मायबोली परिवारात संगणक व अनुषंगिक क्षेत्रात देश विदेशात काम करणारी अनेक मंडळी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याकरता मी माहिती देण्याचे आवाहन करीत आहे.
आमच्या जवळचा नात्यातील मुलगी गेल्यावर्षी बी ई -आय टी पास झालेली आहे व ती पुण्यातच एका चांगल्या सॉफ्ट्वेअर्/आय टी कंपनीत जॉब करीत आहे. अलिकडच्या काळात कॉम्प्युटर इंजि./सायन्स, आय टी क्षेत्रात पुष्कळ मनुष्य बळ कंपन्याना उपलब्ध झाल्याने साहजिकच ५-७ वर्षापूर्वी इतके पगार या क्षेत्रात उपलब्ध नाहीत हीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अधिकचे शिक्षण अथवा कोर्सेस घेणे आवश्यक आहे अथवा स्पेशलाय्झेशन करणे आवश्यक वाटते.
तिला बी ई ला ६५+ % मार्क्स असून जी आर ई स्कोअर १३०० व टोफेल स्कोअर १०९ आहे. या पार्शवभूमीवर पीजी साठी परदेशात जाण्याचाही ऑप्शन आहे.किंवा मॅनेजमेन्ट कोर्सेसचाही लोकल ऑप्शन डोळ्यासमोर आहे पण तशा दर्जेदार संस्था दिसत नाहीत. आय आय एम पर्यन्त झेप जाईल असे वाटत नाही.
इथल्या मित्रमंडळीना या क्षेत्रातला फर्स्ट हॅन्ड अनुभव व चालू स्थितीचे व येच्या ५-१० वर्षांचे व्हिजन असल्याने कृपया आपाले अनुभव/ मते/सल्ले मांडावीत ही विनन्ती....
माझा प्रांत नसल्याने
माझा प्रांत नसल्याने पास.
परंतु माझीही पुतणी याच परिस्थितीत असल्याने मी हा धागा वाचणार/फॉलो करणार आहे.
>>या पार्शवभूमीवर पीजी साठी
>>या पार्शवभूमीवर पीजी साठी परदेशात जाण्याचाही ऑप्शन आहे <<
हा ऑप्शन व्हाएबल असेल तर जरुर निवडावा. अजुन पर्यंत तरी चांगले, स्टेबल करीअर करण्याचा हा राजमार्ग आहे. भारतातल्या IT सेक्टरचं भविष्य काहि खरं नाहि.
Career is a very vague term.
Career is a very vague term. नक्की काय करायचे आहे तिला?
अपेक्षा काय आहेत? पगारवाढ? आवडीचे काम? दोन्ही?
थोडे जरा विस्तृत लिहाल का. खरं तर तिने लिहावे. म्हणजे अधिक सांगता येईल.
रैना + १. ती पुण्यातच एका
रैना + १.
ती पुण्यातच एका चांगल्या सॉफ्ट्वेअर्/आय टी कंपनीत जॉब करीत आहे.
अलिकडच्या काळात कॉम्प्युटर इंजि./सायन्स, आय टी क्षेत्रात पुष्कळ मनुष्य बळ कंपन्याना उपलब्ध झाल्याने साहजिकच ५-७ वर्षापूर्वी इतके पगार या क्षेत्रात उपलब्ध नाहीत हीही वस्तुस्थिती आहे >>
जॉब / करीअर बदलण्यामागे उद्देश नक्की काय आहे? या वाक्यावरून वाटतेय की जास्त पगाराची अपेक्षा आहे. पण कोणत्या प्रकारचे काम करण्याची इच्छा /आवड आहे ते लिहिले नाहीये.
सॉफ्ट्वेअर मधेही चांगल्या / वेगळ्या सॉफ्टवेअर प्रणालीत चांगला अनुभव असल्यास खूप पैसे , परदेश संधी असतात.
आयटी मधे कोर्स पेक्षा
आयटी मधे कोर्स पेक्षा अनुभवाला नेहमीच महत्व दिले गेले आहे. ती जर चांगल्या कंपनीत नोकरी करत असेल तर तिच्या आवडत्या क्षेत्रात/विषयात जास्त अनुभव कसा मिळवता येईल ते पहावे.
