झीनी बेबी - दि ओरिजीनल डीवा

Submitted by Sanjeev.B on 5 September, 2012 - 04:44

ग्लॅमरस दिसणं म्हणजे नक्की काय, हे मी जेव्हा जेव्हा झीनत अमान ला पाहतो तेव्हा मला कळतं. हिंदी चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक सौंदयवती ने आपल्या सौंदर्याचे मोहिनी घातले, अगदी नुतन च्या सोज्वळ सौंदर्या पासुन ते मधुबाला च्या स्वर्गीय सौंदर्यापर्यंत, रेखा - स्मिता पाटिल पासुन ते माधुरी दिक्षीत ते आजच्या पिढीच्या ऐश्वर्या, करीना, प्रियांका चोप्रा पर्यंत. ग्लॅमरस लुक्स मध्ये मला नेहमीच झीनत अमान उजवी वाटली.

१९७० साली तिने मिस एशिया पॅसिफीक स्पर्धा जिंकले. झीनत अमान, राज कपुर च्या "पारख्या" डोळ्यात न भरती तर नवलच, १९७८ मध्ये सत्यम शिवम सुंदरम साठी, राज कपुर एक बोल्ड व्यक्तीमत्वाच्या शोधात होते. अशी वदंता आहे कि झीनत अमान ने आपण किती बोल्ड आहोत हे सिध्द करण्यासाठी जेव्हा राज कपुर ने सांगितले, तेव्हा झीनत ने न्हाणी घरातुन एक बादली पाणि आपल्या अंगावर ओतुन घेऊन थेट राज कपुरांच्या समक्ष उभी राहिली होती, तिथेच तिचे सत्यम शिवम सुंदरम मध्ये वर्णी लागले.

सत्यम शिवम सुंदरम मध्ये झीनत ने एकदम नॉन ग्लॅमरस रोल केले, पण एकच गाणं आहे, "चंचल कोमल निर्मल .... " , ह्या गाण्यात तिने अंग प्रदर्शन तर केलेच आहे, पण पुर्ण चित्रपटात असणारे डिग्लॅम लुक तिने ह्या गाण्यात भरुन काढले आहे.

zeenat SSS.jpg

तत्पुर्वी १९७२ मध्ये हरे रामा हरे कृष्णा चित्रपटात, जॅनीस ह्या देव आनंद च्या बहिणीच्या रोल मध्ये झीनत अमान ने पुर्ण चित्रपटात जरा ही अंग प्रदर्शन केल्याचे स्मरत नाही, पण कॉटन कुर्ता टॉप्स घालुन आणि पुर्ण डोळे कव्हर करणारे ट्रांन्स्पेरेंट गॉगल्स घालुन पुर्ण चित्रपटात वावरली आहे, त्यात ती फारच ग्लॅमरस दिसली आहे.

zeenat hare rama hare krishna.jpgzeenat hare rama hare krishna3.jpgzeenat hare rama hare krishna2.jpg

आज ही तुम्ही पाहा असले गॉगल्स महिलांच्या फॅशन असेसरीझ मध्ये आज ही IN THING आहे.

हिरा पन्ना ह्या चित्रपटातील पन्ना की तमन्ना है के हिरा मुझे मिल जाए ह्या गाण्यात देव आनंद ना एक फॅशन फोटोग्राफर दाखवले आहे अणि ते झीनत अमान चे फोटो शुट करत आहे असे दाखवले आहे, त्या गाण्यात झीनत ने बेल बॉटम घातले आहे आणि स्कार्फ टाय केले आहे, त्यात ही झीनत फार ग्लॅमरस दिसली आहे. आजही कित्येक टॉप लेव्हल महिला एक्सीक्युटीव्ह्स मध्ये बेल बॉटम पॅन्टस आणि कोट वर स्कार्फ टाय करणे आज ही IN THING आहे.

