कळले मला न काही....

Submitted by deepak_pawar on 25 August, 2012 - 00:20

कळले मला न काही हा रुसवा कशास सजणी
डोळ्यात दाटले का हे आता तुझ्या ग पाणी

कसला म्हणू अबोला तू गुमसुम कशास असशी
सांगून टाक आता जे सलते मनात राणी

येता धुके असे हे बघ दाटून प्राक्तनाचे
जवळी असून सारे ते अपुले असे न कोणी

ही रात चांदण्याची बघ भिजली दवात सारी
या चांदण्या क्षणात कुणी गाते उदास गाणी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गाणे होऊ शकेल याचे. देवांना हाक मारा कोणीतरी
>>>
कवीलाच जावं लागेल देवांच्या विपूत Happy

अहो हसताय काय Sad
खरचं म्हणतेय मी
दीपकजी याचं मस्त गाणं होऊ शकत
इच्छा असल्यास देवकाकांना विपू कराल का प्लिज?