पीजी साठी परदेशात जाण्याऐवजी, कंपनीतर्फे कामानिमित्त परदेशात जाता येते का ते पहावे. ते केंव्हाही चांगलेच. एकदा परदेशात आल्यावर (किंवा जाऊन परत आल्यावर) आपल्याला नक्की काय करायचे आहे ते जास्त चांगले कळते.
परदेशात आयटी क्षेत्रात नोकरी करतानाही शिक्षणापेक्षाही अनुभव जास्त महत्वाचा समजला जातो. उदा एकीला भारतातली डिग्री + ३ वर्षाचा अनुभव आणि दुसरीला अमेरिकेतली पीजी डिग्री+ १ वर्षाचा अनुभव असेल तर ३ वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला जास्त प्राधान्य मिळेल. हे फक्त आयटी क्षेत्रात आहे , इतर क्षेत्रात नाही. टेक्नीकल पोस्ट ग्रॅज्युएशनमुळे किंवा नवी कोर्स केला म्ह्णून पगारात जास्त वाढ मिळाली असे मी कधीही ऐकले नाही, पण योग्य त्या क्षेत्रात अनुभव मिळाल्यावर पगारात ३ पट वाढ झाली( नोकरी बदलून ) हे पाहिले आहे,
मात्र सुरुवातीला(पहिले २-३ वर्षे) भारतातला अनुभव विचारात घेत नाही.
उदा: (भारतात ४ वर्षे अनुभव+ परदेशात १ वर्षे अनुभव =एकूण १ वर्षे ) हे (भारतात ० वर्षे अनुभव + परदेशात १ वर्षे अनुभव =एकूण १ वर्षे ) बरोबर धरतात. पण नंतर (भारतात ४ वर्षे अनुभव+ परदेशात ४ वर्षे अनुभव = एकूण ८ वर्षे) याला (भारतात ० वर्षे अनुभव + परदेशात ४ वर्षे अनुभव =एकूण ४ वर्षे) यापेक्षा नक्कीच प्राधान्य मिळेल.
हे सगळे तांत्रिक शिक्षण, कोर्सेस याबद्दल आहे. मॅनेजमेंट शिक्षणाबद्दल नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रानो,
केवळ पगारवाढ असे नाही पण स्टेबल करीअर एवढीच अपेक्षा आहे. केवळ बीई डिग्रीवर चालेल भविष्यात असे वाटत नाही. काहीतरी अॅडिशन करावी लागेल असे वाटले. शिवाय नवीन येणार्या मुलांची स्पर्धा ही वाढेलच.
पीजी करून पुन्हा भारतात येऊन स्टेबल जॉब मिळण्याची अपेक्षा आहे. यू एस मधून पीजी केल्यास त्याचे इथे जॉबच्या दृष्टीब्ने काय स्थान आहे? वर दिलेल्या स्कोअरच्या आधारे तिकडे चांगल्या युनि. मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता कितपत आहे? मॅनेजमेन्टचा ओप्शन ट्राय करावा का असाही एक संभ्रम आहे.व्यवस्थापनात मुम्बईच्या वेलिंगकर इंस्टिटूटचे नाव रेकमेन्ड केले आहे काहीनी.
आयटी विषयी फारशी माहीती नाही
आयटी विषयी फारशी माहीती नाही पण वर अजय ने आयटी विषयी सांगितल्याप्रमाणेच इतर टेक्निकल क्षेत्रातही अनुभवाला बर्यापैकी महत्व दिलं जात .
गेल्या वर्षीच पास होऊन आत्ताच
गेल्या वर्षीच पास होऊन आत्ताच तर नोकरीला लागली आहे ना? इतक्यातच करीअर स्टेबल असेल/ नसेल हे कसे काय समजले? पीजी करुनही करीअर स्टेबल असेलच हे ठामपणे सांगता येणार नाही. खास करुन आयटी ह्या क्षेत्रात. धाडकन रिसेशन येते आणि १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले लोकही नोकरी गमावून बसल्याची उदाहरणे सद्ध्याच पाहिली आहेत. अर्थात, पीजी हे एक अॅडेड क्वालिफिकेशन आहे, हे नक्की.
आयटी कंपनीत नक्की कशाप्रकारचे काम करत आहे? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट/ टेस्टींग/ सपोर्ट/ अजून काही? नक्की काय क्षेत्र आहे ह्यावरही थोडीफार स्टॅबिलिटी अवलंबून असते.
