नकोस माझी पुसू खुशाली कळीकळीला!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 August, 2012 - 03:26

गझल
नकोस माझी पुसू खुशाली कळीकळीला!
विचार माझा ठावठिकाणा पानगळीला!!

तेवतात जे लोक नेहमी दुनियेसाठी;
वादळ सुद्धा जपते त्यांच्या दीपकळीला!

तुझ्या भोव-यामधे बुडालो, भाग्यवान मी!
किती चेहरे, पण मी भुललो तुझ्या खळीला!!

रोज पाहतो आरशात मी कपाळ माझे;
भाग्य विचारत बसतो माझे वळीवळीला!

देवच गेला चोरीला त्या देवळातला.....
रया राहिली नाही आता प्रभावळीला!

तुला गोडवा जगण्यामधला कळला नाही;
पाहिलेस तू सुखदु:खांच्या फक्त मळीला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज पाहतो आरशात मी कपाळ माझे;
भाग्य विचारत बसतो माझे वळीवळीला!

छानय हा शेर
एक हटके काफिया अन् त्याचा योग्य वापर मस्त जमून गेलाय