अमेरीका सोडून जाताना क्रेडिट कार्डची पेमेंट ....

Submitted by झंपी on 29 August, 2012 - 13:48

मला एक माहीती हवीय,

एका केसमध्ये एकाला कंपनीने H1 विसा रीवोक केला व आता भारतात कायमचे निघून जायचे असताना आणि क्रेडिट कार्डची बरीचशी रक्कम(account balance) भरणं बाकी असताना काय प्रॉबलेम येवु शकतो? बिलं भारतातून भरण्याचा विचार आहे (कारण तेवढे पैसे इथे नाहीत व तिथून म्हतारे आई-वडीलांना पैसे पाठवण्याची सोयी बद्दल सांगणे-समजणे शक्य नाही.
पण हे काही प्रश्ण आहेत त्या व्यक्तीला,

इथून निघताना विमानतळावर काही चेक केले जाते का अश्या गोष्टींबद्दल(क्रेडिट हिस्टरी वगैरे)?

किंवा कश्या प्रकारची चौकशी होते वरच्यासारखी 'केस' असेल तर? h1 revoked, credit payments not closed etc.

कोणाला "खात्रीशीर माहीती आहे व अनुभव असेल अथवा एखादी लिंक असेल तर दिली तर बरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथून निघताना विमानतळावर काही चेक केले जाते का अश्या गोष्टींबद्दल(क्रेडिट हिस्टरी वगैरे)?

>> विमानतळावर फक्त सामान चेक करतात. माझ्या मित्राचा रिव्होक पण झाला होता. तो गेला. काही होत नाही. (विमानतळावर) आणि ऑनलाईन पेमेंट कुठूनही करता येते त्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही.

असे ऐकले आहे कि dot net crash नंतर बे एरियामधे बरेच जण आपापल्या किमती गाड्या रस्त्यावर सोडुन देश सोडून परत गेले. अर्थात त्यामूळे प्रवासाच्या वेळी चेक होण्याचे चान्सेस कमी आहेत.

धन्यवाद. ती व्यक्ती घाबरलेली आहे कारण कंपनीने विसा रीवोक केला हे कळवलेच न्हवते.
नोकरीच्या शोधात होता, नोकरी मिळाली म्हणून विसा ट्रान्स्फर केला तेव्हा क्यूरी आली मग कळले. पन काही कारणाने ३ महिने रहावे लागले. हा त्या व्यक्तीचा इलिगल रहाणे असल्याने घाबरला होता म्हणून विचारले.

असामी, मी पण तसे ऐकले आहे आणि ते खरे आहे. त्यामुळे नंतर बर्‍याच लोकांना Credit card देताना, बरीच चौकशी व्हायची.

केदार म्हणतो तसे ऑनलाईन पेमेंट कुठूनही करता येते त्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही.

रच्याकने, लोकं एवढी काय-काय खरेदी करतात?? जर त्यांना माहीत आहे "तेवढे पैसे इथे नाहीत" तर कशाला एवढी खरेदी करावी?

त्यामुळे नंतर बर्‍याच लोकांना Credit card देताना, बरीच चौकशी व्हायची. >> ती व्यक्ती देशात परत चालली असल्यामूळे तो problem नसावा. जर परत आली तर मात्र problem होउ शकतो.

क्रेडिट कार्डच्या बिलावर मिनिमम अमाउंट असते. तेवढी भरू शकणार असेल तर क्रेडिट कार्ड कंपनी खुशीत आणखी मुदत देइल. कारण त्यांना भरपूर व्याज मिळते त्यावर. बरेच लोक तसेच करतात.

मिनीमम अमाउंट जर भरू शकणार नसेल तर मात्र इतर प्रॉब्लेम्स आहेत - क्रेडिट रेटिंग्/स्कोअर वर परीणाम होईल. जो नंतर परत आल्यावर जास्त भेडसावेल.

असाम्या - ते गाड्या सोडून जाणे वगैरे बे एरियात तरी "मिथ" होते असे नंतर वाचले. अशा गाड्या रिकव्हर करणार्‍या येथील एका कंपनीची मुलाखत आली होती.

>>>रच्याकने, लोकं एवढी काय-काय खरेदी करतात?? जर त्यांना माहीत आहे "तेवढे पैसे इथे नाहीत" तर कशाला एवढी खरेदी करावी?<<

खरेदी विषते एकुठे लिहिलेय.
सारखा जॉबचा प्रॉबलेम असणार्‍या, h1 कंपनी कमी पैसे देत असताना लोकांना रोजच्या खाण्या, रहाण्य, जेवण्ञाचे पन पैसे नीट भरत येत नाही.. जेम्तेम पैसे भरून दिवस काढतात असे पाहिलेय.

खरेदी विषते एकुठे लिहिलेय.
सारखा जॉबचा प्रॉबलेम असणार्‍या, h1 कंपनी कमी पैसे देत असताना लोकांना रोजच्या खाण्या, रहाण्य, जेवण्ञाचे पन पैसे नीट भरत येत नाही.. जेम्तेम पैसे भरून दिवस काढतात असे पाहिलेय.
--------- कमी म्हणजे किती देते ? पदरचे पैसे खर्च करुन रहायला लागते आहे याचा अर्थ कुठेतरी चुकते आहे असे नाही का वाटत?

धन्यवाद. ती व्यक्ती घाबरलेली आहे कारण कंपनीने विसा रीवोक केला हे कळवलेच न्हवते.
नोकरीच्या शोधात होता, नोकरी मिळाली म्हणून विसा ट्रान्स्फर केला तेव्हा क्यूरी आली मग कळले. पन काही कारणाने ३ महिने रहावे लागले. हा त्या व्यक्तीचा इलिगल रहाणे असल्याने घाबरला होता म्हणून विचारले.
---------- सल्ला देणार्‍या सर्वांनी हे वाचले आहे का ? व्हिसा रिव्होक झाला आहे आणि त्यानंतर ३ महिने 'बेकायदेशीर' राहिला असे झाले आहे का? कंपनीने उशीरा कळवले, कळवले असेल पण याच्या पर्यंत कागद पोहोचलाच नाही हे कारणे विमानतळावर चालणार नाही (त्यांना कारणे एकायला वेळही नसतो). व्हिसा संपल्यानंतरही रहाणे हे नक्कीच तापदायक ठरु ठकते.