काय करायचाय तो 'इतिहास ' हा विषय?

Submitted by मी-भास्कर on 6 September, 2012 - 05:00

काय करायचाय तो 'इतिहास ' हा विषय?
इतिहासात घडलेल्या गोष्टींवरून कायम वादविवाद चालू असतात. कांही वेळा ते विकोपाला जातात. अशा वेळी वेगवेगळ्या मतांचा अगदी महापूर येतो.
कांही ठळक मते :
(१) कशाला उकरून काढायची ही इतिहासाचि मढी? वर्तमानात जगावे आणी भविष्याची स्वप्ने पहावीत. त्यासाठी कशाला लागतोय इतिहास?
(२) इतिहासातून बोध घ्यावा,वर्तमानात जगावे आणि उज्वल भविष्यकाळासाठी प्रयत्न करावेत.
(३) इतिहास नसेल तर तुम्ही प्रेरणा कोठून घेणार? तेव्हां भविष्यकाळ उज्वल करायला इतिहासातूनच प्रेरणा मिळत असते.
(४) केवळ वर्तमानातच जगावे इतिहासाचाही विचार नको आणि भविष्याचीही चिंता नको.
हा चिंतामुक्त करणारा चौथा पर्याय आकर्षक आहे खरा. पण तसे प्रत्यक्षात जगणे 'सोमरस सरोवरात आकंठ बुडालेल्या' सज्जनांनाच जमला तर जमत असावा.
आणखी कितितरी विविध मतमतांतरे! वादावादी! प्रसंगी मुद्द्यावरुन गुद्द्यापर्यंतचा प्रवास देखिल!
हे सर्व पाहिल्यावर वाटते कि कशाला हवाय तो इतिहास?
असे म्हणावे तर आत्मचरित्रे हा त्या त्या व्यक्तिचा इतिहासच ना? आणि तो भलाभल्यांनी लिहून ठेवला आहे. संस्थांना ५०, १०० वर्षे झालि कि का घेतात त्या संपूर्ण कालाचा ऐतिहासिक आढावा?
गावाचा , किल्ल्यांचा, देशाचा, जगाचा, भाषेचा , विश्वनिर्मितीचा , वैज्ञानिक प्रगतीचा आणि कशाकशाचा इतिहास माणसांना अभ्यासावा का वाटतो? याचा अर्थ गतकालाचे 'सिंहावलोकन' करणे [इतिहास जाणून घेणे] हा माणसाचा निसर्गदत्त स्वभाव आहे.
थोडक्यात
(१) माणसांना इतिहास अभ्यासावा वाटतो हे तर खरे! पण असे वाटायचे कारण काय? असे वाटणे योग्य आहे का? त्याचा कांही उपयोग आहे का? माणूस लिहुवाचू शकत नव्हता तेव्हां त्याचे कुठे अडले इतिहासावाचून? तेव्हां तर आजोबाने मुलाला-नातवाला सांगितलेल्या गोष्टी अशा सांगोवांगीतूनच पुढे जात राहाणार. त्यांच्यात कितिशी अचूकता राहाणार?
(२) अभ्यासायचाच असेल तर तो कसा अभ्यासावा? कोणीतरी इतिहासाचे संशोधन करणार आहे तेव्हा त्यांना अडचण येऊ नये हे लक्षात घेऊन इतिहास घडत नसतो. त्यामुळे इतिहास लिहितांना कोर्टात दिला जातो तसा पुरावा अस्तित्वात असतोच असे नाही. जितका काल जुना तितका तुटपुंजा पुरावा. त्यामुळे तर मतभेदांचा महापूरच. या मतभेदांचे सावट आजच्या जीवनावर पडले की मग तर समाजकलहच. कसा टळेल हा प्रकार?
(३) अभ्यासायचाच असेल तर इतिहासाच्या अभ्यासाचा उद्देश काय असावा?
एक ना दोन शेकडो प्रश्न येतात मनात. माझ्याच का तुमच्याही मनात येत असतीलच असे प्रश्न!
वरील ३ मुद्द्यांना धरून मतप्रदर्शन होईल अशी आशा करतो.
८ सप्टेंबर १२
कोठल्याही देशाच्या, कोठल्याही वंशाच्या, कोठल्याही धर्माच्या, कोठल्याही जातीच्या, कोठल्याही लिंगाच्या, कोठल्याही वयाच्या विचार करू शकणार्‍या माणसाला पडणारे हे प्रश्न! मी विचारलेल्या प्रश्नांमध्ये वा त्यांच्या उत्तरांम्ध्ये खरे म्हणजे कोणाच्याही 'अल्टीरीयर मोटीव' ला मुळिच वाव नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंभर उंदीर खाऊन !
ईतिहासावर तावातावाने चर्चा करून मग इतिहासाची काय गरज असा प्रश्न पडणे ही गंमत.
आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी तसाच आजचा दिवस उद्याचा इतिहास .
तुमची ईतिहासाची व्याख्या किती मागचा कालावधी समाविष्ट करते यावर ईतिहासाचा अभ्यास करावा की करू नये हे ठरेल.
उदा. एखादी कंपनी विकत घेण्यापूर्वी तिचा तालेबंद पाहाणे हा त्या कंपनीचा ईतिहास अभ्यासणे होय.
एखाद्या भागात तुम्हाला लोकजीवनाशी निगडित काही व्यवसाय करायचा असेल तरी तिथला इतिहास अभ्यासावा लागेलच.
फक्त पुस्तके वाचून, उत्खनन करून, नेटवर डोळे फोडूनच इतिहास अभ्यासतात असेहि नव्हे.

