Submitted by राजीव मासरूळकर on 26 August, 2012 - 00:18
@मायबोली@
काय सांगू काय आहे मायबोली
नेक दुसरी माय आहे मायबोली !
बंड किँवा चंड दोन्ही वासरांना
चाटणारी गाय आहे मायबोली!
मानवाच्या चिँतनाच्या पृष्ठभागी
राहणारी साय आहे मायबोली !
आतला आवाज सर्वांना कळावा
हा निरोगी न्याय आहे मायबोली !
नामदेवाचा, तुक्याचा, ज्ञानियाचा
वैभवी अध्याय आहे मायबोली !
- राजीव मासरूळकर
२६ऑगस्ट २०१२, सकाळी ६.४५ वाजता
संत तुकारामांचा (मायबोलीत रूढ असला तरीही) तुक्या असा उल्लेख केल्याबद्दल क्षमस्व !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीकरांनो , नमस्कार !
मायबोलीकरांनो ,
नमस्कार !
छान, तुक्या -- एवजी तुका
छान,
तुक्या -- एवजी तुका असे केले तरी चालेल. व ते योग्य ही दिसेल.
धन्यवाद सुधाकर जी ! पण मूळ
धन्यवाद सुधाकर जी !
पण मूळ शब्द तुक्याचा असा आहे . त्याचं तुकाचा असं रूप योग्य वाटेल काय ?
नामदेवा ज्ञानदेवा अन्
नामदेवा ज्ञानदेवा अन् तुकाचा
वैभवी अध्याय आहे मायबोली !
छानच वाटतं .
राजीव! गझल छान आहे!
राजीव! गझल छान आहे! वृत्तहाताळणी सफाईदार आहे.
शेवटचा शेर असा करावा वाटले......
नामदेवाचा, तुक्याचा, ज्ञानियाचा....
वैभवी अध्याय आहे मायबोली!
असे केल्याने उला मिस-यातला व्याकरणदोष निघून जावून शेर निर्दोष होतो आहे.
सुचवलेला बदल कसा वाटतो कळवावे.
........प्रा.सतीश देवपूरकर
एक मस्त विषय छान
एक मस्त विषय छान हाताळलात!!
गझलेवरची तुमची पकड आजवरच्या रचनातून दिसून आलीच आहे. मला आवडली........इम्प्रेस्ड!!
मक्त्यात बदल करायची अगदीच आवश्यकता नाहीये असे नाही पण आहेच असेही नाही......(वैयक्तिक मत)
अगदीच बदल करावा वाटत असेल तर असाही करू शकता............
नामयाचा ज्ञानियाचा अन् तुक्याचा
आज आपण मित्राला हाक मारताना वैभ्या, सुध्या, राज्या, सत्या.....(माफ करा उदाहरण म्हणून तुमची नावे वापरलीत!!कृ गै न)..अशी हाक मारतो त्याचीच नामया, तुकया, ज्ञानिया, एकया ,चोखया, ही रूपे असावीत पूर्वीच्या काळी.
अशाने कसे सगळे एकाच लायनीत(समान पातळी)बसल्यासारखे वाटतात नै !!
नामयाचा ज्ञानियाचा अन् तुक्याचा .........
असो.
.२)मक्त्यात अनायासे माझेही नाव आले आहे ......."वैभवी" अध्याय आहे मायबोली
]
दोनदा धन्यवाद !!! [१)माझे अगाध ज्ञान पाजळायची सन्धी मिळाली
मनापासून धन्यवाद प्रा . सतीश
मनापासून धन्यवाद प्रा . सतीश देवपूरकर सर आणि वैभव कुलकर्णी सर .
आपणा दोघांनीही सुचवलेले पर्यायी शेर आवडले . वैवकु सरांची , शेर न बदलण्याविषयक सूचनाही आवडली .
"नामदेवाचा, तुक्याचा, ज्ञानियाचा....
वैभवी अध्याय आहे मायबोली!"
हा पर्याय भरीचा अन् वगळण्याच्या दृष्टीने योग्य आहे , तंतोतंत वृत्त पाळणारा म्हणून उत्कृष्ठ वाटला .
"नामयाचा ज्ञानियाचा अन् तुक्याचा
'वैभवी' अध्याय आहे मायबोली !"
या वैवकु सरांच्या पर्यायी शेरात भरीचा अन् असला तरी नामया तुक्या आणि ज्ञानिया हे तिनही अस्सल मायबोलीतले संबोधनं आल्यानं मायबोलीसाठी आवश्यक वाटत आहे .
आता पुन्हा माझ्यासमोर निवडीचा प्रश्न आहेच .
असो .
वैभव सर ,
आपलं नाव मायबोलीवर आल्यापासून डोळ्यासमोर असल्यामुळेच मला वैभवी हे विशेषण पटकन सुचलं की काय असं आता मलाही वाटायला लागलं आहे .
बहुमूल्य प्रतिसादासाठी दोघांचेही आभार !
गझल छानच
गझल छानच
प्रा . देवपूरकरांनी सुचवलेला
प्रा . देवपूरकरांनी सुचवलेला बदल स्विकारून गझल संपादित करीत आहे .
धन्यवाद अरविंद चौधरी सर .
धन्यवाद अरविंद चौधरी सर .
मनापासून धन्यवाद प्रा . सतीश
मनापासून धन्यवाद प्रा . सतीश देवपूरकर सर आणि वैभव कुलकर्णी सर .
आपणा दोघांनीही सुचवलेले पर्यायी शेर आवडले . वैवकु सरांची , शेर न बदलण्याविषयक सूचनाही आवडली .
वैभ्या सर कधी झाला?
बंडल लेखनावर शंभर प्रतिसाद अशी हाय फाय आहे मायबोली. ३७३९० हा धागा स्वप्नरंजन आहे असे इतिहासात कोरले जाईल आणि मासरूळकर सुधाकर देवपूरकर हे तीन कर आणि कुलकर्ण्या यांचे पुतळे दाखवून आया आपल्या लहानग्यांना म्हणतील 'दोन्त क्लाय बेबी अदलवाईज फेटल फोर विल कम'
वा मोहिनी "म्याडम" , अगदी
वा मोहिनी "म्याडम" ,
अगदी जळजळीत वक्तव्य !
तुमचं लेखन वाचावं लागणार आता . काय लिहिता हो तुम्ही ?
तुमची प्रतिक्रीया वाचून एकदम 'अरे ओ सांबा ' म्हणणाऱा शोलेतला गब्बरसिँग आठवला .
राजीवजी.. 'तुक्या' खटकलं
राजीवजी..
'तुक्या' खटकलं नाही. अनेक ठिकाणी असं वाचल्यासारखं वाटतं.
फार छान रचना!
वेलकम टू द क्लब !!
धन्यवाद पराडकर सर . आपली
धन्यवाद पराडकर सर .
आपली प्रतिक्रीया नेहमीच उर्जा देते !
आपलं मार्गदर्शन इथेही मिळत रहावं हीच अपेक्षा .
मराठी दिनाच्या सर्वांना
मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !
मराठी दिनाच्या सर्वांना
मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !>>>>धन्यवाद मासरूळकर
तुम्हालाही शुभेच्छा!!
आज २७ तारखेला हा दिवस असतो हे माहीत नव्हते सांगीतलेत त्याबद्दल धन्स
नवाच एक कुणीतरी, उपरोध कळाला.
नवाच एक कुणीतरी,

उपरोध कळाला.
नवाच एक कुणीतरी, उपरोध कळाला.
नवाच एक कुणीतरी,

उपरोध कळाला.