प्रतीक्षा

Submitted by prafulladutta on 3 September, 2012 - 19:41

तुझी वाट पाहता पाहता सांजवेळ झाली
वासरे सारी परतली आणि बाळे निजली
दूर कोठेतरी मंदिरी घण्टानाद शांत झाला
माळ रानावरती निरव स्थब्धता पाहून
अलगद पावलांनीi वारा हळुवार आला
वात दिव्याची चाहूल देत होती कुणाची
गाईचे हम्बरणे सांगे खूण स्तनपानाची
सुवास पसरे घरोघरी धूप अन आरतीचा
तरी तुझी छाया दिसे न अम्बरीची
किती काळ तुझी मी अशी वाट पाहू
दिवस अन वर्षे गेली किती तीष्ट्थ राहू
कधी मला भेटशील कधी मिठीत घेशील
आशेवरती मी आता कसे आयुष्य सहू
गेलास दूर जरी भाळूनिया कोणावरी
तरी विश्वास माझा येशील अपुल्या घरी
नाही माझे गाऱ्हाणे , नाही अश्रू कधी
एकच माझे म्हणणे , घे मला पदरी
दिलेस अमाप प्रेम अखंड आयुष्य जरी
कसे मरण येईल प्रेम तुझेच या उरी
आता तुझे स्मरण हा एकमेव मला आधार
दर्शन तुझे व्हावे , हसत जाईन मृत्युच्या समोर

Group content visibility: 
Public - accessible to all site users