जाऊदे, तुम्हाला या चर्चेतून नेमके काय अपेक्षित आहे ते समजून येत नाहीये.
की परत कही पे निगाहे कहीं पे निशाना आहे.

भारताच्या फाळणीपासून आजतागायत इतिहासाचा अभ्यास केलेला उत्तम... मधला १९९९ ते २००४ पर्यतचा नाही केला तरी चालेल. त्यात काही विशेष घडलेले नाही . प्रेरणा घेण्यासारखे तर अजिबातच नाही.

>>की परत कही पे निगाहे कहीं पे निशाना आहे.

खरतर भास्कर यांचे धागे भरकटवायला हे असले प्रतिसादच कारणीभूत ठरतात.

काय करायचाय तो 'इतिहास ' हा विषय?>>>>>

पु ना ओकांचे नवे पुस्तक कि कै ?

( नको असेल तर रुमाल घ्या ..पुसायला Lol )

दाखवायला सरकारी ब्रह्मचारी |
अन् टेररिस्टांचे फायनान्सिंग करी ||

हे सत्य उघड करण्यासाठी म्हणून इतिहास अभ्यासून नेमके प्रश्न विचारले पाहिजेत. हे झालं माझं मत बरंका. इतरांची मते व/वा उद्दिष्टे वेगळी असू शकतात.

-गा.पै.

कही पे निगाहे कही पे निशाना !!!

घ्या माहीती पाहीजे तर फार दुर जायची गरज नाही !!

आझाद मैदान हिंसाचारामागे दाऊद

ही माहिती भारती य गुप्तचर विभागाने दिली आहे !! ह्या माहितीने बरेच प्रश्न ऊभे रहातात !

ह्या दाऊदला मुंबई व ईतर ठीकाणी जातीय / धर्मीय दंगली का करायच्या आहेत हे कळणे महत्वाचे आहे.
ह्या मागे भारत देशातील, पाकिस्तानातील कोण लोक आहेत हे कळणे ही महत्वाचे ठरेल.

ह्या दाऊदच्या मागे लागुन ईथले मुसलमानच देशाविरुद्द काम करायला तयार होतात हे वारंवार दिसुन आले
आहे. दाऊद पाकिस्तानात बसुन इथे मुंबईत, बीड / औरंगाबाद मध्ये चक्र फिरवु शकतो आणि आपले पोलिस फक्त लोकांच्या धार्मिक भावनांचा विचार करतात. त्याच रमझानच्या पाक ( पवित्र) महिन्यात मुसलमान
दंगलखोर लोकांना दंगल करता ना काहीच वाटत नाही.