Zeenat Heera Panna.jpg

यादों कि बारात मध्ये आप के कमरे मे कोई रहता है ह्या गाण्या मध्ये विजय अरोरा आणि तारिक़ ने जो काही उच्छाद मांडला आहे ते पाहुन हसु आवरत नाही, पण त्या गाण्यात ही झीनत च्या उपस्थीती मुळे आणि आशा ताईंच्या मधाळ आवाजामुळे ते गाणं मला फारच आवडतं. चुरा लिया है तुमने जो दिल को ह्या गाण्यात ही गिटार हातात घेऊन जेव्हा उभे राहुन, जेव्हा मानेला हलकेच ग्लांस करुन केस सावरते तेव्हा एकदम KILLER दिसते.

Zeenat YKB1.jpgZeenat YKB2.jpg

डॉन मध्ये अमिताभ बरोबर खई के पान बनारस वाला ह्या गाण्यात ३/४ पॅन्ट घालुन तिने जे एक दोन स्टेप्स केले आहेत त्यात अमिताभ पेक्षा तीच सरस वाटते.

zeenat don.jpg

अमिताभ बरोबर पुन्हा पुकार चित्रपटात समंदर मे नहाके ह्या गाण्यात ती खरंच नमकीन दिसली आहे.

फिरोझ खान हा फार स्टाईलबाज़ अभिनेता होता, पण त्यांच्या कुरबानी ह्या चित्रपटातले आप जैसा कोई मेरे जिंद़गी मे आए तो बात बन जाए व लैला ओ लैला ह्या गाण्यांत झीनत ने खरंच बात बनवली आहे.

zeenat qurbani.jpg

मझहर खान बरोबर लग्न झाल्यानंतर आणि त्याच्याशी झालेले घटस्फोट बद्दल मी जास्त लिहीत नाही.

आज ही कोणत्याही अवॉर्ड फंकशन मध्ये तिला पाहिल्यावर तिच्या चेहर्यावरचे ग्लॅमर अजुनही तसेच आहे व ती तसेच राहो ही सदिच्छा.

- संजीव बुलबुले / ०४.सप्टेंबर.२०१२

आभार :-
झीनत अमान चे मिस एशिया पॅसिफिक जिंकण्याचे वर्ष व सत्यम शिवम सुंदरम रिलीज होण्याचे वर्ष : विकीपिडीया वरुन साभार.

सर्व प्र चि : आंतरजाल वरुन साभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख आहे. पण अंगप्रदर्शन करणे हा निकष ठरणे हे दुर्दैवी वाटते आणि त्यामुळे ते अंगावर पाणी ओतून राज कपूरसमोर उभे राहणे आणि राज कपूरनेही त्यावरून तिची निवड करणे हे मला नि:कृष्ट वाटले. पण झीनत अमान ही त्याकाळच्या सर्वच नायिकांपेक्षा नेहमीच आवडायची आणि आजही आवडते.

झीनत अमानचे सदोष हिन्दी उच्चार लक्षात घेऊनही आणि ती फार मोठे अभिन्त्री नसूनही तिझा कॅमेरासमोरचा प्रेझेन्स स्मार्ट म्हणावा असाच होता. मनोरंजन हाही चित्रपट तिने वाहून नेलाय. शर्ली मक्लीनची काऊन्टरपार्ट शोभ्ते ती. इर्मा मधल्या. धुन्द मध्ये नॉन ग्लॅमरस रोलमधेही जान आणली आहे तिने. अब्दुल्ला,वारन्ट, हेही उल्लेखनीय. तिच्या व्यक्तीमत्वात 'लाईव्हनेस' निश्चित होता. तिच्यासारखीच असणारी परवीन बाबी मात्र माठ आणि बथ्थड वाटायची...

Happy म्हमईकर..!! ज़ीनत अमान वर लेख... वॉव.. अजूनही तिचे (माझ्यासकट) अ‍ॅडमायरर्स आहेत हे पाहून बरं वाटलं..
अभिनय वगैरे राहू दे, पण तिला जबरदस्त स्क्रीन प्रेझेंस होता.. वेस्टर्न पोशाख तिच्याइतका त्या जमान्यात कोणीच कॅरी करू शकले नव्हते..

