काही मोजकेच चित्रपट असे असतात जे प्रदर्शित झाल्यावर इतके गाजतात की अश्या चित्रपटांवरुन प्रेरणा घेउन इतर चित्रपट तयार होतात. ते प्रचलित असणारी परंपरा मोडुन नविन परंपरा रुजवतात. अशाच काही चित्रपटांची निव्वळ माहीती आपल्या समोर सादर करीत आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीला दिशा देणारे काही महत्वाचे हिंदी चित्रपट माझ्या नजरेतुन:
१) राजा हरिशचंद्र : दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेला पहिला भारतीय चित्रपट. १९१३ साली खुप कष्ट घेउन फाळके यांनी हा चित्रपट निर्माण केलेला.या चित्रपटातुनच भारतीय चित्रपट सृष्टीची मुहुर्तमेढ रोवलेली. हा मुकचित्रपट होता. संवाद पाट्यांवर लिहुन प्रसंगाच्या मधे दाखवले जायचे. फाळके स्वतः इंग्लंड ला जाउन चित्रपट तयार करण्याचे तंत्र शिकुन घेतले व भारतात स्वदेशी तंत्रज्ञांच्या मदतिने हा चित्रपट तयार केला. या चित्रपटात सगळेच कलाकार पुरुष मंडळी होती. बायकांची कॅरेक्टर सुध्दा पुरुषच करत होते..त्या काळात बायकांनी नाटक सिनेमा यांत काम करण्याला समाजमान्यता नव्हती.
२) आलमआरा: भारतीय पहिला बोलपट. अर्देर्शिर इराणी यांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच बोलपट हा १९३१साली प्रदर्शित झालेला. यात मास्टर विठठल, पृथ्विराज कपुर आणि झुबेदा यांनी काम केलेले होते..या अर्थी झुबेदा या पहिल्या भारतिय अभिनेत्री म्हणुन उल्लेखल्या गेल्या. एक बंजारन आणि राजकुमार यांच्यातील प्रेमावर हा चित्रपट आधारीत होता. या चित्रपटातले गाणे "देदे खुदा के नाम पर" हे भारतीय सिनेमाचे पहिले संगीत आणि गाणे होते आणि हे गाणे गाणारे " मोहम्मद खान" हे पहिले गायक बनले. त्या काळात पार्श्वगायन हा प्रकार नव्हता. त्यामुळे हर्मोनियम आणि तबला यांच्या तालावर प्रत्यक्ष चित्रित केले गेलेले. एका अर्थाने अभिनेता, अभिनेत्री, गायक आणि संगीत या गोष्टी प्रथम देणारा चित्रपट बनला.
३) किसन कन्या: १९३७ ला प्रदर्शित झालेला " किसन कन्या" हा पहिला रंगीत सिनेमा होता. हा सुध्दा इराणी यांनी दिग्दर्शित केलेला.यात पद्मावती आणि गुलाम अली या कलाकारांनी अभिनय केलेला होता इराणी यांनी अमेरिकेतुन रंगीत सिनेमा बनवण्याचे तंत्र मागवलेले आणि इथे भारतात तंत्रज्ञांच्या मदतीने बनवलेला. याच्या आधी व्ही शांताराम यांनी १९३३ ला "सैंरंध्री" नावाचा चित्रपटातले काही दृष्य रंगीत बनवलेले परंतु त्यासाठी त्यांनी चित्रपट रिळे जर्मनी ला घेउन गेलेले. "किसन कन्या" यात सगळे तंत्र हे स्वदेशी वापरलेले. त्यामुळे हा पहिला भारतीय रंगीत सिनेमा ठरतो त्याच वेळेत तयार झालेला "अछुत कन्या" प्रभात टॉकिज ने बनवलेला यात देवकी राणी आणि अशोक कुमार यांनी काम केलेले. हा चित्र्पट आणि देवकीराणी इतक्या गाजल्या त्याकाळात की लोकांनी देवकीराणीला "सुपरस्टार" बनवलेले. लोकप्रियेतेच्या उत्तुंग भरार्या "अछुत कन्या" ने घेतल्या होत्या.
