चंद्रकिरणांची तिच्या पायात होती पैंजणे!

Submitted by सतीश देवपूरकर on 3 September, 2012 - 12:03

गझल
चंद्रकिरणांची तिच्या पायात होती पैंजणे!
अन् तिच्या वेणीत होते पौर्णिमेचे चांदणे!!

बोलणे मंजूळ इतके, कोकिळा गाते जणू;
सळसळावा साप तैसे नागमोडी चालणे!

ओठ होते गप्प, डोळे बोलले डोळ्यांसवे;
अन् कशी जाहीर झाली आपली संभाषणे?

पाहिल्या होत्या तिच्या मी भावमुद्रा चोरुनी;
गूढ वाटे आजही मजला तिचे ते पाहणे!

आवरू दे....जाहला माझा पसारा केवढा!
पैलतीराचे कधीचे ऎकतो बोलावणे!!

लग्न माझे ठेपले येवून तोंडावर किती!
मीच धावाधाव करतो द्यायला आमंत्रणे!!

आज झिजताना दिसे जो तो स्वत:साठी किती;
चंदनाची झीज नाही, ना तसे गंधाळणे!

सूक्ष्म, अतिसूक्ष्मात माझ्या लागलो शोधू मला...
जाणवाया लागले माझे मला विस्तारणे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा मस्तच
मतला लजवाब

आज झिजताना दिसे जो तो स्वत:साठी किती;
चंदनाची झीज नाही, ना तसे गंधाळणे!>>>>>>>>>>>

तसेच सम्भाषणे व मक्ता विशेष आवडले

अफलातून______ देवसर ..गझल अतिशय आवडली.

आवरू दे....जाहला माझा पसारा केवढा!
पैलतीराचे कधीचे ऎकतो बोलावणे!!

आज झिजताना दिसे जो तो स्वत:साठी किती;
चंदनाची झीज नाही, ना तसे गंधाळणे!

सूक्ष्म, अतिसूक्ष्मात माझ्या लागलो शोधू मला...
जाणवाया लागले माझे मला विस्तारणे! ---------> हे तिन्ही शेर खासच आवडले.

--- दिलेल्या आनंदाबध्द्ल खुप खुप धन्यवाद. Happy

चंद्रकिरणांची तिच्या पायात होती पैंजणे!
अन् तिच्या वेणीत होते पौर्णिमेचे चांदणे!!<<< भंकस मतला आहे. मुलाला आईबाप पाहिजेत तसे गझलेला मतला पाहिजे.

बोलणे मंजूळ इतके, कोकिळा गाते जणू;
सळसळावा साप तैसे नागमोडी चालणे!<< प्रभावी समारोप असावा असे भट म्हणाले होते. मला तर काही कळतच नाही. पण इतके कळते, की हा शेर नाही.

ओठ होते गप्प, डोळे बोलले डोळ्यांसवे;
अन् कशी जाहीर झाली आपली संभाषणे?<<< तुम्हाला 'अन' आणि 'पण' हे समानार्थी शब्द वाटतात का? की 'अन कशी' ऐवजी 'पण तरी' हवे होते? बाकी हा शेर 'गझलेचा' आहे

पाहिल्या होत्या तिच्या मी भावमुद्रा चोरुनी;
गूढ वाटे आजही मजला तिचे ते पाहणे!<< पहिली ओळ 'व्वा व्वा'! दुसरी नुसतीच 'वा'!

आवरू दे....जाहला माझा पसारा केवढा!
पैलतीराचे कधीचे ऎकतो बोलावणे!!<<< अभिनंदन!

लग्न माझे ठेपले येवून तोंडावर किती!
मीच धावाधाव करतो द्यायला आमंत्रणे!!<<< यात लग्न ही प्रतिमा असणार. कारण गझलकार प्रतिमांच्या भाषेत बोलतो. आकलन हे ज्याच्या त्याच्या सौंदर्यबोधावर आणि सखोल दृष्टिकोनावर अवलंबून असते. 'आम्हाला' असे वाटते की हा शेर ज्यांना किती चांगला आहे हे समजले नाही त्यांची गझलजाण शंकास्पद असून त्यांनी शिकवणी लावायला हवी.

आज झिजताना दिसे जो तो स्वत:साठी किती;
चंदनाची झीज नाही, ना तसे गंधाळणे!<<< दुसरी ओळ मस्त!

सूक्ष्म, अतिसूक्ष्मात माझ्या लागलो शोधू मला...
जाणवाया लागले माझे मला विस्तारणे!<<<

व्वा व्वा

सुंदर शेर

-'बेफिकीर'!

धन्यवाद भूषणराव, आपल्या प्रांजळ, परखड व प्रखर प्रतिसादाबद्दल!
काही शंका/प्रश्न नम्रपणे विचारावेसे वटतात........

१)मतल्यात आपणास नेमके काय भंकस वाटले? गझलेचे मायबाप न होण्याजोगे, असे आपणास मतल्यात काय दिसले/वाटले? सपाट वाटला? लाऊड वाटला? प्रभावहीन वाटला? प्रतिमा अनाकर्षक वाटल्या? शेर नाटकी वाटला? अनुभूतीनिष्ठा/लेखनगर्भनिष्ठा कमी वाटली? अभिव्यक्ती दुर्बल वाटली? कृपया उलगडा केल्यास बरे होईल. माझ्या लेखनात मला सुधारणा करता येतील!

२)बोलणे मंजूळ.......हा शेर का नाही? यात प्रभावी समारोपाचा अभाव आहे काय? प्रतिमा/ओळी विसंगत वाटतात काय? शेर व्हायला विरोधाभास हवाच असतो का प्रत्येकवेळा? शेर होण्याचे नेमके निकष कोणते?

