फाटक्या या आयुष्याला......

Submitted by सुधाकर.. on 4 September, 2012 - 13:45

फाटक्या या आयुष्याला शब्दांचाच साज आहे.
मांडतो ती गजल माझ्या अंतराची गाज आहे.

लंगड्याची चाल होते, वेदनेचे फूल होते
अंतरी ते काय असे शब्दामाजी राज आहे?

माणसे ना सोसती जे, सोसती ते शब्द सारे
मांडण्यास तया नग्नता का कुणाची लाज आहे?

गुंग होतो शब्दयामी विसरूनी या जगा मी
शब्दवेड्या जीवनाचा आगळा हा बाज आहे.

झिंगली जी पिऊनीया, शब्दांची ही 'सुधाकरी'
शब्दवेड्या त्या पिढीचा आज मजला नाज आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकन्दर अष्टाक्षरी रचनेची लय पकडली आहे असे वाटले
काही जागी ८ ऐवजी ९ अक्षरे आलीत तिथे बदल हवाय

मांडतो ती गजल माझ्या / मांडली गझल माझ्या
मांडण्यास तया नग्नता= माण्डाया तया नग्नता / माण्डाया नागडेपणा
शब्दामधली 'सुधाकरी= शब्दातली सुधाकरी
आज मजला नाज आहे= आज मला नाज आहे

एकन्दर खयाल नेहमीच आवडतात मला तुमचे
ही रचना काय म्हणते आहे ते जरा जरा समजले

धन्यवाद
पुलेशु

सुधाकरलाही गुण लागला का? सुधाकरी म्हणजे माझी भावजय असावी. लिटल जिमी, मामीला हाय म्हण. वैभवमामाला म्हणाव लांब राहा या कवितेच्या नादापासून.

धन्यवाद रे वैभू पण आज---

एकन्दर खयाल नेहमीच आवडतात मला तुमचे या आदरार्थी वाक्याने मी दचकूण दिड फूट उडालो. नशीब की माझ्या संगनक टेबलावर फारश्या वस्तूंची गर्दी नाही. म्हणूनच मी वाचलो. पण तुझे शॉर्टफॉर्मच
बरे वाटतात. असो.

प्रतिसादबद्दल धन्यवाद,
तुझे म्हणने मला पटते आहे परंतू सम मात्रांसाठी आख्या गझलेची मोडतोड करावी लागेल.

मात्रान्चा काही प्रश्नच नाही येत या प्रकारात
प्रत्येक अक्षर' गा' या स्वरूपात वाचायचे इतकाच साधा नियम आहे या लयीचा
फक्त प्रत्येक ओळीत ८ + ८ अक्षराचा हिशेब लागला पाहिजे हा अक्षरछन्द अहे मित्रा

हा प्रकार बहिणाबाईची ओवी या प्रकारापासून सुरू झाला बहुधा
तिच्या कवितेत ८ अक्षराच्या ४ ओळीचे एक कडवे आसायचे त्याचेच दोन ओळीत रूपन्तर केले की झाला एक शेर तयार

हा बघ

अरे सन्सार सन्सार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तेन्व्हा मिळते भाकर

गागा-गागा-गागा-गागा..गागा-गागा-गागा-गागा.............

गाज म्हणजे?

पहिल्या शेराची पहिली ओळ मस्त ! दुसरी "गाज" या शब्दामुळे कळाली नाही.

माणसे ना सोसती जे, सोसती ते शब्द सारे
मांडण्यास तया नग्नता का कुणाची लाज आहे?
>>
यातही पहिली ओळ मस्त... दुसरी फारशी नाही आवडली Happy

गाज-- म्हणजे जशी समुद्राची गाज असते तशी.


मांडण्यास तया नग्नता का कुणाची लाज आहे?

---------- इथे नग्नता म्हणजे जीवनातील सत्य जे केवळ शब्दांच्या माध्यमातून मांडता येते.

रीया, गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा सतत येणारा आवाज.
म्हणून समुद्राची गाज. इथे कवितेत 'अंतरीची गाज' म्हणजे मनातल्या समुद्राचा आवाज, सतत चाललेली विचारांची खळबळ.

सुधाकर ,

फाटक्या या आयुष्याला शब्दांचाच साज आहे.
मांडतो ती गजल माझ्या अंतराची गाज आहे.

या ओळी खूप आवडल्या. लेखनशुभेच्छा.