४) मुघले आजम: तब्बल ९ वर्षे तयार होणारा हा चित्रपट भारतातील महत्वाच्या चित्रपटामधे गणला जातो.१९६० साली आलेल्या या चित्रपटाने दर्शकांना चित्रपटाची भव्यता आणि सौदर्य काय असते याची प्रचिती दिली. दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्विराज कपुर यांसारखे कसलेले कलाकार त्याबरोबर के आसिफ यांचे दिग्दर्शन यांनी भारताला अप्रतिम कलाकृती दिली आहे. संपुर्ण चित्रपट कृष्णधवल होता परंतु यातील "प्यार किया तो डरना क्या" हे गाणे आसिफ यांनी रंगीत चित्रण केले होते. त्यावेळेस नुकतेच रंगीत तंत्र आकारास येत होते. चित्रपटाची फ्रेम ही एक कलाकृती होती. प्रत्येक प्रसंगावर कमालीची मेहनत घेतलेली. आरसामहल निव्वळ एका गाण्यासाठी उभा केलेला.होता यावरुन आसिफ यांची कलासक्ती दिसुन येते. मधुबालाचे रुप हजारो आरशातुन दाखवण्यारा प्रसंगासाठी कित्येक दिवस खर्ची झालेले. "मुघले आजम" खर्या अर्थाने भव्य आणि अमर चित्रकृती होता.
५) संगमः राजकपुर दिग्दर्शीत हा चित्रपट पहिला संपुर्ण टेक्निकली रंगीत सिनेमा होता. वैजंतीमाला , राजकपुर, राजेंद्रकुमार अभिनित हा चित्रपट पहिला मोठया लांबीचा चित्र्पट होता. प्रेम त्रिकोणावर आधारीत सिनेमाने लोकांना हिरो आणि हिरोईन् दिले. बॉक्स ऑफिस वर प्रचंड कमाई करणारा ठरला, रंगीत असल्यामुळे आणि प्रसिध्द अभिनेत्यांच्या अदाकारी मुळे "संगम" देशात आणि विदेशात सुध्दा प्रचंड कमाई करणारा ठरला.
६) शोले: सुरुवातीला परिक्षक आणि प्रेक्षकांनी टिका केलेला हा चित्रपट "फिनिक्स" पक्ष्यासारखा राखेतुन झेप घेणारा ठरला. १९७५ साली सिप्पींनी दिग्दर्शीत चित्रपट झळकला. त्यांनंतर तो एक दंतकथाच ठरला. अभिनय, संगीत, गाणे, मारामारी, दृश्यचित्रण या सर्वच बाबतीत मैलाचा दगड ठरला. संजीवकुमार, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, जया, आणि अमजद खान यांच्या अविस्मरणीय अभिनयाने बनलेला चित्रपट आजही चित्रपटांमधे कळस मानला जातो. या चित्रपटा आधी मारामारी ही निव्वळ ढिशुम ढिशुमच होती. खरी मारामारी या चित्रपटातुन दिसली. रेल्वे लुटायला आलेले डाकु त्यांचा घोड्यांवरुन सुरु असलेला पाठलाग . गोळी लागल्यावर घोड्यांसकट डाकुंचे पडणे. हे पहिल्यांदाच लोकांना दिसत होते या प्रसंगातुन खरी बॉलीवुड स्टाईल मारामारी जन्माला आली. जी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. यातला एक मारामारीचा चित्रपट मनावर कायम्चा कोरलेला आहे.. संजिव कपुर आणि अमिताभ बोगी मधे बोलत असताना बोगीच्या टपावरुन एक डाकु पळत येत असतो. त्याचा आवाज ऐकुन अमिताभ दरवाजा मधुन बाहेर उलटी उडी मारुन छतावर आलेल्या डाकुला गोळी मारतो.. निव्वळ अप्रतिम दृश्य ...गोळी मारल्या नंतर ची शांतता आणि त्यात फक्त गाडीचा आवाज...सुंदर पार्श्वसंगीत बर्मन यांचे... आजही इतकी वर्षे झाली तरी सुध्दा लोक शोले न कंटाळता बघतात...हीच या चित्रपटाची मोहिनी आहे.
७) दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे: प्रेमकथेवर बरेच चित्रपट येउन गेले त्यातले कित्येक चित्रपट गाजले लोकप्रिय झाले. पण १९९५ ला प्रदर्शित झालेला यश चोप्रा दिग्दशित चित्रपटाने भारतीय सिनेमाला एक प्रेमकथेची स्टाईल दिली. शाहरुख खानचा "राज".. काजोल ची "सिमरन" हे प्रत्येक तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले. कित्येक जणाना आपली सिमरन ट्रेन च्या मागे धावताना दिसत होती ( बहुदा त्यातुनच ट्रेन च्या दरवाज्याला लटकायची प्रथा सुरु झाली). जतिन ललित चे सुमधुर संगीत आणि मनमोहन सिंग यांचा छायांकन यातुन चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळाली. इंडीयाटाईम्स च्या "आयुष्यात बघितलेच पाहिजे" लिस्ट मधे "मदर इंडीया आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" या दोन भारतीय चित्रपटांचा समावेश केला आहे. या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपट मधे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आज जी काही सिनेसृष्टीमधे प्रेमकथा आहे त्यांतल्या स्टाईल ची जननी हा चित्रपट म्हणता येईल. इथुनच एक प्रेमकथा भव्यस्वरुपात आणि मंनोरंजनात्मक पध्दतीने सादर करण्याचा ट्रेंड निर्माण झाला.