काही कंपन्यांमध्ये साधारण दीड वर्ष एका प्रोसेसमध्ये काम केले की दुसर्या प्रोसेसमध्ये ट्रान्स्फर घेता येते, अनुभव मिळवण्यासाठी, करीअर घडवण्यासाठी हे उत्तम आहे. थोडी वर्षे इन्वेस्ट करावी लागतात मात्र. माझ्या मते करीअरसाठी धडाधड नोकर्या बदलू नयेत. बरेच आयटीवाले असे करतात. इंटरव्ह्यूमध्ये असे का केले, हा प्रश्न नक्की उद्भवेल. बाकी अजयने लिहिले आहे, त्याला अनुमोदन. रैनाने लिहिले आहे त्याप्रमाणे, तिला नक्की काय करायचे आहे हे स्वतःला कळणे आवश्यक आहे.
मॅनेजमेंट ऑप्शन जरुर पहावे. त्याचा फायदा होतो हे स्वानुभवावरुन सांगत आहे. अर्थात, अनुभव तितकाच महत्वाचा.
खास करुन आयटी ह्या क्षेत्रात.
खास करुन आयटी ह्या क्षेत्रात. धाडकन रिसेशन येते आणि १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले लोकही नोकरी गमावून बसल्याची उदाहरणे सद्ध्याच पाहिली आहेत
..>>
एक्झॅक्टली शैलजा.
म्हणूनच तर काही डायवर्सिफिकेशन करता येते का ते आजमावयाचे आहे. टेक्निकल मधून मॅनेजमेन्टमध्ये जाऊन स्टॅबिलिटी असू शकते का? बी ई + एम्बीए हे आय टी व्यतिरिक्त चालू शकेल का?
आय टी मध्ये स्वयंरोजगाराला कितपत चान्सेस आहेत?
>>? बी ई + एम्बीए हे आय टी
>>? बी ई + एम्बीए हे आय टी व्यतिरिक्त चालू शकेल का? >> जरुर चालू शकेल रॉहू.
>>आय टी मध्ये स्वयंरोजगाराला कितपत चान्सेस आहेत? >> स्वयंरोजगाराला कुठेच मरण नाही पण सहा महिन्यांत मि. मूर्ती बनता येणे कठीण हेही लक्षात असूदेत प्रचंड कष्ट करण्याची तयारी असेल, लोक जोडता येणे जमत असेल, नवीन प्रयोग करुन पाहण्याची इच्छा आणि क्वचित येणारे अपयश पचवून पुढे जाण्याची धमक असेल, तर हा मार्ग जरुर चोखाळावा. ह्यासाठी मनापासून शुभेच्छा!
बी ई + एमबीए हे आयटी
बी ई + एमबीए हे आयटी व्यतिरिक्त बाकीच्या ठिकाणीच जास्त चालेल... आयटी मध्ये फार काही फरक पडत नाही... एमबीए फारच उच्च कॉलेज मधून असेल तरच फरक पडेल...
उपयुक्त धागा, वाचणार आहे.
उपयुक्त धागा, वाचणार आहे. धन्यवाद सर्वांचे त्यांच्या त्यांच्या कंट्रिब्यूशनसाठी
एमबीए फारच उच्च कॉलेज मधून
एमबीए फारच उच्च कॉलेज मधून असेल तरच फरक पडेल...
>>
हिम्स, म्हणजे साधारण कोणती कॉलेजेस.? पुण्यातल्या एम्बीए कॉलेजेस मध्ये काही दम वाटत नाही. केवळ दुकानदारी आहे. खेड्यापाड्यातल्या बिझि मॅनेज कॉलेजेस म्हणजे बालवाड्याच. आय आय एम आवाक्यातले नाही.
भारतातली पहिली २० कॉलेजेस...
भारतातली पहिली २० कॉलेजेस... ज्यात आय आय एम, आय आय टी, निटी, एक्सएलआरआय, एम डी आय गुडगाव, मुंबईतील एस पी जैन, जमनालान बजाज, आयएसबी हैद्राबाद ही कॉलेजेस आणि इतर काही कॉलेजेस येतात.. पुण्यात सिंबॉयसिसला भाव आहे.... पुम्बा(pumba) पण चांगले आहे.. त्यांचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाचा नसून स्वत:चा आहे आणि त्यात जास्तीत जास्त नवीन गोष्टी अंतर्भूत करायचा प्रयत्न केलेला आहे.