त्या दिवशी ( मुंबईच्या दंगलीच्या वेळी व नंतर ) पोलिस व सरकारची भुमिका कशी होती. दंगल करणार्याना जागीच पकडता आले असते, ते सोडून रमझानचा महीना जाऊ दे, ईद वैगेरे होऊ दे अस म्हणत वेळ काढला, जर मोठ्या व्याप्तीचा अतिरेकी हल्ला ह्या लोकांनी प्लान केलेला असेल तर अशी ढीसाळ / तकलादू / धर्मा वर आधारीत कारवाई बरोबर आहे का ?

Tackle Mumbai attack trial realistically not emotionally: Pak

एका साईडला पाकिस्तान सरकार पुर्वीच धोरण सोडुन नरमाईचे ( अतिरेकीपणा सोडण्याच) धोरण अवलंबले आहे
अस भासवताहेत ! आणि दुसर्या बाजुला आझाद मैदान हिंसाचारामागे दाऊद

http://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/Tackle-Mumbai-attack-t...

कुठल्याही बाफचा/चर्चेचा काय उपयोग आहे किंवा असतो? इतर बाफ मधे २००/३०० कॉमेंट्स येउन काय मोठे दिवे लागलेत?
या बाफ मधे काय चुकीचे आहे मला कळले नाही. ज्याना चर्चा करायची त्याना करु द्या की. त्यांचा काय अल्टीरीयर मोटीव असेल तो असु द्या. इथे असल्या जळक्या कॉमेंट्स लिहिणार्‍यांचा काही मोटीव आहे असे मानायचे का? का इथे एस्टॅब्लिश्ड आय डीज नी कुठेही जाउन उपद्रव घालावा अशी त्याना सुट आहे? आधी काडी लावायची आणि मग बघा हे कसे भांडतायत असे आपण दीड शहाणे असल्यासारखे दाखवायचे. कम ऑन..लेट देम बी!

>>ज्याना चर्चा करायची त्याना करु द्या की. त्यांचा काय अल्टीरीयर मोटीव असेल तो असु द्या. इथे असल्या जळक्या कॉमेंट्स लिहिणार्‍यांचा काही मोटीव आहे असे मानायचे का? का इथे एस्टॅब्लिश्ड आय डीज नी कुठेही जाउन उपद्रव घालावा अशी त्याना सुट आहे? आधी काडी लावायची आणि मग बघा हे कसे भांडतायत असे आपण दीड शहाणे असल्यासारखे दाखवायचे. कम ऑन..लेट देम बी!<<
@mansmi18 | 7 September, 2012 - 18:12
mansmi18
अशा या योग्य भूमिकेबद्दल मनापासून धन्यवाद!

@साती | 6 September, 2012 - 13:29
>>तुमची ईतिहासाची व्याख्या किती मागचा कालावधी समाविष्ट करते यावर ईतिहासाचा अभ्यास करावा की करू नये हे ठरेल.उदा. .......अभ्यासावा लागेलच.<<

'म्हणजे ईतिहासाचा अभ्यास करूच नये असे नाही पण हातचे काम काय आहे त्यावर ते ठरेल.'
बरोबर? तसे असेल तर निदान एका प्रश्नावरील तुमचे मत कळले त्याबद्दल धन्यवाद. इतर प्रश्नांवरील आपले मत कळेल?

>>तुम्हाला या चर्चेतून नेमके काय अपेक्षित आहे ते समजून येत नाहीये.<<

लेखाच्या शेवटच्या भागात कोणत्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत ते स्पष्ट केले आहे.

सातीचे प्रतिसाद संपले की साडेसातीचे प्रतिसाद सुरू होतील धाग्यावर. इथेही लक्ष आहे मॅनेजमेन्टच. लिटल जिमी, इथे नीट उभा राहा, हां, असा लांबच उभा राहा, सोमवारी दुपारपर्यंत इथे पानिपत होईल, तेव्हा टाळ्या पिट, या धाग्यावर नक्की तुला हवी ती मजा पाहायला मिळणार आहे.

