ट्रेक - सुधागड

Submitted by मुरारी on 18 August, 2012 - 09:11

अरे तुम्हाला साडेसात सांगितलेले ना.. अजून तू कल्याण लाच आहेस.. कधी घरी जाणार आणि निघणार?
माझ डोकच फिरलं होत. मी कसाबसा हापिसातून लवकर कट्लेलो होतो , आणि वेळेत तयार होतो, पण आमच मित्रमंडळ अजून घरीच पोचत होतं , पुण्याची टीम निघाली पण होती
खोपोलीत भेटायचं ठरलेल होतं . संध्याकाळी पनवेल किती प्याक असत हे अनुभवाने माहित होत .. आणि आम्हाला पालीला पोचायचं होतं , ८ इकडेच वाजले होते. कस काय होणार होतं ..
शेवटी दोघ मित्र एका बाईक वर. आणि मी एकटा माझ्या यमी (माझ्या यामाला मी लाडाने यमी म्हणतो Wink ) सोबत निघालो . रात्री जास्त पळवता पण येत नाही , कसे बसे ९.३० च्या दरम्यान पनवेल च्या पुढे आलो . टाईम टेबल बोम्बलेल होतं. खोपोली अजून ३८ किमी . पण रस्ता मस्त होता.. मजबूत रापत.. अर्ध्यातासात खोपोली टच. सूड अन्या आलेलेच होते . खोपोलीतच जेवलो.. तोपर्यंत ११ वाजून गेलेले होते.. खोपोली निपचित पडलेली होती.. अधून मधून पावसाची सर येत होती.. खोपोली - पाली रस्ता माहित नव्हता , एका पानवाल्याला विचारलं.. तो जरा हळू आवाजात बोलला .. जा राहे हो.. संभालके जाव.. रोड ठीक नही हे.. बर्र म्हटल.. थोड पुढे आलो. . परत एका हाटेलात एकाला विचारल.. त्याने तर बॉम्बच टाकला , म्हणाला.. नीट जा.. रस्त्यात थांबू नका अजिबात.. कोणीही आलं तरी.. हवतर उडवा सरळ.. कोण नाय पकडत तुम्हाला.. चायला म्हटल.. हि काय भानगड आहे.. असो जे काय होईल ते होईल.. ३ बाईक ५ जण निघालो
खोपोली मागे टाकल.. आणि सुमसान रस्ता सुरु झाला .. बेक्कार अंधार.. आणि रस्त्यावर एकही वाहन नही.. फक्त आमच्या ३ बाईक्स .. एकमेकांना कवर देत जात होतो.. रस्ता पण बेक्कार.. द्नही बाज्जूंना गर्द जंगल.. कोणी मधेच लुटलं तरी या कानाच त्या कानाला कळणार नही.. आता कळत होत कि ती माणसं का सूचना देत होती. बेक्कार गारठा होता . त्यात मी एकटा.. मागे बोलायला कोण नाहीं.. रस्ता अतिशय खराब . एका वळणावर.. खड्ड्कन काहीतरी माझ्या हेल्मेट मध्ये घुसलं.. एकदम बाईकचा कंट्रोलच गेला.. कशीबशी साईडला घेतली .. एक नाक्तोड्यापेक्षा मोठ्या आकाराचा काळा किडा आत घुसलेला होता.. नशीब मेल्याने चावलं नाहीं..... अजून जरा दुर्लक्ष झाल असत तर बाईक सकट रानात घुसलो असतो .. परत सावरून निघालो , मित्रमंडळ पुढे गेलेलं होत ..
कधीतरी एकदाचा तो भयंकर रोड संपला. आणि पालीत घुसलो .. बल्लाळेशवराच्या देवळापाशी आलो १ वाजून गेलेला होता.. आता पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता.. इथेच मुक्काम केलेला बरा.. भक्त निवासात जाग होती. तिथे विचारल.. सुदैवाने रूम मिळाली . मस्त अंग टेकवलं ..
सकाळी ५ ला उठलो.. आता उशीर करून चालणार नव्हत.. सर्वांना लाथा घालत उठवलं Wink पटापट अंघोळी उरकल्या ..बल्लाळेशवराच दर्शन घेतलं.. बाहेर चहा पोहे हादडले आणि निघालो...
ठाकूर वाडीत पोचलो , तेंव्हा तिथल्या छोटुश्या शाळेत लहानग्यांचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरु होता Happy
१.
२.
अशी घर मला जाम आवडतात

३.

सुधागडाच पहिलं दर्शन
४.

५.

६.

गड चढाइला एकदम सोप्पा आहे. मध्ये मध्ये थोडे रॉक प्याचेस आहेत
७.

