गणित ..

Submitted by vrishali gotkhi... on 15 August, 2012 - 10:28

कधी वाट्ते .या जीवनाचे "गणित '
आपल्याला कधी कळलेच नाही की काय ?
आवडीच्या माणसांशी आपले "सूर "जुळलेच नाहीत की काय ?
"बेरीज "करायची होती नात्यांची .
"हातचा "घेतला होता स्नेहाचा ..
पण चुकतच गेली सदा ..न .कदा ..
'गुणाकार "करायचा होता प्रेमाचा
पण साथ नाही मिळाली गुणकाची ..
...मग उत्तरच नाही आले मनासारखे ..
"भागाकार " केला दुख्खाचा ..
पण कीती भागले तरी उत्तर "शून्य " ..नाहीच
"वजाबाकीने "..मात्र सदा साथ दिली
जीवनाच्या प्रवासात कीती माणसे "वजा " होत गेली ..
पत्ताच नाही लागला ..
असे हे "गणित " सदा चुकतच गेले ...
"सुटले " वाटता ..वाटता."अवघडच 'राहिले .!!

................................वृषाली **

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान