ना माणसात माणूस.........

Submitted by सुधाकर.. on 6 September, 2012 - 13:03

ना माणसात माणूस, ना घरात घरपण उरले
का अश्मयुगाचे पुन्हा, हे आदिम वारे फिरले?

बगल देऊनी जाती, ते सगे सोयरे सारे
नात्यांचे तरी धागे, मी उगाच ताणून धरले

अंक नाटकासारखे, हे जगणे तुझे नि माझे
ऐलापासून पैला, जग सोंगाड्यांनी भरले

ना आभाळ माझे हे, ना तुझे चांदणे तेही.
आलो होतो मोकळे, अन तसेच जाणे ठरले.

ते गीत सुधाकरीचे का कुणास नाही कळले?
गाणार्‍याचे गीतही, का असेच जगणे सरले?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा रे वा ऑर्फी मस्त रे

काही जागी वृत्तात बसवावे लागेल बरका
मक्त्यात गाण आसे झालेय त्याचे गाणे असे कर पाहू आधी

सुधाकर,
ना माणसात माणूस, ना घरात घरपण उरले
का अश्मयुगाचे पुन्हा, हे आदिम वारे फिरले?
या पहिल्या दोन ओळीत अपेक्षा उंचावल्या जातात.

एक दोन ठिकाणी वैभवने म्हटल्याप्रमाणे वृत्तदोष येतोय.

'नाटकीय अंकांसम जणू हे जगणे तुझे नी माझे' असे केले तर??
आणि ' नव्हते आभाळही माझे, ना तुझे चांदणे तेही' ..

शेवटचे कडवे पुनः लिहिले पाहिजे.

पण चमकदार लेखन. शुभेच्छा.

सर्वांचे मनपुर्वक आभार.
................................................

धन्यवाद भारतीजी,

आपले म्हणणे मला पटते परंतू गझलेलेचे काही नियम असतात.
.......... शेवटची द्विपदी बदलली आहे.

परंतू गझलेलेचे काही नियम असतात.>>>>

भारतीताई गझललेखन करत नाहीत म्हणून त्याना गझलेतले फारसे माहीत नसावे असा कयास बान्धणे हा केवळ अज्ञानातून निर्माण झालेला गैरसमजच ठरेल बरका ऑर्फी... (मी हे निरीक्षण माझ्या वैयक्तिक अनुभवावरून नोन्दवत आहे )
असो !!
तसेही तू म्हणतोस त्या प्रमाणे ; की गझलेलेचे काही नियम असतात हे विधान या ठिकाणी मला गमतीचेच वाटते आहे या रचनेतही , गझलेचे जे अत्यन्त बेसिक नियम आहेत तेच काटेकोरपणे पाळले गेले नाहीयेत .

माझा हा प्रतिसाद ; मी विरोधकाच्या भूमिकेतून लिहिला नसून हितचिन्तकाच्या भूमिकेतून लिहिला आहे याची प्लीज नोन्द घ्यावी !

-वैवकु

मि.वैभू----
भारतीताई गझललेखन करत नाहीत म्हणून त्याना गझलेतले फारसे माहीत नसावे असा कयास बान्धणे हा केवळ अज्ञानातून निर्माण झालेला गैरसमजच ठरेल बरका ऑर्फी...

-----------------------> आसा कयास मुळात कोणी बांधलेलाच नाही वैभू.

(ता.क. मला माझ्या आयुष्यात गैरसमज करून घेणार्‍या लोकांची जितकी भिती वाटते तितकी इतर कशाचीही वाटत नाही.)

सुधाकरा!
तुझी गझल वाचली. खयाल आवडले. पण, अभिव्यक्ती अजून जोरकस व्हायला हवी. वृत्तात सफाई यायला हवी. वृत्तदोष नसावा. मतल्यात एकदा वृत्त ठरले (अक्षरगणवृत्त वा मात्रावृत्त) की, मग सगळे शेर त्याच वृत्तात लिहिता यायला हवेत.

तुझी ही गझल मात्रावृत्तातील आहे. १४+१४=२८मात्रा प्रत्येक मिस-यात असायला हव्यात. मात्रांचा हिशेब चुकला की, लय चुकते, जे कानास बोचरे वाटते.

तुला एक सुचवू का? तू प्रथम अक्षरगणवृत्तातच लिही. मात्रावृत्तात लिहू नकोस. कारण अक्षरगणवृत्तामुळे लिखाणास एक शिस्त लागते, लय समजते. एकदा का अक्षरगणवृत्ते हातात बसली की, मग खुशाल मात्रावृत्त वापरीत जा.

मात्रावृत्ते दिसायला सोपी असतात. पण, लय जाणणे, व जपणे हे महत्वाचे असते, जे सरावाने कुणासही जमते. पण, त्यासाठी अक्षरगणवृत्तावर पहिल्यांदा पकड मिळवावी, म्हणजे लयीचे, यतीचे ज्ञान होते व मग मात्रावृत्ताकडे वळावे. एकदा का मात्रावृत्तातील लय आत्मसात झाली की, मग मात्रा देखिल मोजाव्या लागत नाहीत. आपला कानच तयार होतो. कुठेही लय वा मात्रासंख्या चुकली की, गुणगुणताना आपल्याच कानाला ते प्रथम खटकते!

सरावाने अख्खे मिसरेच्या मिसरे विनासायास ओठांवर येतात, ज्यातील मात्रा व लय आपोआप जपली जाते. यासाठी हवा नियमित लिखाणाचा रियाज, सबूरी, व थांबायची तयारी!

अजून एक महत्वाची गोष्ट..............

खयाल सुचला की, लगेच तो शब्दबद्ध करण्याची घाई करू नये. तो खयाल मनात मुरू द्यावा. त्यावर सखोल चिंतन करावे. अनुरूप प्रतिके आपोआप सुचतात. मग तयार होणा-या शेरातील मिसरे आपोआप एकजीव होतात व एक कामयाब शेर जन्मास येतो.
शेर काय, गझल काय, कविता काय यांना जन्मास घालायचे नसते, तर जन्मू द्यायचे असते. बळजबरीने, उतावीळपणे, शब्दांच्या प्रेमात पडून, सिझेरियन करून गझलेला जन्माला घालायचे नसते. गझल/शेर वेळ आली की, आपोआप जन्मास येतात! पण त्यासाठी हवे सखोल चिंतन, शब्दांची जाण व प्रामाणिक अनुभूती!
तूर्तास इतकेच लिहितो व थांबतो!

तुझ्या या गझलेतील मिस-यांत मात्रांची संख्या बदलताना दिसते. तसे करणे टाळावे. तो एक मोठा दोष मानला जातो. असो.

आता तुझी ही गझल मी कशी वाचली ते पहा............

माणूस नसे उरलेला! ना घरास घरपण उरले!
हे अश्मयुगाचे वारे मागे तर नाही फिरले?

पाहून पाहिले नाही.....करतात सोयरे आता;
मी सगेसोयरे म्हटले, अन् गृहीत त्यांना धरले!

तू कोण? कोण मी आहे? नाटकातले अभिनेते!
जग इथून तिथून सारे हे सोंगाड्यांनी भरले!!

हे स्थावरजंगम सारे ना तुझे, तसे ना माझे!
हाताने रित्याच आलो! अन् रिते जायचे ठरले!!

कनवटीस काही उरल्या, दोन चार गझला अंती!
कळले न सुधाकराला की, जगणे केव्हा सरले!!
...........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................

देवसर,
आपल्या अमुल्य मर्गदर्शनाबद्दल खुप खुप धन्यवाद.
सिझेरियन करून गझलेला जन्माला घालायचे नसते Happy अगदी खरे.
आपली प्रत्यक सुचना मी नेहमीच पाळण्याचा प्रयात्न करेन.

प्रत्येक हा शब्द तू प्रत्येकवेळी प्रत्यक असा का लिहितोस रे ऑर्फी...........!
____________
देवसर धन्यवाद अत्यन्त मोलाचे मार्गदर्शन आमच्या मित्रास केलेत त्याबद्दल
पण त्याच्या लेखनातील त्रुटी जी मल जाणवली ती अशी की त्याला बहुधा आपण जेन्व्हा लय या बद्दल कही सान्गतो तेन्व्हा त्यास बहुधा सान्गितीक लयी शब्दाधारीत लयी यातील सम्भ्रम होत असावा कारण आजवर तो कधीही एखादी लगावली पाळताना मलातरी दिसला नाही (उलट तो त्याच्या गझलेस एक लय आहे असे अनेकदा म्हणाला आहे असे मला स्मरते आहे )

सन्गीतकार सुर ताल लय याची भाषा बोलतात गझलकार "ल गा "ची भाषा बोलतात हा मूलभूत फरक अजून त्याच्या मष्तिष्कात कोरला गेला नाही असे दिसते

याबाबत आपण त्यास अधिक सान्गावे अशी माझी विनन्ती आहे देवसर

धन्यवाद !!!

(उलट तो त्याच्या गझलेस एक लय आहे असे अनेकदा म्हणाला आहे असे मला स्मरते आहे) वैभू मी तुझ्या स्वप्नात पण येतो काय रे असे भलते सलते बोलायला. आणि सांगीतीक लय व शब्दाधारीत लय याचे मला सहोदारण स्पष्टीकरण देशील काय?

(उलट तो त्याच्या गझलेस एक लय आहे असे अनेकदा म्हणाला आहे असे मला स्मरते आहे) वैभू मी तुझ्या स्वप्नात पण येतो काय रे असे भलते सलते बोलायला. आणि सांगीतीक लय व शब्दाधारीत लय याचे मला सहोदारण स्पष्टीकरण देशील काय?<<<

सहोदारण म्हणजे काय? सहोदर म्हणजे भाऊ, एवढे माहीत आहे.

वैभू मी तुझ्या स्वप्नातपण येतो काय रे? <<< Biggrin

ऑर्फीयस, मात्राभंग काही ठिकाणी झालेला आहे, खरे तर अनेक ठिकाणी, तो एकदा तपासून घ्यावात अशी नम्र सुचवणी, कृपया गैरसमज नसावा Happy

-'बेफिकीर'!