गिरीजा

Submitted by prafulladutta on 29 August, 2012 - 18:55

स्वप्नात नेहमी येते एक परी माझ्या छान
सर्वांचे तिच्यावरती प्रेम अमाप अन उधाण
कळले असेल का तिला कधी आपणहून
झालो तिच्या प्रेमात अन सौदर्याने बेभान
एका भेटीतच मी तिला पुरता भाळावून गेलो
काळ्याभोर डोळ्यात तिच्या पाहून दंग झालो
गूढ जेंव्हा ती हसली पडली खळी गालाला
वाटले दाट केसात तिच्या गुदमरून घ्यावे मजला
चालताना वेणीला झटके जसे तुच्छारले जग
देई कटाक्ष मधुनी कमी होई विषण्णता मग
बोलताना वाटे आहे विश्वास तिचा माझ्यावर
नसे आजूबाजूला तेंव्हा मनात उठे काहूर
काही प्रश्न केला तर असे भुवई तिची वर
कधी कोणताही नसे तिच्याकडून होकार
तिच्यावाचून वाटे जग शून्य अन अपूर्ण

कसे जगता येईल तिच्याविना हा बेचैन प्रश्न
तिला आहे काळजी माझी आणि सौजन्याची भर
जरी ती मग्न आयुष्यात विस्कटणाऱ्या वारंवार
अशी हि मोहक परी नाही कोणाला गवसणार
गिरीजा नाव ठेवले मी , मला कौतुक तिचे फार !

Group content visibility: 
Public - accessible to all site users