८.

९.
१०.
गडावर एक मस्त तळ दिसल , तिकडेच जरा आराम केला. सोबतच्या न्याहारीवर ताव मारला आणि पुढे निघालो
११.

पाऊस इतका वेळ दाटून आलेला होता .. आम्ही पंतांच्या वाड्यात शिर्ल्यासोबत मजबूत पडायला लागला .. वेळेवर पोचलो म्हणायचो
हि त्या पडल्या वाड्यातली काही चित्रे
१२.
१३.
१४.
१५.
१६.

तिथून थोडे पुढे भोराई देवीच देऊळ आहे ते पाहायला निघालो
१७.

१८.

देवळाच्या आसपासचे काही अवशेष , सती शिळा आणि विरगळ
१९.
२०.
२१.
२२.
२३.
पाउस परत भरून आला. आणि निळसर धुक्यातल हे दृश्य पाहून भान हरपून गेलं

२४.

गडाच्या टोकावरून काही घेतलेली प्रचि.

२५.
२६.
२७.
२८.
२९.
तिथून परत दुसर्या टोकाला थोड खाली उतरलो.. दिंडी दरवाज्यापाशी आलो.. हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या दरवाज्याची हुबेहूब प्रतिकृती आहे आहे. पण हि वाट आता वापरात नसल्याने भयाण रान माजलेल होत.. वाट कुठून वर येतेय हेही कळत नव्हत

३०.

"याचसाठी केला होता अट्टाहास."..
गड सर झाला कि हीच भावना असते Happy
३१.

येताना भराभर खाली आलो. ४ वाजलेले होते , ४ .३० च्या आसपास निघालो.. फक्त पालीला एक चहाचा ब्रेक घेतला , तिथून जे सुसाट सुटलो
८० - ९० च्या स्पीड ने.. पनवेलात घुसलो. तेही अवघ्या दीड तासात .. तिथून एका तासात डोंबिवली ..
एकूण सुधागड करायला धमाल आली.. तरी बरंच पहायचं राहून गेल वेळे अभावी ,
पुढच्यावेळी रात्री मुक्कामालाच वर जाऊ .. म्हणजे फुरसतीत गड पाहता यील Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्णन आणि खल्लास फोटो....
सगळेच पॅनो फार क्लास...
४, १८, २४ विशेष उल्लेखनीय....
मस्त रे भाऊ...अजून येऊ देत ट्रेक्स

येस्स!! हा राहिला आहे...
धोंडश्यातून आणि पाच्छापूरहून असा दोन्ही दरवाजातून करायचा आहे..

फोटो छान.. वर्णन नंतर वाचतो..

प्रसन्न क्या बात है! तु केलेले ओघवते वर्णन, तु काढलेले फोटो सर्वच अप्रतिम आहे......त्या परिसरात फिरुन आल्याचा अनुभव मिळाला बघ , असेच ट्रेकींगचा आनंद लुट व इथे सर्वांबरोबर शेअर कर Happy

फोटू मस्त आणी वर्णन वाचनीय.... Happy
त्या सुधागडावर २/३वेळा आणी पालित अनेकदा कामानिमित्त गेलेलो आहे. त्यामुळे सर्व काही परिचयाचे आहे,तसेच काहि जुन्या अठवणी जाग्या जाहलेल्या आहेत. Wink
त्या वरच्या पाट्यावरवंट्या समान दगडावर (फोटू क्र-१३) मी अर्धा किलो तांबड्या मिरच्या खडे मिठा सह वाटल्या होत्या,आणी तो दगड धुतल्यानंतर थोडास्सा ओलसर असताना,त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला एक बाब्ब्या(पंचासह) बसलावता...आणी मग २ मिनिटानी तो जे बोंबलत उठला,तो दुपारी खाली गावातुन कुणितरी गोपिचंदन आणल्यावर जमिनिवर बसू शकला होता. Rofl

मस्त वर्णन आणि खल्लास फोटो.त्या परिसरात फिरुन आल्याचा अनुभव मिळाला बघ , असेच ट्रेकींगचा आनंद लुट व इथे सर्वांबरोबर शेअर कर

@आंद्या : तू अजून सुधागडला गेलेला नाही म्हणजे नवलच आहे Happy
@ shekharkul, व्हीनस, आत्मूस, श्रीमत , आशु आणि जागू : धन्स

मस्त वर्णन आणि फोटो.
आयुष्यातील पहिला ट्रेक सुधागड Happy खुप आठवणी आहेत या ट्रेकच्या. सगळ्या परत आठवल्या. Happy