८) सत्या: १९९८ साली आलेल्या गुन्हेगारी जगता वर आधारलेला या चित्रपटाने लोकांना त्या दुनियेतील अंतरंग उलगडुन दाखवले. रामगोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला पटकथा अनुराग कश्यप यांची होती. या आधी चित्रपटांमधुन खुनी, स्मग्लर यांचे जीवन मस्त मनोरंजनात्मक चकचकित महल असलेले स्वप्नावत दुनियेत राहणारे अशीच होती. या प्रतिमेला तडा देण्याचे काम "सत्या" ने केले. एक सामान्य मनुष्य चुकुन गुन्हेगारी विश्वाकडे गुरफुटला जातो. त्याची घुसमट, त्याचे प्रेम इत्यादी इतर सामान्य लोकांसारखेच आहे. याची जाणिव करुन दिली. गुन्हेगारी लोकांचे मन त्यांचे स्वभाव, त्यांची घरे, घरातली लोक, इत्यादी गोष्टींचे बारकाईने चित्रण केलेले. पहिल्यांदाच गुन्हेगारीचे अंतरंग उलगडुन दाखवणारा हा चित्रपट होता. यातुनच पुढे या क्षेत्राचे बारकाईने चित्रण केलेला कंपनी, ब्लॅक फ्रायडे,सरकार चित्रपट निर्माण झाले.
९) दिल चाहता है: प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर याचा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट. या चित्रपटाने आतापर्यंत चालत आलेले सगळेच चालीरीतींना फाटा दिला. मुख्यःत "संवाद" या क्षेत्रात फरहान ने स्वतः या चित्रपटाचे संवाद लिहिले होते जे आता पर्यंत आलेल्या सगळ्याच चित्रपटांपेक्षा वेगळे होते. या आधी चित्रपटांमधे मोठमोठे भावखाउ संवाद असण्याची परंपरा होती " जाओ पेहले उस आदमी की साईन ले के आओ जिस ने मेरे हात पे ये लिखा है".. ढँणटेडँग.. असल्या अवजड भावखाउ परंपरेविरुध्द.. कॉलेजकुमारांचे रोजचे संवाद लिहिले होते.. कुठेही मेलोड्रामाटाईप संवाद नव्हते. हे फिल्म्ससमिक्षकांनी सुध्दा आवर्जुन याचा उल्लेख केलेला. लोकांना विशेषतः तरुण मुलामुलींना जास्त आकर्षित झाले. एक सहज बोलल्यासारखे या चित्रपटाचे संवाद होते त्यामुळे सिनेसृष्टीला एक नविन संवादाची वाट या चित्रपटाने दाखवली. याच बरोबर नायक आणि नायिकांच्या दिसण्यावर सुध्दा या चित्रपटात मेहनत घेतलेली होती.आमिर खान चे स्टाईलिश केस कटींग, ओठांखाली छोटीसी दाढी, सैफ अलीचा एकदम फ्रेश लुक्स, प्रितीचे कुरळे केलेले केस, (अक्षय चा तर मिलिट्री कट होता..त्याची उगवतच नव्हती केस तर दुसरी काय स्टाईल होणार होती म्हणा) असो... या सगळ्यानी एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना दिलेला.. या आधीच्या चित्रपटामधे नायक इंस्पेक्टर असो अथवा कॉलेजकुमार असो. केस मानेवर रुळणारीच होती.(याला आधी आमिरखान पण अपवाद नव्हता. आठवा "बाजी" नावाचा चित्रपट) लुक्स मधे बदल करण्यासाठी या आधी नायक नायिका तयार होत नसत. त्यांना आपल्या इमेज जपण्यावर जास्त भर होता. ही इमेज तोडण्याचा पहिला प्रयत्न आमिर खान ने केला. संवाद आणि लुक्स मधे बदल करण्याचे श्रेय या चित्रपटाकडे जाते इथुन मग लुक्स बदलण्याचा ट्रेंड सुरु झाला. मंगल पांडे मधला आमिर खान, ओमकारा मधला लंगडात्यागी बनलेला सैफ, इत्यादी लोकांनी लुक्स बदलण्याचा धोका पत्करला.
१०) हेराफेरी: धमाल विनोदी चित्रपट म्हणुन ओळख असलेल्या या चित्रपटाने निखळ विनोदाचा ट्रेंड आणला. संपुर्ण चित्रपटामधे प्रेक्षक मनमुराद खळखळुन हसतो. छोट्या छोट्या रोज घडणार्या प्रसंगातुन विनोद निर्मिती केली आहे. मुद्दामुन द्विदार्थी संवाद, अचकट विचकट अंगक्षेपातुन विनोद निर्माण केलेला नव्हता. या आधी लोकांना गोविंदा, कादरखान शक्ति कपुर यांसारख्या अचकट वैताग आणनार्या लोकांना बघुन जबदस्तीने हसायला लागायचे. असल्या बेक्कार लोकांपासुन सुटका करण्याचे पवित्र कार्य या चित्रपटाने केले.. निखळ मनोरंजन काय असते ते या चित्रपटाने दाखवले. यामुळेच पुढे लेखकांनी खरे विनोदी प्रसंग लिहायला सुरुवात केली. मालामाल विकली,हंगामा, हलचल सारखे चित्रपट यातुनच पुढे निर्माण झाले.. भारतीय प्रेक्षकांना कादरखान शक्तिकपुर सारख्या आचरट विनोदापासुन सुटका करुन देणार्या चित्रपटाला सलाम.
११) भुत: मला घाबरवणारा पहिलाच चित्रपट. या आधी भुताचे चित्रपट म्हणजे रामसे.. त्यात घाबरणे कमी करमणुकच जास्त होणारी. त्यामुळे जेव्हा "भुत" प्रदर्शित झालेला तेव्हा हसत हसत चित्रपटगृहात गृप सोबत गेलो. त्यानंतर असे काही पडद्यावर घडले. नखशिखांत हदरलेलो मी. इंटरवल पर्यंत मुलीमधे बसलेलो दोन्ही हाताला दोन मुलींनी इतक्या जोरात पकडुन ठेवलेले कि त्यांच्या नखांनी हाताला जखमा झालेल्या. इज्जतीत इंटरवल मधे उठुन गृपच्या कोपर्यात जाउन बसलो. एका प्रसंगात उर्मिला सिनेमा हॉल मधे बसलेली असते आणि अचानक बाजुची माणसे गायब होतात. बापरे.. सगळा गृप घाबरुन आजुबाजुला पाहत होता. इथे तर माणसे गायब नाही झालीत का.? या चित्रपटाने भुत दाखवण्याचा एक वेगळाच प्रकार निर्माण केला. बेल चे वाजणे, नायिके चे बघणे.. आरशातुन ओझरता भुताचे दिसने..संपुर्ण चित्रपटात शेवटीच भुत दाखवले..परंतु पार्श्वसंगीत आणि उर्मिलाचा अभिनय यांनी आम्हा प्रेक्षकांना असे काही जखडुन ठेवलेले की आम्ही मनात असुन सुध्दा खुर्चीवरुन तासुभर सुध्दा हलु शकत नव्हतो. जबदस्त आघात या चित्रपटाने प्रेक्षकांवर केलेला. इतकी सशक्त पटकथा आणि दिग्दशन होते. घरी गेल्यावर सुध्दा मी चुकुन आरशा समोर बसलेलो. अचानक चित्रपटातले दृश्य डोळ्यासमोर तराळुन गेले. झटका बसल्यासारखा आरशासमोरुन बाजुला झालो. इतकी दहशत निर्माण झालेली. भुत चित्रपटातुन दिलेला बदल हा नक्कीच आशादायक होता. पुढे वास्तु शास्त्र, हंटेड, १९२० इत्यादी चांगल्या भितीदायक चित्रपटांची निर्मिती झाली.
१२) लगान: शोले नंतर प्रत्येक कॅरक्टर ला न्याय देणारा चित्रपट. शोले प्रमाणे या ही चित्रपटातले एक एक प्रसंग आणि कॅरेक्टर लक्षात राहते.. एका खेळावर आधारित हा चित्रपट भारतीय आणि इंग्लंड मधला सेतु होता. रेहमान से सुमधुर आणि जागतिक पातळीवरचे संगीत या चित्रपटाला वलय मिळवुन दिले. जगाला दखल घेण्यास भाग पाडणारा चित्रपट होता. आमिर खान आणि आशुतोष गोवारिकर यांनी मिळुन बनवलेला चित्रपट प्रचंड लोकप्रिय झालेला. ब्रिटीश साम्राज्याला लगान विरुध्द आव्हान देनारा नायक. त्याला साथ देणारी ब्रिटिश अधिकार्याची बहिन..मनोमन नायकावर प्रेम करणारी गावातलीच मुलगी. लगान माफ करण्यासाठी जगावेगळे आव्हान स्वीकारुन ब्रिटीशांना त्यांचाच खेळ शिकुन त्यातच पराभव करणारा नायक . सगळे चित्रण अप्रतिम होते.. या चित्रपटात पहिल्यांदाच "अवधी" बोलीभाषेचा प्रयोग केला गेलेला. त्याच बरोबर संवाद हे चित्रिकरणाच्यावेळेसच रेकॉर्डिंग (सिंक रेकॉर्डिंग) केलेले. त्यामुळे प्रसंग अधिक उठावदार झालेले. हा प्रयोग आधी सत्ते पे सत्ता या चित्रपटा मधे एकाच प्रसंगा साठी झालेला.( जेव्हा अमिताभ पहिल्यांदा अमजद खान च्या घरी जातो आणि तिथे आपल्या भावांची माहीती देतो) हा प्रसंग मुद्दामुन अमिताभ ने डबिंग न करता केलेला. त्याच्या मते. पिउन केलेला अभिनयातुन जे संवाद येतात त्याची सर डंबिंग केलेल्या संवादातुन नाही येणार.
१३) रा. वन: चित्रपट भले आपटला, चालला जे काही झाले परंतु या चित्रपटाने भारतीय चित्रजगाला अॅनिमेशन चा आविष्कार दिला. या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स हे हॉलिवुडच्या तोडीस तोड होते. पहिल्यांदाच चित्रपटाच्या निर्मितीच्या खर्चापेक्षा त्यातल्या स्पेशल इफेक्ट्स वर जास्त खर्च झालेला. मुम्बई टर्मिनस ची इमारत कोसळणे, भरधाव चालणारी लोकल..तिचा पाठलाग करणारा शाहरुख खान. सगळे स्पेशल इफेक्ट्स मधुन साकार झालेले विशेषतः हे जास्तीत जास्त इफेक्स्ट्स भारतीय लोकांनीच तयार केलेले. माया, ३डी आयमॅक्स सारखे परदेशी चित्रपटात वापरले जाणारे सॉफ्टवेअर्स हिंदी चित्रपटामधे वापरले गेले. तंत्र इतके बेलुमान होते की पळणारा शाहरुख नाही आहे तर त्याचा डुप्लिकेट आहे हे कळुन येत नव्हते. उदा. ट्रेन च्या पाठलागा मधे शाहरुख खान एका डब्ब्यावरुन दुसर्या डब्ब्यावर कोलांटीउडी घेतो. या दृष्यात शाहरुख चा डुप्लिकेट वापरा आहे. पण आपल्याला तो सीन शाहरुखच करतोय असे दिसुन येते. स्पेशल इफेक्ट द्वारे पहिल्यांदाच भारतीय चित्रपटामधे हे दृश्य निर्माण केले. यात डुप्लिकेट व्यक्तीचा चेहर्याचा भाग डिलिट करुन त्या जागी शाहरुख चा चेहरा फिट केला गेला आहे. या आधी डुप्लिकेट वापरलेले दृश्य दाखवताना एक तर लांबुन दाखवले जात होते अथवा चेहरा न दिसेल पाठिमागुन नायक दिसेल असे वापरले जात होते..इथे प्रथमच एका चेहर्यावर दुसर्याचा चेहरा चिटकवुन दृश्य निर्माण केले जात होते. या तंत्रज्ञानाचा उपयोग भविष्यात फार होणार आहे. हॉलिवुड मधे याच तंत्रांचा उपयोग करुन कित्येक चित्रपट निर्माण केले जातात ज्यात असे वाटते खरच नायक स्वतः स्टंट करतोय..आगामी क्रिश२, धुम३, इत्यादी चित्रपटामधे या इफेक्ट्स चा वापर झालेला दिसेल.
या काही महत्वाच्या चित्रपटांनी भारतीय सिनेमाला माझ्या नजरेतुन वेळेवेळी एक नविन कलटणी दिली आहे. बाकी चित्रपट हे एक मनोरंजनाचे साहित्य आहे.. रोजच्या धगधगीच्या आयुष्याला २-३ तास विसरण्याची सुविधा करुन देणारे माध्यम म्हणुन बघावे. काही चित्रपट आयुष्याला कलाटणी देतात. काही चित्रपट जगण्याची नविन आस, शक्ती देतात. तर काही चित्रपट आयुष्याच्या प्रसंगावर मात करण्याचे मार्ग देतात.. जीवन हे एक चित्रपट आहे...यात दुखः आहे सुख आहे. जगातले सारे नवरस या चित्रपटांद्वारे आपल्याला रसग्रहण करायला मिळतात........
