गुढ

Submitted by vedangandhaa on 14 August, 2012 - 02:23

दिवसेंदिवस वाढतेय
खर्‍या खोट्या
प्रश्नचिन्हांची जटिलता...
आयुष्याचे झालेले वाळवंट....
अन सुखाचा झालेला अंत.
सत्याला लागलेले ग्रहण
दुष्टांचा विजय..
अन सतीचा आकांत.
दु:खाची दि़क्षा
विस्कटलेले जीवन
विश्वासाने केलेला घात............
अन सीतेची अग्नीपरीक्षा....
करूणाघणही झाला पाषाण
डोळ्यातले आटलेले झरे
धर्मियांनीच अधमपणे
असत्याचे धरलेले
उंच उंच निषाण.....................

सौ.विनीता ल. पाटील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काव्याला गद्याचे स्वरूप अधिक आहे. आणि क्रियापदे नसल्याने प्रत्यक ओळ ही एक वर्णनात्मक वाक्य आहे असेच वाटते.
--------गुढ हे शिर्षक पहाता आपल्याला या कवितेतून नक्की काय म्हणायचे आहे याचे स्पष्टिकरण द्याल का?

कृ.गै.न.

माझी बौद्धीक पात्रता तुम्हा सर्वांएवढी नक्कीच नाहीये..तरीही..

२१ व्या शतकातही समाजात चाललेले सर्वच स्तरांवरील गोंधळ ,अत्याचार्,भ्रष्टाचार्..फसवणूक्,जाळपोळ्,खून खटले...ई..)सफेदपोष गुंड......त्यांनी त्रस्त झलेला समाज...स्त्रिया.......या सर्वांचा मनात विच्यार आला नी ही गद्यरूप कविता मझ्या अल्पबुद्धीने मला सुचली...बर का? सुधाकरजी..................

आणि हे सर्व थाबेंल का? कि असचं युगानुयुगे चालत रहणार्?हा मला पडलेला संभ्रम....कोडं न उलगडलेल्...म्हणुन "गुढ"(मझ्यासाठी रहस्य...गुढ....)

आणि हे सर्व थाबेंल का? कि असचं युगानुयुगे चालत रहणार्? ------ तुमचा हा प्रश्न या रचनेत येतोच आहे परंतू वर्णनात्मकपणे. त्याला काहीतरी परीपुर्तता करणार्‍या ओळी अजून त्यामध्ये हव्या आहेत असे मला वाटते.

आशय छान आहे. थोडे शुद्ध लेखन. गूढ, दीक्षा, करुणाघन, निशाण पुढील लेखनास शुभेच्छा.