अंधारु

Submitted by चाऊ on 7 September, 2012 - 06:50

मन आषाढ सावळं
जसं भिजलं पाखरु
गोड वाटतो पाऊस
चित्त कसे मी सावरु

मोद बेभान धारांचा
भेदणा-या शरांचा
कोसळता त्याच्या संगं
वेग कसा हा आवरु

मोर नाचतो, नाचतो
त्याला आवाजाची तीट
सहस्त्र-नेत्र पिसारा
पाहे सयांना पुकारु

फुटे बांध, वाहे नीर
लोंढा तसाच मनात
जाऊ असाच वाहून
की, वाचवू ही तारु?

वीज कडाडे लखाख
क्षणभर दिसे सारे
जसे यावे तू, मनात
चित्त आनंदे मोहरे

तुझ्या सवे तो सावन
तुझ्याविना तो वैशाख
तुझ्या सोबतीची वीज
पुन्हा उधळेल वारु

पुन्हा आला हा पाऊस
पुन्हा येशील का तू?
पुन्हा प्रश्न हे मनात,
पुन्हा लागले अंधारु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाऊ... अतिशय छान कविता. यमकांच्या साह्याने लयबध्दता छान साधली आहे. परंतू तुमच्या या रचनेला अधीक परीपुर्णता यावी म्हणून मला काही बदल/ त्रूटी जाणवल्या त्या खालीलप्रमाणे --------

कोसळता त्याच्या संगं ----- संगे
वेग कसा हा आवरु

तूझ्या सवे तो सावन
तूझ्याविना तो वैशाख
तूझ्या सोबतीची वीज
पुन्हा ऊधळेल वारु.... ................इथे यमक जुळाले नाही

वीज कडाडे लखाख
क्षणभर दिसे सारे
जसे यावे तू, मनात
चित्त आनंदे मोहरे

तूझ्या सवे तो सावन
तूझ्याविना तो वैशाख
तूझ्या सोबतीची वीज
पुन्हा ऊधळेल वारु

पून्हा आला हा पाऊस
पून्हा येशील का तू?
पून्हा प्रश्न हे मनात,
पून्हा लागले अंधारु

लाजवाब!

तन्मय झालेली छानच कविता. पण शुद्धलेखनाकडे लक्ष हवंच. तूझ्या नाही, तुझ्या,पून्हा नाही,पुन्हा,ऊधळेल नाही ,उधळेल,वगैरे वगैरे.
ले.शु.