श्री नरेंद्र गोळे ह्यांचे अभिनंदन!

Submitted by प्रमोद देव on 27 August, 2012 - 05:27

लोकसत्तेच्या दिनांक २७ ऑगस्ट २०१२च्या इ-अंकात वाचावे नेटके ह्या सदरात मायबोलीचे एक सदस्य श्री नरेंद्र गोळे आणि ते लिहीत असलेले ब्लॉग(अनुदिनी) ह्यासंबंधी विस्तृत परिचय करून देण्यात आलेला आहे.
श्री नरेंद्र गोळे ह्यांचे हार्दिक अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन गोळे काका

काकांच्या ब्लॉग मधील एका लेखात मी काढलेले काही फोटो समाविष्ठ असल्याने आनंद दुणावल्या गेला आहे Happy

आणि एक माहिती आहे का त्यांच्या ब्लॉगवर मी घेतलेले कंबोडियाचे एक चित्र आहे गुळासंबंधी.

नरेन्द्रजींचे अभिनंदन.

धन्यवाद देवकाका!

खरे तर लोकसत्ताच्या वाचावे नेटके सदराचेही अनेकानेक धन्यवाद.
कारण त्यांच्या समीक्षेमुळे अनुदिनी अनेक वाचकांपर्यंत पोहोचू शकेल.

सर्व प्रतिसादकांस आणि सुहृदांस मनःपूर्वक धन्यवाद.
मायबोलीवरील अनेक सृजनकर्त्यांच्या सृजनाची नोंदही माझ्या अनुदिनीवर केलेली असल्यानेच,
खरे तर ती दखलपात्र झालेली आहे.

त्यामुळे एका अर्थाने हा मायबोलीकरांचा तसेच तिथे सहभागी असणार्‍या सर्वच कलाकारांचा हा गौरव आहे.
त्या सगळ्यांचेही हार्दिक अभिनंदन!

नरेंद्र गोळे,

एकदम जबरदस्त! आपल्या आजून अनुदिन्या वाचल्या नाहीत. सवडीने वाचेन. मराठी प्रतिशब्दांबद्दलची आपली आस्था आणि कौशल्य वादातीत आहे. Happy लोकसत्तेतला लेख वाचून आपल्या कार्याची थोडीफार कल्पना आली. आपल्यासारखे लेखक/वाचक हीच मायबोलीची खरी संपत्ती आहे.

आपल्या कार्यास साष्टांग दंडवत!

आ.न.,
-गा.पै.

Pages