मदत!मदत!!मदत!!!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

नमस्कार मित्रांनो, मला एक लवकरात लवकर एक मदत हवी आहे. इथे सिंगापूरात बरेच साहित्य हवे तसे मिळत नाही. म्हणजे यंदा गणेशोत्सवात आम्हाला पौराणिक कथा वाचायच्या आहेत. त्यासाठी मला त्रिशंकूच्या कथेची दीर्घ आवृत्ती हवी आहे. मला नेटवरुन जी मिळाली ती वाचून लगेच संपेल. अगदी मिनिटा दोन मिनिटात. मला मैत्रेयी आणि गार्गि ह्यांच्या पण कथा हव्या आहेत. तसेच सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे देवी अनुसयामात हिच्या पतीव्रताची परिक्षा देवांनी कशी घेतली त्याबद्दलची कथा हवी आहे. अजून जर छान छान पौराणिक कथा कुणाकडे असतील तर मला ykakad@gmail.com वर स्कॅन्ड करुन पाठवा. मागे पण मला मायबोलिची फार मोठी मदत मिळाली होती. ह्यावेळी पण मदत करायला आपली मने उदार करा मित्रहो Happy

धन्यवाद.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

>>त्वरित मदत हवी आहे!
>>म्हणजे यंदा गणेशोत्सवात आम्हाला पौराणिक कथा वाचायच्या आहेत. त्यासाठी >>
>>मला त्रिशंकूच्या कथेची दीर्घ आवृत्ती हवी आहे.

त्रिशंकूच्या कथेची दीर्घ आवृत्ती हवी आहे. यात एवढे त्वरित मदत करण्यासारखे काय आहे मला वाटले कुणाला रक्त वगैरे हव आहे का..धाग्याचे शिर्षक अगदिच दिशाभुल करणारे आहे.

बी, गार्गी वर मी एक कथा लिहिली होती. त्यावरचे प्रतिसाद पण चांगले होते. तूला योग्य वाटली, तर अवश्य वापर.

ती वाचलीस तर त्रिशंकूची कथा तूला स्वतःलाच फुलवता येईल.

माफ करा जर शीर्षकाचे नाव वाचून हृदयात धडकी भरली असेल तर.

झक्कास, लवकर दे कारण लवकरच निवड चाचणी आहे Happy तुझे नाव वाचून मला तू 'तो' आहे असे वाटले होते Happy

हि हि हि ..अनिलभाई,

तुमची चुक नाहीये. मला 'बी' वाचून लेडीज वाट्ले. बी ला 'झककास' वाचून पुरुष वाट्ले.

हाईट सांगू...बी ने विपू केली...खाली नांव..'यशवंत' मी चक्रावले. 'हा कोण यशवंत???' वाट्ले, बी चा भाऊ तर नाही

---झककास उर्फ विनिता

काय हवे आहे ते शीर्षकात लिहीले तर बरे पडेल. हे म्हणजे त्वरित रक्त हवे आहे कृपया हॉस्पिटल ला फोन करा असे वाट्ते आहे.