.
एक सलाम ............चित्रपट निर्माण करणार्या सृष्टीला.......
या लिस्टीत ३ इडियट्स
या लिस्टीत ३ इडियट्स राहिलाय
लेख छान जमलाय
छान लेख पण ७५ ते ९५ मध्ये
छान लेख
पण ७५ ते ९५ मध्ये बरेच गाजलेले सिनेमे येऊन गेले रे... तु तब्बल २० वर्षातले सिनेमे ह्या लेखात घेतले नाही.... ह्याच काळात राजेश खन्ना चे हिट सिनेमे होते...
त्या २० वर्षात कोणताही बदल
त्या २० वर्षात कोणताही बदल देणारे चित्रपट आलेच नाहीत.. एकसुरी अमिताभ बच्चन चे "वन मॅन " टाईप होते.... कोणत्या चित्रपटा बद्दल लिहु ????
आढावा खासच. स्पर्धे साठी
आढावा खासच.
स्पर्धे साठी शुभेच्छा!!!
रच्याकने - रा. वन च्या जागी रोबो काही नाही घेतलास??? तो डब मुव्ही आहे म्हणुन का??
काही अपवाद वगळता हास्यास्पद
काही अपवाद वगळता हास्यास्पद आणि बालीश निवड. उदा. दिदुलेजा, संगम
मुळात दिशा दिली म्हणजे काय केले?
मस्तच आढावा रे ! धन्स रच्याक
मस्तच आढावा रे ! धन्स
रच्याक एक टायपो झालीय << भुत: मला घाबरणारा पहिलाच भुताचा चित्रपट. >>> तेवढी सुधारुन घे. शुभेच्छा
लेख मनापासून लिहिलाय, अर्थात
लेख मनापासून लिहिलाय, अर्थात प्रत्येकाच्या मते ट्रेंड सेटर्स वेगळे असणार. अमोल पालेकर (रजनीगंधा, छोटीसी बात, चितचोर) परंपरा होती. पण मग ती आटली. ऋषिकेश मुखर्जींनी अगदी झूठ बोले कौआ काटे, पर्यंत किल्ला लढवला.
अशोककुमारचा किस्मत पण ट्रेंड सेटर होता.
उदय तुझ्या नजरेतुन आलेला
उदय तुझ्या नजरेतुन आलेला आढावा छान जमलाय, नाहीतर पाने च्या पाने खर्ची घालावी लागतील तुला
पुलेशु रे
भारतीय
भारतीय चित्रपटसृष्टी?
पॉप्युलर हिंदी पुरतं म्हणा हो. (तेही पूर्ण नाहीये पण तुमचं मत म्हणून सोडून देता येईल)
भारतीय चित्रपटसृष्टी म्हणायचं तर सत्यजित रे, अदूर गोपालकृष्णन, गिरीश कर्नाड, शाजी करण, गिरीश कासारवल्ली, गौतम घोष, ऋतूपर्ण घोष असे अनेक महत्वाचे दिग्दर्शक आणि त्यांचे चित्रपट विचारात घ्यावे लागतील.
यप्प... नीरजाला अनुमोदन !
यप्प...
नीरजाला अनुमोदन !
नीधप जी.... वर हिंदी हा शब्द
नीधप जी.... वर हिंदी हा शब्द आवर्जून वापरला आहे..
लेख सुंदर! आढावा पटण्याजोगाच!
लेख सुंदर! आढावा पटण्याजोगाच! महत्वाचा लेखही वाटत आहे.
'अर्थात प्रत्येकाच्या मते ट्रेंडसेटर्स वेगवेगळे असणार'<<< या विधानाशीही सहमत!
उत्तम लेखासाठी धन्यवाद व शुभेच्छा!
=====================
मैने प्यार किया, कयामत से कयामत तक, हम आपके है कौन हेही ट्रेंड सेटर्स ठरले काही प्रमाणात (किंवा बर्याच प्रमाणात).
बॉबी वरील लिस्टमध्ये असायला हवा होते असे वाटून गेले.
अमर अकबर अॅन्थनीने एक 'निव्वळ व इल्लॉजिकल' मनोरंजनाची दिशा बर्यापैकी दिली असावी.