३)“अन्” हा शब्द मी, “आणि” ऎवजी वापरतो. “पण” शब्द वापरण्याचे शक्यतोवर टाळतो, कारण शेराचा सस्पेन्स थोडा आधिच उघड होवू नये म्हणून..........वैयक्तिक मत! हा शेर आपणास गझलेचा कशामुळे वाटला?

४)पाहिल्या होत्या तिच्या..........पहिली ओळ व्वा! व्वा! आणि दुसरी ओळ नुसतीच वा! असे का बुवा? दुसरी ओळही व्वा व्वा करून दाखवाल का?

५)आवरू दे ......अभिनंदन केल्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन!

६)लग्न माझे ठेपले...........प्रतिसाद नीट समजला नाही. बहुतेक शालजोडीतला असावा. तसे असल्यास पर्यायी शेर द्याल का?

७)आज झिजताना.............समर्थ पर्यायी पहिली ओळ सुचवाल का? किंवा पूर्ण पर्यायी शेर लिहाल का?

८)शेवटच्या शेरावर आपण दिलेल्या दादेबद्दल आपल्यालाही व्वा! व्वा!
...........प्रा.सतीश देवपूरकर

अ‍ॅग्रीड विथ बेफिजी...!

लेखनगर्भनिष्ठा.......... DesiSmileys.com

म्हणजे काय ते नक्की कळलं नाही... पण 'लै भारी' वाटलं.

आली आली कोकिळा आली या कवितेत एकदाची. पशूपक्षी पाहिजेतच. पत्रिका माबोवर प्रकाशित करा हो देवपूरकर, आमच्या जालन्यात म्हणतात की लग्नाला न बोलावता जावे. आम्ही दोघेच, मी आणि माझा लिटल जिमी. तोंडावर आलंय लग्न, नंतर डोक्यावरही बसतं. काळजी करू नका, काळजी घ्या

ओठ होते गप्प, डोळे बोलले डोळ्यांसवे;
अन् कशी जाहीर झाली आपली संभाषणे?<<< तुम्हाला 'अन' आणि 'पण' हे समानार्थी शब्द वाटतात का? की 'अन कशी' ऐवजी 'पण तरी' हवे होते? बाकी हा शेर 'गझलेचा' आहे

अन कशी' ऐवजी 'पण तरी' हवे होते? बाकी हा शेर 'गझलेचा' आहे Lol

बेफि. हे विधान आभ्यासपुर्वक आहे की आपले असेच सहज केले आहे?

बेफि. हे विधान आभ्यासपुर्वक आहे की आपले असेच सहज केले आहे?<<<

मी नेहमीच 'आपले असेच सहज'च बोलतो, लोकांना ते उगाचच अभ्यासपूर्वक वाटते.

ओठ होते गप्प, डोळे बोलले डोळ्यांसवे;
अन् कशी जाहीर झाली आपली संभाषणे? <<< सुंदर शेर >>>

पाहिल्या होत्या तिच्या मी भावमुद्रा चोरुनी;
गूढ वाटे आजही मजला तिचे ते पाहणे! <<< व्वा ! मस्त >>>

आवरू दे....जाहला माझा पसारा केवढा!
पैलतीराचे कधीचे ऎकतो बोलावणे!! <<< खूप सुंदर >>>

----- सुंदर गझल

दुसरी ओळही व्वा व्वा करून दाखवाल का?/पर्यायी शेर द्याल का?/ पूर्ण पर्यायी शेर लिहाल का?>>>>>>>>>>>>>>>>>>

-आमचे बेफीजी एक 'ओरीजनल गझलकार' आहेत हे निदान यापुढेतरी कधीही विसरू नये ही प्रेमळ तम्बी !!!

लेखनगर्भनिष्ठा.......... >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

गझलेची लेखनगर्भनिष्ठा भले अम्हाला समजत नसेलही पण प्रतिसादलेखनाची लेखनगर्भनिष्ठा अम्हा 'माबो'कराना नक्की समजते यावर आपला विश्वास बसणार नाही हे मला माहीत आहे तरी बसावा हीच विठ्ठलचरणी प्रार्थना !!!!


टीपः हलके घ्या !!!Happy

शामू तुला काय कळतं रे यातलं? मोठा हे छान ते नेहमीप्रमाणे म्हणायला आणि पिंका टाकायला येऊन गेलास? अर्धा मंगेश पाडगावकर कुठला.

मी नेहमीच 'आपले असेच सहज'च बोलतो, लोकांना ते उगाचच अभ्यासपूर्वक वाटते.

बेफ्या, जायचे तर पूर्ण तरी जा माबोवरून? सगळीकडे नाक खुपसायला पाहिजेच का? म्हणे ओरिजिनल गझलकार. जाताना पिल्लावळीलाही आवरून घेऊन जा मात्र. चल लिटल जिमी, रात्र व्हायला आली.

मोहीनी .. शामू नको म्हणूस गं... मला उगीच लिटील जिमीचा बापूस असल्यासारखं वाटू लागलंय Wink

अर्धी बाबू कुठली

देवसर: आपल्याशी काल दिनांक ६/९/२०१२ रोजी दूरध्वनीवर झालेल्या विस्तृत चर्चेत मी माझी जी आपणास गझल ऐकवली होती ते चार शेर व आज सुचलेला पाचवा शेर आपणास विचारपूस मधे पाठवत आहे मला एक अत्यंत छान पाचवा शेर अजून सुचलेला नाही आहे

आपल्याकडून अपेक्षित असलेल्या मदतीच्या प्रतीक्षेत ..........................
-वैवकु

धन्यवाद !!