तिचा कॅमेरा प्रेझेन्स, तिची स्टायील, तिचे अनेक सिनेमा मधले लुक्स ( ग्रेट गँबलर, कुर्बानी ) , तिची स्कीन, तिचा दिमाख हा त्या वेळेच्या अभिनेत्रीं पेक्षा खुपच वेगळा आणि हटके होता. तिने भरपुर अंग प्रदर्शन केलं ... अगदी नको तेंव्हा ही... कुठलीही एक्स्क्युझेस दिली नाहीत ( भुमिकेची गरज वगैरे...) सरळ सोट अ‍ॅप्रोच!!!!

त्या वेळेच्या प्रत्येक प्रसिध्ध अभिनेता आणि दिग्दर्शका बरोबर तिने काम केलं.

वर तिच्या सिनेमांच्या यादीत तिचा सगळ्यात गाजलेला आणि तिचा चांगला अभिनय असलेला इन्साफ का तराजु चा उल्लेख झालाय का ?

हा सिनेमा तिने फक्त तिच्या जोरावर तारुन नेलाय. ती सोडली तर सगळे नवे!!! त्यातिल तिचं आणि पद्मीनी चं अंगप्रदर्शन फारच गाजलं. झीनत ने तिच्या कुवती पेक्षा खुपच वरचढ काम केले आहे.

आज साठीतही ती तेवढीच ग्लॅमरस दिसते!!!!

त्या काळातल्या अनेक अभिनेत्रींना झीनत ने फीगर काय असते, ती मेंटेन करायची म्हणजे काय, मेक अप मधले अनेक प्रयोग, ग्लॅमरस पेहेराव... ह्या सगळ्याची परीमाणं घालुन दिली. ती तिच्या अभिनया साठी कधीच ओळखली गेली नाही. तिची लफडी, तिच्या हिरों बरोबरच्या मारामार्‍या, तिचं बेदुंध वागणं हेच जास्त प्रसिध्ध होतं.....

पण एक नक्की ती खरी खुरी ओरीजनल ग्लॅमर दिवा होती !!!!!

वॉव.. अजूनही तिचे (माझ्यासकट) अ‍ॅडमायरर्स आहेत हे पाहून बरं वाटलं..>>> वर्षू, माझ्या १० वर्षाच्या लेकीची ती अतिशय फेवरेट आहे. Happy झीनत एवढ्यात विसरली जाणार नाही.

संजीव, झीनत अमान मलाही आवडते रे. तेव्हाच्या काळातल्या हिरॉइन्सच्या मानाने ती खुपच स्टायलीश होती. She had a fantastic body and beautiful face! परवाच कोणत्या तरी चॅनेलवर सत्यम शिवम पाहिला. त्या मधे ती काय दिसली आहे.

तूम्ही सगळे तिच्या स्क्रीन प्रेसेन्स बद्दल बोलताय पण प्रत्यक्षात दिसायला ती जास्त सुंदर आहे. मी तिच्याशी बोललो आहे. अजिबात मेकप नव्हता, त्यावेळी. मला ती पडद्यावर कधीही आवडली नाही.

अगदी उतारवयातही बूम मधे आणि एका नाटकात तिला अंगप्रदर्शनच करावे लागले होते. अभिनय वगैरे करायचे फारसे मनावर घेतले नाही, कधी तिने.

मजहर शी लग्न करुन मात्र तिने भरपूर मनस्ताप भोगला.

झीनत अमान आणी परविन बॉबी ह्या दोघी बहिणी.>>>>

हा हा हा ..... जोक ऑफ द डे......

झीनत चे वडिल मुसलमान. आई मराठी ( पवार). मग वडिल गेल्या वर तिच्या आईने एका जर्मन माणसाशी लग्न केले आणि झीनत ला जर्मनीला नेले. पण लौकरच झीनत परत इंडियात आली आणि "हरे राम हरे क्रुष्णा" तिला मिळाला....

परविन ही जुनागढ च्या ईस्टेट मॅनेजर ची मुलगी. एकुलती एक. वडिल गेल्या वर तिने आणि तिच्या आईने खुप हाल काढले. सिनेमात येण्या आधी परवीन एका शाळेत शिक्षिका होती.

तिने खुप सिनेमात कामे केली. पण अभिनयाच्या बाबतित बोंब... ( रंगबीरंगी त्यातल्या त्यात बरा!!!)