======================
अर्थात, तरीही लेखात समाविष्ट झालेले चित्रपट अफाट जास्त महत्वाचे आहेत हे नक्कीच
=====================
मराठीत आता खूप वारंवार (आणि लेखी भाषेतही) 'केलेला, गेलेला, पाहिलेला' असे उल्लेख येतात. या लेखाशी, स्पर्धेशी किंवा मित्र उदयन यांच्याशी या विधानाचा संबंध नाही, पण असे उल्लेख वाचून डोक्यात तिडीक जाते. कदाचित ही चूक माझीच असावी.
-'बेफिकीर'!
छान घेतलाय आढावा. लेखात
छान घेतलाय आढावा.
लेखात बर्याच ठीकाणी झालेले "टायपो" तेवढे दुरुस्त करुन घ्या.
स्पर्धेसाठी शुभेच्छा.
अहो तुमच्या शीर्षकात तुम्ही
अहो तुमच्या शीर्षकात तुम्ही 'भारतीय चित्रपटसृष्टी' म्हणलंय. पॉप्युलर हिंदी सिनेमाच्या पलिकडे खूप मोठी आहे भारतीय चित्रपटसृष्टी. या हिंदी सिनेमांमुळे संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला दिशा मिळाली हा दावा जरा जास्तच वाटतो.
हे परिक्षक ठरवतील असे
हे परिक्षक ठरवतील असे खात्रीलायकरीत्या वाटत आहे. (भारतीय चित्रपटसृष्टीला पॉप्युलर हिंदी सिनेमाने काहीच दिशा दिली नसेल का असेही मनात आले). बाकी काहीच दिशा न मिळणे हेही दिशा मिळण्यासारखे असेलही बहुधा.
छान लेख आहे.. हल्ली फार पटपट
छान लेख आहे..
हल्ली फार पटपट ट्रेंड चेंज होत आहेत..
दर ३-४ वर्षांनी एखादा सिनेमा नवीन ट्रेंड घेऊन येतोय..
रावण चा समावेश केलात हे ही उत्तम..
लेख आवडला थ्री इडियट हम आपके
लेख आवडला थ्री इडियट हम आपके है कौन असायला हवे होते असे मलाही वाटते.
धन्यवाद प्रतिक्रिये
धन्यवाद प्रतिक्रिये बद्द्ल......
शांग - रोबो हा चित्रपट हिंदी मधे डब होउन आलेला त्यामुळे विचार केला नाही. आणि त्याच्या इफ्फेक्ट्स बद्दल इतकी माहीती बाहेर पडली नाही (अथवा मला मिळाली नाही) त्यामुळे टेक्निकल बाबतीत त्याला मी विचारात घेतला नाही.
आगाउ - निवड. उदा. दिदुलेजा, संगम ..>>> माहीती निट वाचली नसेल वाटते आपण,, संगम हा पहिला टेक्निकल रंगीत चित्रपट होता. आता त्याने काय दिशा दिली हे लक्षात येईलच तुम्हाला ही आशा आहे. त्याच बरोबर दिलवाले... या चित्रपटाने इतरदेशात चांगले प्रदर्शन करुन भारतीय चित्रपटांना भारता बाहेर जगात देखील कमवता येते.. हे दाखवुन दिले.. त्यानंतर परदेशी चित्रपट वितरण जास्तीत जास्त करण्याचा विचार मिळाला.
दिनेश दा : धन्यवाद.. काही नजरेतुन नक्कीच सुटले आहेत.. समांतर चित्रपटांबद्दल जास्त माहीती नाही आहे खास करुन जुने.. आणि कामाच्याव्यापात शोधुन लिहिने जमत नाही.. काही असे ही चित्रपट आहेत जे समांतर असुनही त्यांनी मेनस्ट्रिम मधे चांगले चालले...ज्यातुन "हजारो ख्वाईशे ऐसी", "ब्लॅक फ्रायडे" सारखे चित्रपट पुढे आले.
नीधप : तुमचा सारखा जाणकार तज्ञ आम्ही नाही आहोत..;) जे बघु त्यातुनच आम्ही आकलन करतो. जी नावे आपण दिली आहेत ती फार मोठी नावे आहेत. मी सर्वसामान्य पणे विचार करुन चित्रपटांची निवड केली. सगळ्याच चित्रपटसृष्टीचा विचार केला तर १० च्या वर पाने उघडावी लागतील.. कारण प्रत्येक भाषेत अप्रतिम असे चित्रपट निर्माण झाले आहेत.."कांजीवरम" पथेर पांचाली, श्वास, असे बरेच से चित्रपटांनी बदल दिलेले आहेत.. मी त्यातल्या त्यात फक्त हिंदी चित्रपटातले सर्वसामान्य घेण्याचा प्रयत्न केला आहे..
