यंदा .....(काही शेर)

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 August, 2012 - 23:55

पावसाने साधली ही गोम यंदा
आठवांचे आवरेना स्तोम यंदा

जीवनाची राख-रांगोळी करुया...
भावनांचा पेटलाहे होम यंदा

पीक-पाण्याची हवी चिंता कशाला
आसवांचा वाढलाहे जोम यंदा

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवांचे आवरेना स्तोम यंदा<<< व्वा

दुसरी ओळ मस्तच आहे.

जीवनाची राख-रांगोळी करुया...
भावनांचा पेटलाहे होम यंदा

पीक-पाण्याची हवी चिंता कशाला
आसवांचा वाढलाहे जोम यंदा<<<

खयाल छानच आहेत. (वाढलाहे, पेटलाहे अशी रुपे आधी एकांनी 'सुरेश भट या साईटवर - योजिल्याचे स्मरत आहे)

शुभेच्छा

धन्स बेफीजी,

<<<<वाढलाहे, पेटलाहे अशी रुपे आधी एकांनी 'सुरेश भट या साईटवर - योजिल्याचे स्मरत आहे)>>>>

असेलही ! मी मात्र मात्रांसाठी तडजोड केलीय इथे.

थोडस्स नियमात बसवण्यासाठी बरीचश्शी तडजोड Happy

-सुप्रिया.