शब्दांवाचून

Submitted by सागर कोकणे on 21 August, 2012 - 10:27

एक एक कविता माझी विकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

या जगण्याला कधी लाभला शब्दांचा आधार ?
शब्द असे भिनतात अंगी की जणू जडे आजार

व्याधी नसते साधी ही जी आपसूक जडलेली
कधी उपाशी शब्दाविन ती मूकपणे अडलेली

तरी रंगुनी शब्दमहाला नवे मांडले काही
कसे नकळता नयनातून या शब्द सांडले काही

भौतिकतेच्या या जगती हे काव्य कशाला पुरे
मी गेल्यावर शब्दाखेरीज काय तळाशी उरे ?

अता न भुलन्याचा शब्दांना केला मी निर्धार
वैद्य म्हणे हा रोग असे अन हाच असे उपचार

पोकळ साऱ्या बाता तरीही टिकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

-काव्य सागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता अतिशय छान आहे. आवडली.

अता न भुलन्याचा शब्दांना केला मी निर्धार ------ इथे लय संपुर्ण कवितेत आहे त्यापेक्षा थोडी वेगळी भासते.

................त्या पेक्षा...........

शब्दांना मी न भुलन्याचा केला अता निर्धार ...... असे केले तर छान होईल.

सुधाकर
शब्दामहाला आणि शब्दमहाली याबद्दल द्विधा मनस्थिती होती. मला जे पसंत पडले ते लिहिले.

दुसरा बदल सुचवल्याबद्दल आभार. पण मला लय बिघडत आहे असे वाटत नाहीये.

उलट तुम्ही सुचवलेल्या ओळीत खास करून 'केला आता निर्धार' या जागी ती लय बिघडल्या सारखी वाटली.
कदाचित आपण दोघे वेगवेगळ्या लयीत म्हणत असू Happy

ह्म्म तसही असेल कदाचित. पण लय बिघडली असे मी म्हणत नाही. आहे त्या ओळीमध्ये भुलन्याचा--- या शब्दाशेवटी थोडासा जोर द्यावा लागतो. इतकेच. तसही छानच आहे.