अपराधाची क्षमा

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 4 September, 2012 - 11:15

पतित पावन गुरूवरा हो
शरणांगत मी तुम्हा
करा हो अपराधाची क्षमा ||

वेचित असता मोती सुखाचे
आले हाती कण दु:खाचे
मोहमायेने पाश आवळले
विसरून गेले तुम्हा ||

बंधु भगिनी सगे सोयरे
कठिण समयी दूर सरले
कुणि न तुम्हाविण तेंव्हा कळले
शरण आले तुम्हा ||

मोह मायेचा मिथ्या पसारा
कळले तुम्हाविण कुणि न आसरा
सत्य एक तुम्ही आणि ईश्वरा
पायी लागते तुम्हा ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users