Submitted by सतीश देवपूरकर on 24 August, 2012 - 06:16
गझल
चाखली नाही सुखाची खाप मी!
भोगली दु:खेच वारेमाप मी!!
केवढे षड्यंत्र! कावा केवढा!
टाळला गेलो किती चुपचाप मी!!
कैकदा पडतो, कधी ठेचाळतो;
चालतो स्वप्नामधे अद्याप मी!
उंबरा प्रत्येक का हेटाळतो?
वाटतो आहे कुणाची छाप मी?
या जगाला ओळखू आलो न मी!
शाप आहे, की असे उ:शाप मी!!
चालली माझीच चर्चा भोवती;
दशदिशांना गुंजणारी टाप मी!
लागली चाहूल मृत्यूची जशी;
घेतले अखडून माझे व्याप मी!
संकटेही थांबली वाटेमधे......
पाहिले त्यांनी किती निष्पाप मी!
ऎन माध्यान्ही ढळाया लागलो.....
काय झालेलो जगाला ताप मी?
आडवी आली अहिंसा नेमकी;
बंदुकीचा ओढला ना चाप मी!
बांधली तिरडी, जणू मेलोच मी!
मारली होती जगाला थाप मी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
कैकदा पडतो, कधी
कैकदा पडतो, कधी ठेचाळतो;
चालतो स्वप्नामधे अद्याप मी!
उंबरा प्रत्येक का हेटाळतो?
वाटतो आहे कुणाची छाप मी?
संकटेही थांबली वाटेमधे......
पाहिले त्यांनी किती निष्पाप मी!
>>>
शेर आवडले
(पडतो, ठेचाळतो या काँबिनेशनऐवजी एखादे दुसरे हवे होते असे उगीच वाटले)
अनेक शेर उमदे झाले आहेत गझल
अनेक शेर उमदे झाले आहेत
गझल आवडली
मस्त गझल !
मस्त गझल !
सुंदर गझल. केवढे षड्यंत्र!
सुंदर गझल.
केवढे षड्यंत्र! कावा केवढा!
टाळला गेलो किती चुपचाप मी!! ..... अफलातून शेर
कैकदा पडतो, कधी
कैकदा पडतो, कधी ठेचाळतो;
चालतो स्वप्नामधे अद्याप मी!
उंबरा प्रत्येक का हेटाळतो?
वाटतो आहे कुणाची छाप मी? <<< सुंदर शेर >>>