घेवूनी येता चपाती बाजारातुनी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 August, 2012 - 03:51

तुझेची नाव ओठी

तुझेची नाव पोटी

घेवूनी येता चपाती

बाजारातुनी

तुझ्या हातची भाकरी

तुझ्या हातची फोडणी

जीभेही येते गहिवरूनी

माझ्यासवे

भांडी ती सैपाकघरातली

गमती मज हिरमुसली

तुझ्याविना विरक्त झाली

धूळ पांघरून

तो फ्रीज आतून रोडावला

माइक्रो बसून सुस्तावला

मिक्सर तर झोपला

केव्हापासून

ये तू ये लवकरी

कृपा कर माझ्यावरी

डाळभात भाजीभाकरी

देई प्रसाद

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा ,
अप्रतिम, आशयगर्भ आणि खाणे या जीवनाच्या महत्त्वाच्या अंगावर भाष्य करणारी कविता .
भन्नाट!

' कवितेसाठी कविता' असं आ णि इतकं सार्थक नाव अशा प्रकारच्या कवितांच्या ब्लॉगला शोभून दिसतंय.

तुझेची नाव ओठी
तुझेची नाव पोटी
घेवूनी येता चपाती
बाजारातुनी

तुझ्या हातची भाकरी
तुझ्या हातची फोडणी
जीभेही येते गहिवरूनी
माझ्यासवे

भांडी ती सैपाकघरातली
गमती मज हिरमुसली
तुझ्याविना विरक्त झाली
धूळ पांघरून

तो फ्रीज आतून रोडावला
माइक्रो बसून सुस्तावला
मिक्सर तर झोपला
केव्हापासून

ये तू ये लवकरी
कृपा कर माझ्यावरी
डाळभात भाजीभाकरी
देई प्रसाद

छान