झीनत अमान मला आधी अज्जीबात आवडत नव्हती. काय नकटी चपटी दिसते! कुणी हिला आणले असे बाळबोध प्रश्न पडायचे. पण तिचा कुर्बानी पाहिला आणी मग पूर्ण मत बदलले. हम तुम्हे चाहते ऐसे या गाण्यात ती काय दिसलीय! तिचा बांधा अतीशय सुंदर. अजूनही मेंटेन केलेय वाटते, आणी तितकी वयस्कर पण वाटत नाही.

हो मला ही आधी झीनत आणी परवीनमध्ये फरक कळायचा नाही शाळेत असताना.:फिदी:

ती उच्चशिक्षीत आहे त्यावेळेची असे ऐकलेय.

म्हमईकर छान लिहीलेत.

धन्यवाद बेफिकीरजी, बाळु, वर्षूजी, मीरा, नताशा, झकासराव, मनिमाऊ, दिनेशदा, जेम्स बाँड आणि टुनटुन.

@ वर्षूजी,
आम्ही पण जुन्या वाले राजेश खन्ना चे चाहते आहोत.

छान लेख आहे..

ती नुकतीच साठीची झाली. झीनत अमानची साठीची शांत Happy कसेतरी वाटते ऐकायला..
तिची ग्लॅमरस इमेजच राहु दे डोळ्यापुढे..

मस्त. झीनत ने जे रोल्स केले त्याला जेवढा अभिनय करायची गरज होती तेवढा तिने नक्कीच चांगला केला. मी तिला बहुधा फक्त अमिताभच्या चित्रपटांतच पाहिल्याचे आठवते, पण त्या रोल्स मधे ती एकदम चपखल बसायची. विशेषतः डॉन.

अ‍ॅक्शन रोल्स ना ही अभिनय करावाच लागतो आणि विशेषतः तेव्हाच्या हीरॉइन्सच्या बाबतीत लोकांना तो पटला पाहिजे हे ही महत्त्वाचे होते. ती डॉन मधे अ‍ॅक्शन सीन्स मधे आउट ऑफ प्लेस वाटली नाही, उलट चपखल बसली. पण त्याचबरोबर इतर सीन्स मधे एकदम ग्रेसफुल दिसली. हे गाणे पाहा, पण कथेत केव्हा हे गाणे येते ते माहिती करून मगच पाहा - डॉन ला मारून आपल्या भावाला त्याने मारल्याचा बदला घेण्यासाठी ती त्याच्या कॅम्पमधे आलेली असते. पण मधे ती डॉन-विजय ची गडब॑ड होउन (जी तिला माहीत नसते), डॉन ची मेमरी जेव्हा परत येते तेव्हा नंतरच्या पहिल्या 'डील' ला तिने त्याच्याबरोबर जायचे असे ठरते. त्याच्या आधी हे गाणे आहे. बच्चन एवढा पीक ला असतानाच्या काळात गाण्यामधे त्याला खुन्नस क्वचितच कोणी दिली असेल. जरी ड्युएट असले तरी कथेच्या दृष्टीने हे गाणे सर्वस्वी हीरॉईनचे आहे, आणि झीनतने एकदम जबरी काम केलेले आहे.
http://www.youtube.com/watch?v=BWaWPtFvqUw

बाकी 'खैके पान' मधल्या झीनतच्या सरस स्टेप्स बद्दल सहमत. कारण त्यातील अमिताभच्या प्रत्यक्ष डान्स पेक्षा तो नाचतोय हेच लोकांना एवढे आवडले (आणि त्यात 'किशोर' ची स्वतः पान खाउन केलेली धमाल)! नंतर अमिताभ सरावाने जास्त चांगला नाचू लागला Happy पण या गाण्यातल्या अमिताभपेक्षा या गाण्याच्या सीन मधे थोडे आधी नकली डॉन च्या रूपातून मूळ गंगा किनारेवाल्या विजय मधे होणारी ट्रान्झिशन बघायची. जाऊदे, लेख झीनतबद्दल आहे Happy

झीनत अमान, दोस्ताना (१९८०) मध्ये मस्त दिसली आहे. "सीटी नहि तो क्या मंदिर कि घंटी बजेगी?" वाला दोस्ताना...