एक हात... मदतीचा

Submitted by कौतुक शिरोडकर on 4 September, 2012 - 07:19

आपला समाज दोन गटात मोडतो. एक 'आहे रे' आणि दुसरा 'नाही रे'. यातल्या 'आहे रे' गटाकडे कधी कधी काही गोष्टी गरजेपेक्षा अधिक असतात आणि त्या कुणाला तरी देऊन टाकाव्या असं त्यांना वाटतही असते. पण कुणाला ? हा प्रश्न उद्भवतो आणि गाडं अडकतं. देणार्‍याची प्रांजळ इच्छा असते की त्याने दिलेली वस्तू गरजू माणसापर्यंत पोहचावी.
हा बाफ उघडण्याचं कारण हेच. तुमच्याकडे असलेली कोणतीही वस्तू जर कुणा 'नाही रे' च्या संसाराला उपयोगी ठरत असेल तर... ज्या कुणाला अशा गरजू लोकांसाठी काम करणार्‍या प्रामाणिक संस्था, संधटना किंवा व्यक्तीची माहीती असेल तर त्यांनी ती इथे शेअर करावी.
(या विषयावर एखादा जुना बाफ असू शकतो. तसं असल्यास नक्की कळवावे. म्हणजे हा बाफ बंद करून सगळी माहीती त्या बाफवर हलवता येईल. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा कौतुकदादा Happy
मलाही ही माहिती हवी आहे
ज्या गोष्टींबाबत मी आहे रे कॅटेगिरीत आहे त्या त्या गोष्टींसाठी मी मदत करायला तयार आहे Happy

माझ्याकडे सुस्थितीत असलेली एक नेबुलायझेन मशीन आहे. लहान मुलांच्या रेस्पिरेशन सिस्टीमसाठी वापरली जाते. सेवाभावी दवाखाना चालविणार्‍या एखाद्या संस्थेला ते द्याव अशी इच्छा आहे. कुणाला अशा संस्थेची माहीती असल्यास कळवावे. Happy

धागा वाहता नसला तर उत्तम. तस काही असल्यास मी शक्य तेव्हा त्या संस्थाची माहीती वर नोंदवत जाईन. Happy

अमेरिकेत फ्रीसायकल.ऑर्ग म्हणून एक साईट मी वापरली आहे .
त्यांचे बाकी बर्‍याच देशात पण लोकल चॅप्टर आहेत.
भारत्तत आहे का महित नाही..
तुम्ही पण सुरू करू शकाल तिथे लोकल ब्रँच.

आपल्याकडे असलेली वस्तू आपण "ऑफर" करायची..
तसेल आपली "नीड" पण लिहता येते.

छान विचार,, आणि धागाही... मदत करणारे खूप असतात पण पोचवणारे आणि घेणारे योग्य असायला हवेत.

अवांतर --

मागे सहज चर्चेत मी, माझ्या काही गझलकार मित्रांशी माझ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलत होतो, मी या आदिवासी मुलांसाठी दक्षिण आफ्रिकेतील "स्लिपींग चाईल्ड अराउंड दि वर्ड"
या संस्थेची मिळवलेली मदत त्यांना खूप प्रभावीत करून गेली, या वेळी," तुम्हाला हवी ती मदत मागा , आम्ही तयार आहोत" हे त्यांचे वाक्य मी या मुलांची ठेव म्हणून शिलकीत ठेवले आहे..
मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने शाळेला संगणक सक्तीचे केले आणि यावेळीही त्यांनी शाळेला संगणक देण्याची तयारी दर्शवली , मात्र ज्यांच्यासाठी ही मदत मिळणार आहे त्यांना त्याची योग्य जाणीवही असायला हवी. म्हणून मी पालकांशी चर्चा केली, आणि अर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांनी संगणकासाठी काही पैसे जमा केले. " हेल्प टू सेल्फ" असे जरी माझे विचार असले तरी ज्यानी मोठ्या मनाने माझ्या विद्यार्थ्यांसाठी मदत देण्याचे ठरविले त्या डॉ. कैलास गायकवाड, बेफिकीर, विजय पाटील (कणखर)आणि निशिकांत देशपांडे यांचे या निमित्ताने आभार मानतो.......
.... खूप खूप धन्यवाद दोस्तांनो..!

http://www.maayboli.com/node/26942
शैक्षणिक भरारीसाठी आणखी मदतीची या विद्यार्थ्यांना गरज आहे . त्या जोरावरच या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडणार आहे
.
मी एक धागा उघडलेला त्याची लिंक इथे देत आहे ...

छान धागा.

मायबोलीवर माहितीबाबत अशी देवाण घेवाण होतच असते, आता वस्तूंबाबत पण अशी सुरवात व्हावी इथे.

हा धागा ध्यासपंथी पाऊले या ग्रूपमधे हलवला आहे. याच ग्रूपमधे इतर सेवाभावी संस्था, त्यांना आवश्यक असणार्‍या/लागणार्‍या गोष्टी यांचीही चर्चा केली जाते.

कौतुक हे संकेतस्थळ पाहा...संस्थेबद्दल पूर्ण माहीती आहे इथे.
माझे मित्र आणि प्रख्यात तबलजी श्री सुहास कबरे संचालित ही संस्था आहे....तुझी वस्तु ह्यांच्याकडे दिलीस तर ती गरजूंसाठी निश्चितपणे वापरली जाईल ह्याची खात्री आहे.