सहाण ला पर्याय

Submitted by कपीला on 21 August, 2012 - 11:48

बालाला बदाम खरीक देन्यासठि सहाणी ला पर्याय काय? सहाण किति पन स्वच्छ धुतली आनि वालवली तरी काली पडत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादा पांढरा संगमरवराचा तूकडा वापरता येईल.
सहाणेसाठी वापरायचा दगड अगदी गुळगुळीत असून चालत नाही, नाहीतर त्यावर काहीच उगाळले जात नाही.
संगमरवराची सहाणही मिळते.

माझ्याकडेही गेली १२ वर्षे मी सहाण वापरतेय पण काळी कधीच पडली नाही. असो तुम्ही आधी त्यावर काहीतरी हळकुंड किंवा खारीक उगाळुन, सहाण धुवुन मग बदाम उगाळा कदाचित त्याने काही फायदा होईल.

बाजारात स्टेनलेस स्टीलच्या अगदी बारीक होल्स असलेल्या किसण्या / खिसण्या मिळतात त्या वापरून बघा सहाणे ऐवजी....

शशांक, तान्ह्या बाळाला द्यायला बदाम उगाळूनच द्यावा लागतो. त्या किसणीवर जायफळ वगैरेची पूड होते, पण बाळाला चालणार नाही.

माझ्या कडे भाजी कापायचा कटर आहे तो मी कधी कधी सहाण म्हणुन वापरते त्याचे दोन्ही साईड खरबरीत असल्याने बदाम काजु जायफळ उअगळुन होते

माझ्या कडे भाजी कापायचा कटर आहे तो मी कधी कधी सहाण म्हणुन वापरते त्याचे दोन्ही साईड खरबरीत असल्याने बदाम काजु जायफळ उअगळुन होते >>>> भारी आयडिया - मात्र हे बदाम काजु जायफळ उगाळायच्या आधी त्या कटरला इतर कुठल्या भाजीचा विशेषतः मिरचीचा किंचितही स्वाद उरला नाही ना हे काळजीपूर्वक पहाणे अतिशय आवश्यक...

लाल सहान मागावते भारतातून. तोपर्यनता पांढरा संगमरवर दगड वापरून पहाते- सगल्यांच्या सुचानान्साठी धन्यवाद. त्यामुले माझा पण डोकं चालायला लागतं!