@बाळू जोशी. | 7 September, 2012 - 10:00
भारताच्या फाळणीपासून आजतागायत इतिहासाचा अभ्यास केलेला उत्तम... मधला १९९९ ते २००४ पर्यतचा नाही केला तरी चालेल. त्यात काही विशेष घडलेले नाही . प्रेरणा घेण्यासारखे तर अजिबातच नाही.<<

याचा अर्थ 'ज्या काळात प्रेरणा घेण्यासारखे कांही घडले असेल त्या काळाचा इतिहास अभ्यासणे उत्तम.'
पण मग फाळणीआधी प्रेरणा घेण्यासारखे कांही घडले नाही असे आपले मत समजायचे का?

| 7 September, 2012 - 10:13
>>की परत कही पे निगाहे कहीं पे निशाना आहे.<<

खरतर भास्कर यांचे धागे भरकटवायला हे असले प्रतिसादच कारणीभूत ठरतात..<<

@Vijay Angre
आपले निरीक्षण १०० % बरोबर आहे. पण त्यातूनच मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे.
बघु चर्चा मूळ विषयाकडे येतीय का?

Kiran.. | 7 September, 2012 - 12:21
काय करायचाय तो 'इतिहास ' हा विषय?>>>>>

पु ना ओकांचे नवे पुस्तक कि कै ?

( नको असेल तर रुमाल घ्या ..पुसायला )
<<
यांना संयमाने दिलेले उत्तर कसे काय उडविले गेले? कोणाच्या साम्गण्यावरून कोणी उडविले कोण जाणे. प्रशासकांना वाद न वाढविण्याचे दिलेले आश्वासन मी सध्या पाळतो आहे. पण या वरील प्रतिसादाचा उद्देश धागा उडविला जाईल अशा दिशेने ओढणे हाच आहे हे स्पष्ट दिसते आहे.

मी-भास्कर, तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी - याच्यासारखीच चर्चा पूर्वी माबोवर झालीये. कदाचित तुम्हाला आणखी वेगळे मुद्दे अभिप्रेत असतील. मला यातल्या कुठल्याही चर्चेत भाग घ्यायचा नाहीये. तेव्हा शुभेच्छा.

http://www.maayboli.com/node/22752

पण मग फाळणीआधी प्रेरणा घेण्यासारखे कांही घडले नाही असे आपले मत समजायचे का?

>>>
नाही नाही , फाळणीपूर्वी पुष्कळ प्रेरणा घेण्यासारख्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्यलढा , सामाजिक सुधारणांचा आग्रह वगैरे. पण त्यापेक्षा स्वतांत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यानी केलेल्या घोडचुकांचा परामर्श घेणे जास्त महत्वाचे आहे.मतांच्या राजकारणात राज्यकर्ते कसे वाहावत गेले, याचा अभ्यास करणे ५०००-६०००वर्षांच्या इतिहासापेक्षा जास्त महत्वाचे आहे, कारण त्यामुळे राष्ट्र वाचण्याची शक्यता आहे.याला अपवाद फक्त १९९९-२००४ पर्यन्तचा.त्यावेळी सुबुद्ध राज्यकर्ते असल्याने हिंदुस्तानाची घसरण जरा थाम्बली होती. या गोष्ती अभ्यासल्या पाहिजेत

@वरदा | 8 September, 2012 - 16:16
मी-भास्कर, तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी - याच्यासारखीच चर्चा पूर्वी माबोवर झालीये. कदाचित तुम्हाला आणखी वेगळे मुद्दे अभिप्रेत असतील. मला यातल्या कुठल्याही चर्चेत भाग घ्यायचा नाहीये. तेव्हा शुभेच्छा.
http://www.maayboli.com/node/22752 <<
लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद. मी तो लेख आणि प्रतिसाद वाचले. तेथे अनेकांनी आपले विचार मांडले असले तरी , येथे मला ज्या प्रश्नांची नेमकेपनाने उत्तरे अपेक्षित आहेत तशी ती तेथे नाहीत.
तेथे आपणही बरेच चांगले लिहिलेले आहे असे दिसून आले. येथे लिहायचे नाही या आपल्या निर्णयामुळे मला वाईट वाटले. येथे मी विचारलेले प्रश्न 'इतिहास' या विषयाबद्दल आहेत. प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासातील तपशिलाबद्दल नाहीत. त्यामुळे वादाचा स्कोपच कमी केलेला आहे. या प्रश्नांबाबत आपली मते मांडण्यास आपणासारखी संशोधनक्षेत्रातील मंडळी मागे राहिली तर धाग्याचा विषय भरकटत जाण्यास वेळ लागत नाही. तेव्हा आपण आपल्या निर्‍णयाचा फेरविचार करावा अशी विनंति.