बीई + एमबीए करुन आयटी कंपनीत पूर्ण टेक्निकल काम करायचे असेल तर एमबीए न करताही ते करता येते आणि एमबीए करण्यासाठी २ वर्ष देण्यापेक्षा तेव्हढ्या वेळातला अनुभव पुढे जास्त उपयोगी होतो.. कारण आयटीत बहुतेक वेळेस अनुभव महत्त्वाचा धरतात.. अर्थात एमबीए केल्यानंतर मिळणारा वेगळा दृष्टीकोन हा प्ल्स पॉईंट आहेच... आणि त्यामुळे काम करण्याच्या पद्धतीत फरक पडतो.. पण तो वेगळा दृष्टीकोन मिळण्यासाठी तसे कॉलेज असणे फार महत्त्वाचे..
आणि आयआयएम आवाक्यातले नाही
आणि आयआयएम आवाक्यातले नाही असे काही नसते.. बिनधास्त परिक्षा देऊन धडक मारायची..
आय टी त खरच अनुभव जास्त
आय टी त खरच अनुभव जास्त महत्त्वाचा ठरतो..
माझा कस्दे आज फक्त B.sc(Comp Sci) डिग्री आहे..
तरिही मी इथे चांगल्या प्रकारे सेट झालेय..
बी ई + एमबीए हे आयटी
बी ई + एमबीए हे आयटी व्यतिरिक्त बाकीच्या ठिकाणीच जास्त चालेल... आयटी मध्ये फार काही फरक पडत नाही... एमबीए फारच उच्च कॉलेज मधून असेल तरच फरक पडेल... >> +१
एमबीए करायचेच आहे (कुठूनही) तर परत आयटी मध्ये टेक्निकल स्ट्रीममध्ये येण्यात फारसा काही अर्थ नाही. एमबीए केल्यावर बाकीचे बरेच चांगले पर्याय आहेत.
शैलजा, रैना यांची पुढील
शैलजा, रैना यांची पुढील वाक्ये अतिशय विचार करण्यासारखी....
१.गेल्या वर्षीच पास होऊन आत्ताच तर नोकरीला लागली आहे ना? इतक्यातच करीअर स्टेबल असेल/ नसेल हे कसे काय समजले?
२.Career is a very vague term. नक्की काय करायचे आहे तिला?
अपेक्षा काय आहेत? पगारवाढ? आवडीचे काम? दोन्ही?
या मुलीने जे क्षेत्र निवडले आहे त्यात "बदल" हा एक अपरिहार्य घटक आहे. आपला "स्किल सेट" धारदार करणे अतिशय महत्वाचे आहे. मला भारतातील कल्पना नाही पण अमेरिकेत तरी (माझ्या अनुभवात) तुम्हाला ज्ञान किती आहे तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कसे काम करता यावर नोकरी मिळते/टिकते/पदोन्नती होते. तुमची कुठली डिग्री आहे, तुम्हाला किती टक्के मार्क मिळाले याला नंतर काहीही महत्व नाही. अर्थात एम एस किंवा एम बी ए डिग्री असेल तर ते चांगलेच पण ते तुम्हाला इंटरव्यु मिळवुन देण्यापर्यंत उपयोगी पडु शकते पण त्यानंतर मात्र तुम्ही किती चांगली मुलाखत देता त्यावर अवलंबुन आहे.
मला तरी वाटते तिने आता जी नोकरी आहे त्यात जास्तीत जास्त चांगला अनुभव मिळवायच्या मागे लागावे.
पोस्ट ग्रॅड साठी एम एस, एम बी ए पार्ट टाईम, किंवा एक्झीक्युटीव (कंपनी स्पॉन्सर्ड करु शकते) हेही पर्याय आहेत. काही प्रोफेशनल सर्टिफिकेशन्स सुद्धा असतात CSQA, CSTE, PMP तीही मदत करु शकतात. पण शेवटी मुद्दा हाच आहे कि तुमच्याकडे कितीही सर्टिफिकेशन्स डिग्रीज इ. असले तरी शेवटी तुम्ही किती "स्किल्ड" आहात यावरच सगळे अवलंबुन असते.
प्रोफेशनल सर्टिफिकेशनबद्दल
प्रोफेशनल सर्टिफिकेशनबद्दल लिहायचे राहिले होते.
चांगला धागा.
चांगला धागा.