विशालजी: धन्यवाद . चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल आनि प्रतिक्रिया दिल्याबद्दल
बेफी : लिखान हा माझा प्रांत नाही आहे.. इतके छान आनि शुध्द लिखान करणे आपल्या सारख्या प्रतिभावान लोकांच जमेल..आशा आहे आपण चुकांबद्दल माफ कराल.
लिहिण्यात लक्षात येईल तसे चित्रपट घेतलेले आहेत....... काही लक्षात आले नाही काही राहुन गेले....
धन्यवाद
तुमचा सारखा जाणकार तज्ञ आम्ही
तुमचा सारखा जाणकार तज्ञ आम्ही नाही आहोत..डोळा मारा <<<
इतकं वाकड्यात शिरायची गरज नाही.
घ्या तुमचा लेख उत्तमच आहे. सगळ्यात अप्रतिमच आहे. झालं. खुश?
घ्या.......आम्ही आपल्याला दाद
घ्या.......आम्ही आपल्याला दाद दिली...... आपण चुकीचा अर्थ काढला..
डोळे मारून दाद देतात का
डोळे मारून दाद देतात का तुमच्यात? बर.
मदर इंडिया नाही.. रा वन आहे?
मदर इंडिया नाही.. रा वन आहे?
लिस्ट अपूर्ण (आणि काही जागी अयोग्य) वाटली. अनेक विधानांशी असहमत.
पुनरागमनाबद्दल अभिनंदन
पुनरागमनाबद्दल अभिनंदन ज्ञानेश
(अवांतराबद्दल दिलगीर उदयन)
टेक्निकल रंगीत चित्रपट >>>
टेक्निकल रंगीत चित्रपट >>> म्हण्जे काय हो? तुम्हाला जर टेक्निकलर म्हणायचे असेल तर पहिली टेक्निकलर फिल्म 'आन' (१९५२) आहे किंवा सोहराब मोदीची 'झांसी की रानी' (१९५३)
तुमचा दावा मान्य जरी केला तरी 'टेक्निकली' रंगीत झाल्याने दिशा काय मिळाली?
हम आपके है कौन, दिदुलेजा च्या १ वर्षे आधी रिलिज झाला आणि ओव्हरसि़ज मार्केट्मधेही आधीच सुपरहिट होता, चोप्रांनी फक्त त्याचा ट्रेंड पुढे चालवला.
प्रतिसादांचीपण
प्रतिसादांचीपण गाथापाणउताराशती स्पर्धा आयोजीत करण्यात यावी का?
छान आढावा !
छान आढावा !
संगम सुध्दा ओवरसिझ मार्केट
संगम सुध्दा ओवरसिझ मार्केट मधे चांगलाच धंदा केलेला..
Sangam becomes huge success at the box office. Boxofficeindia.com reported the film had collected INR80,000,000 and its nett collection, INR40,000,000.[3] Similarly, Boxofficeindia.co.in reported the film had the same box office collection while its adjust to inflation by comparing the collection with the price of Gold in 1964 is about INR7,173,154,362 (US$129,834,093.95).[4] On contrary to the both report, Ibosnetwork.com claim that Sangam grossed around INR50,000,000 with its adjust to inflation grossed to INR7,602,400,000 (US$137,603,440).[5] By the end of its overall box office collection, Sangam was labelled as blockbuster at the box office where it was the highest grossing film of the year.[3]
Furthermore, Sangam also ranked as second highest grossing film of the decade by Boxofficeindia.com behind Mughal-e-Azam where its adjusted to inflation nett gross reportedly is about INR885,700,000 (US$16,031,170).[6] The film was also ranked at fourth by Boxofficeindia.co.in in their list of "Top 50 Film of Last 50 Years" which feature all-time highest grossing Bollywood film by using the relative price of gold in different years to arrive at a hypothetical current value of box-office collections of past films.[7]
थोडीफार आपल्याला कल्पना येईल ..समावेश का केला आहे याची...ही..अपेक्षा करतो..
दिदुलेजा च्याही आधी,
दिदुलेजा च्याही आधी, सलमानच्या " मैने प्यार किया" ने खरतरं ट्रेंड बदलला असे म्हणता येईल.
त्याचा कुठे समावेश दिसत नाही.
मिसिंग "ह्रिशीकेश मुखर्जी (
मिसिंग "ह्रिशीकेश मुखर्जी ( चुपके चुपके इत्यादी)
आणि parallel cinema