अन् दोन डोळे...

Submitted by बागेश्री on 30 August, 2012 - 03:03

एकच सूर्यकिरण
छेदत जाणारा,
मनावर आदळून परतणारा,
डोळ्यांत चकाकणारा!
अन् दोन डोळे,
मनाचे बिंब...

एकच आर्तता,
कालवा- कालव करणारी,
ओठांत अडकणारी,
थेट जाणवणारी,
अन् दोन डोळे
बंडखोर...

एकच हाक,
उरात दडलेली,
कधी न मारलेली,
तरीही ऐकलेली,
अन् दोन डोळे
अनभिज्ञ..

एकच खोटेपणा,
कुठेही नसलेला,
असल्याचे भासलेला,
खेळच संपलेला,
अन् दोन डोळे
अवघे गारद..

एकच जगणं
असं निसटलेलं,
वेळेने कातरलेलं,
वेळेनेच सावरलेलं,
अन् दोन डोळे
रिक्त, रिक्त....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच मस्त जमलिये.
असल्या काही कल्पना सुचायला "बागेश्री"च असावं लागतं. Happy
आवडली Happy

नेहमीप्रमाणेच मस्त जमलिये.
असल्या काही कल्पना सुचायला "बागेश्री"च असावं लागतं.
आवडली >>> प्रिला अनुमोदन. मस्त कविता !

छान Happy

छानच आहे!
Happy

एकच हाक,
उरात दडलेली,
कधी न मारलेली,
तरीही ऐकलेली,
अन् दोन डोळे
अनभिज्ञ..
हे सगळ्यात आवडलं..

कातरलेलं-सावरलेलं मध्ये कातरलेलं ऐवजी दुसरा शब्द अधिक योग्य वाटला असता, अस वैम.