच रोखुण पाहात होते. त्या भयान शांततेत असलं भयानक रुप पाहुण देनबाने तिथेच डोळे फिरवले. आणि क्षणात बेशुध्द होऊन त्या दगडावरच तो आडवा झाला.

थोड्याचवेळात घामाघुम अवस्थेत पाटील तिथे येऊन पोहचला. त्याचा लेंगा दोन तीन ठिकाणी फाटला होता. पाय ठेचाळल्यामुळे बोटांमधुन रक्त वाहात होतं. त्याने परत मागे वळुन पाहील सार काही शांत होतं मनोमन त्याने केदारबाचे आभार मानले. आता त्याला कोणत्याही परिस्थितीत ईथे थांबायचे नव्हते. आता जरी आपल्या मागे कुणी नसलं तरी नक्कीच कुणीतरी आपल्यावर नजर ठेउन आहे याची त्याला जाणीव झाली होती.

जसा घाई घाईत तो खाली उतरणार तसं बाजुच्या दगडावर त्याला कोणीतरी पालथ पडलेलं दिसलं सुरवातीला त्याला जाम भीती वाटली पण कपडे ओळखीचे वाटल्यामुळे त्याने जवळ जाऊन पाहीलं. "आरं देवा! हा तर देनबा " पाटील हळुच ओरडला" साबळे निपचित पडला होतां श्वासही मंदपणे चालु होता. पाटलाने क्षणाचाही विलंब न लावता पायातली चामड्याची चप्पल काढली आणि साबळेच्या नाकाला लावली. तसा हुक भरल्यासारखा एक दिर्घ श्वास साबळेने घेतला आणि तो शुदधीवर आला. त्याच्या अंगात आता अजिबात त्राण उरले नव्हते. डोळे किलकिले करुण त्याने पाटलाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. तसा पाटलाने हातानेच त्याला शांत राहण्याचा ईशारा केला. हळुच आधार देऊन त्याने साबळेला ऊठवले. दोघांनाही जमेल तितक्या लवकर आता घरी पोहचायचे होते.

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीमत साहेब,
कथा वाचायला खूप मजा येत आहे.......पण
Please मोठे भाग प्रसारित करा........
>>>>>>> +११११११११११११ आणि पुढील भाग पटापट टाका नाहीतर लिंक तुटते.

श्रीमत साहेब,
कथा वाचायला खूप मजा येत आहे.......पण
Please मोठे भाग प्रसारित करा........
>>>>>>> +११११११११११११ आणि पुढील भाग पटापट टाका नाहीतर लिंक तुटते. >>>>> अगदि अगदि!

महेश, आबासाहेब आणि भानुप्रिया.
तुमच्या प्रेमळ दमाबद्दल..........
मनापासुन आभार! Happy

@ मेंढका, तुमच्या ऊत्सुकतेबद्दल आभार,
आता तुमच्यासाठी तरी मला वेळात वेळ काढुन पुढचा भाग टाकलाच पाहीजे.

Happy

तुमच्या प्रेमळ दमाबद्दल..........
मनापासुन आभार! >>>> दम नाही हो आग्रह समजा. कथानकाचा काहीच अंदाज येत नाहीए त्यामुळं खुप उत्सुकता आहे. समजुल घ्याल अशी आशा करतो Happy

आबासाहेब नक्की! पण हल्ली ऑफिसमुळे रोज घरी जायला उशीर होत आहे.
तरीही लवकरात लवकर पुढचा भाग टाकेन!

Happy