विषय क्रमांक १ - रंग दे बसंती

Submitted by साधासुधा on 28 August, 2012 - 08:54

हा चित्रपट आला त्यावेळी मी कॉलेज मध्ये होतो. त्यावेळी मी अमीर खानचा जबरदस्त पंखा होतो (अजून सुद्धा आहे). त्याचा कोणता चित्रपट येऊ घातला आहे, त्यात कोण कोण असणार आहे, कधी release होणार वैगरे माहिती माझ्याकडे हमखास असायची. तो "रंग दे बसंती" नावाचा चित्रपट करतोय हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय होता. एकतर तो चित्रपट येईपर्यंत तो नेमका कशावर बेतलाय हे माहिती नव्हतं. आणि त्यातली starcast जी ऐकून होतो ती फारच तगडी होती. त्यामुळे त्या चित्रपटा विषयीची उत्सुकता फारच ताणली गेली होती. असाच एकदा नेहमीच्या टपरीवर बसून चहा पीत असताना ते गाणं बघीतलं (त्यावेळी चहाची टपरी आणि मेस हेच आमचे TV बघण्याचे साधन होते.) अपनी तो पाठशाला, मस्ती कि पाठशाला. रेहमानच मुझिक आणि त्यावर ते फंडू lyrics. आणि त्यावर थिरकनारे आमीर, गुलाबो (अर्थातच तेव्हा गुलाबो हे नाव माहित नव्हत) आणि बाकीची मंडळी. दोन दिवस फ़क़्त ते गाणं कसलं भारीये आणि पिचर कसा भारी असेल ह्यावर चर्चा करण्यातच गेला. कॉलेज मध्ये जो तो ग्रुप हेच discuss करत होतं त्या वेळेस. तो प्रोमोच एका वेगळ्या लेवेलचा होता. विशेषता सगळे त्या उंचावरून एक एक करून slow motion मध्ये खाली पाण्यात उडी मारतात तो सीन किवा सगळे topless होऊन पळत जाऊन विमाना खाली उडी घेतात तो सीन . हे असलं काही पाहण्याची हिंदी चित्रपटात तरी सवय नव्हती. माझ्यामते तो प्रोमो हा आजपर्यंत मी पाहिलेल्या प्रोमोंपैकी सगळ्यात जास्त उत्कंठावर्धक (most intriguing) असेल.
त्यातले एक एक करून सगळे गाणे TV वर दिसायला लागले तोपर्यंत उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. आणि चित्रपट एकदाचा लागला. त्याकाळी बजेट लिमिटेड असल्यामुळे नीलायमला पहायचा ठरलं. बऱ्याचदा असा होता की चित्रपटाचा जेवढा hype होते तेवढा तो चित्रपट सुमार निघतो. चित्रपट बघायला जातानाही तीच भीती होती. पण चित्रपट चालू झालं आणि ते काही लक्षात राहिला नाही. लक्षात राहिला तो एक टवाळका ग्रुप, त्यांची मैत्री, त्यांचं देशप्रेम आणि त्यांचं बलिदान. पाच मित्रांनी देशप्रेमापोटी एका संरक्षण मंत्र्याला उडवाव हे एरवी डोक्याला पटलं नसतं कदाचित. पण गुलाबोच्या फिल्म निर्मितीच्या ओघात त्याचं झालेलं स्थित्यंतर हे न पटल्याशिवाय रहात नाही. चित्रपट संपल्यावर बाहेर पडलो तेवा सगळेच शांत होतो. खरच अंतर्मुखी करून गेला होता आम्हाला तो चित्रपट. पुढे जाऊन एका टपरीवर थांबून सिगारेटचे काही झुरके घेतल्यानंतर मग बोलायला सुरुवात झाली. अर्थातच सगळ्यांनाच चित्रपट भरपूर आवडून/स्पर्शून गेलेला होता. जेही काही expect केला होत त्यापेक्षा जास्तच मिळाल होत. पण शेवटी सगळ्यांच मरण आम्हाला सगळ्यांना काहीसं दुखी करून गेल होत.
सगळ्याच कलाकारांचा अभिनय तगडा झालाय. आमीर खान बद्दल तर विचारायलाच नको. पण त्यातल्या त्यात हॉस्पिटल मधून गुलाबोकडे आल्यावर ती जेवायला देते आणि हा जेवताना रडायला लागतो तो सीन, किवा जीप मध्ये बसून टीम लक लक वाला सीन फारच उत्कृष्ट झालेत. त्या वेळी मी boys बघितला असल्यामुळे सिद्धार्थचापण पंखा होतो. त्याची सिगारेट पिण्याची अदा आणि ते बोलणे "छोड ना यार, बाप का पैसा है, तिजोरी मे पडे पडे सड जाता है". फिदाच. अतुल कुलकर्णी देखील लाजवाबच होता. माधवन पण होता तेवढा जबरदस्तच आणि त्याची आई म्हणून वहीदाजी पण तेवढ्याच अप्रतिम. शर्मन जोशीचा सुखी थोडा सेल्फिश दाखवल्यामुळे तितकासा नव्हता आवडला पण अभिनय उत्तमच होता. सोहा तर ह्यापूर्वी मला सुंदर कधी वाटलीच नव्हती पण ती पण बरी दिसलीये. आणि गुलाबो तर एवढी आवडली की आम्ही तिच्या गुलाबो ह्या नावाला विशेषण बनवून टाकले होते. उत्कृष्ट संगीत, अप्रतिम गाणी व पार्श्वगायन (विशेषतः लता मंगेशकर व रेहमानच "लुका छुपी" आणि दलेर मेहेंदीच title song), अफलातून संवाद (एक पैर पास्ट मे ते एक पैर फ्युचर मे इसलिये तो साला हम आज पे मुतते है) अश्या बऱ्याच जमेच्या बाजू आणि त्यातही एक चांगला संदेश देऊन जाणे हेच ह्या चित्रपटाच यश मानव लागेल. जेसिका लाल केस रेओपेन होण्यासाठी जे जागोजागी मेणबत्ती मोर्चे निघालेत ते ह्याच चित्रपटावरून प्रेरित होऊन. माझ्यामते असा यश दुसर्या कुठल्याच चित्रपटाला मिळालं नसेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा सार्वजनिक करा...कृपया........
.
.छान आहे............अजुन वाढवा.......... ३ दिवस आहे अजुन