चिंब भिजलेले, रूप सजलेले...

Submitted by इंद्रधनुष्य on 21 August, 2012 - 02:30

UNESCO कडून पश्विम घाटाला 'जागतीक वारसा'चा दर्जा मिळाल्या नंतर ट्रेकर्स मंडळी मधे आनंदी, उत्साही वातावरण पसरले होते. त्यातच ऑगस्ट मधे १८ ते २० अशी तीन दिवसांची सुवर्णसंधी जोडून आली खरी.... पण प्रत्येकाने आपली वैयक्तीक व्यवधाने सांभाळून केवळ रविवारचा सुमुहुर्त अहुपे घाटा करता निवडला.

यंदा पावसाची निराशाजनक कामगिरी पहाता पावसाळी ट्रेकची मनिषा अपुर्णच रहाणार की काय अशी भीती वाटू लागली. पण अहुपेला पोहचवल्यावर मात्र सगळी निराशा दूर झाली. सह्याद्रीच्या हिरव्या रांगानी शुभ्र फेसाळत्या ओढ्यांची पायघडी आमच्यासाठी अंथरली होती. धुक्याची चादर पांघरून घाट माथा आमच्या चढाईची फजिती बघत शांत पहुडला होता. त्यातच या अनघड वाटेवर गनिमाच्या तिरांनी संततधार सुरू करुन आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सोबतीला वानरांची हुपहुप, नाचण पक्षाची शीळ, खळाळत वाहणार्‍या धबधब्यांची गाज.. अहाहा... अजून काय हवं या निसर्गा कडून...

चिंब भिजलेले, रुप सजलेले... होय... हेच ते सजलेले रुप पहाण्याच्या अट्टाहासा पायी इथवर आलो होतो... आणि आपल्या लाडक्या सह्याद्रीने आम्हाला पुन्हा एकदा मोहवून टाकलं ते आपल्या अदाकारीनं, रांगडेपणानं, मायेनं... Happy

प्रचि १ भातशेती

प्रचि २ अहुपे घाट

प्रचि ३ अहुपेचा कोकणकडा

प्रचि ४ सह्यकडे... टोकाला दिसणारा तिरंगी घाट

प्रचि ५ डावीकडचा गोरखगड आणि उजविकडचा मश्चिंद्रगड

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८ उडीपुरकर्स...

प्रचि ९ दरीचा धबधबा

प्रचि १० धुक्यात हरवलेला दरीचा धबधबा

प्रचि ११ F1

प्रचि १२ धुकं विहार

प्रचि १३ सर्दावलेले सह्यकडे

प्रचि १४ Ctrl C + Ctrl V

प्रचि 15 अडथळा

प्रचि १६ निर्झर

प्रचि १७ मश्चिंद्रगड

प्रचि १८ गोरखगडची गुहा

प्रचि १९ पान्होळी

प्रचि २० हुप्पाहुय्या

प्रचि २१ खळखळ

प्रचि २२ अवखळ

प्रचि २३ टिंब भिजलेले...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे जबरी फोटु इंद्रा Happy

जल्ला फूल वृत्तांत टाकला असता तरी चालला असता.. >> अनुमोदन