कुणी मला हेटाळले कुणी मला फ़ेटाळले.

Submitted by सुधाकर.. on 13 August, 2012 - 14:15

कुणी मला हेटाळले कुणी मला फ़ेटाळले.
मनासाठी विरंगुळे, मी पुस्तकात चाळले.

घर माझे इथे जेंव्हा निंदकांनीच जाळले
अनाठायी सुख माझे, त्याच वणव्यात पोळले.

अशी काय झाली आज या उजेडाला बाधा
की,तमाच्या लोभाने, दिवे सारे विटाळले.

गेल्यावर सोडून तू एकाकीच मला येथे
नभानेही चांदण्यास, गा आसवांत ढाळले.

दूर कुठे दिठीआड, सुख माझे झोपलेले
मीच माझे दु:ख इथे, चंदनाशी उगाळले.

माणसाच्या ठायी मी दैत्य जेंव्हा पाहीले
माणसाच्या स्थळी अता, जाण्याचे मी टाळले

दिली तुला दान सारी माझी मी ही जिंदगी
तरी कसे दुज्यावरीच, खुळे मन तुझे भाळले.

वागू नकोस अशी तू माणसाच्या नियतीसम
नियतीने शब्द नाही, कधी कुणाचे पाळले.

अवकाळी जाऊ नको सोडून तू एकट्याला
तुझ्यामुळे क्षणभराचे, जीवन हे गंधाळले.

जन्म गेला सारा हा, वाहूनीया पालखी
कधीतरी भेट देवा, भोयी पण भेंडाळले

आनिकंही रोजचीच व्यवहारही रोजचेच
तरी मन पांडूरंगा, तुज ठायी घोटाळले.

आसवे ही लपवूनी फिरू नको पाठमोरी
सुधाकरी मांडता मी, भाव तुझे शब्दाळले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच रे ऑर्फी ......
मात्रावृत्तात तू अधिक सहज वाटतोस अन अधिक तंत्र-निर्दोषही
मात्रा ,लय मी तपासली नाही (एक तर सवय नाहीये अन या बाबतीत मी प्रचंड आळशी आहे म्हणून )
पण एकंदर वाचताना , कानाला जास्त काही खटकत नाही आहे

फक्त काही जागी बदल असायला हवेत असे वाटले
माणसाच्या स्थायी = माणसाच्या ठायी
फिरू नको पाटमोरी= फिरू नको पाठमोरी

अभिनंदन अन शुभेच्छा रे........

वैवकु(तुझा वैभू..)

धन्यवाद वैभू ...... तू सुचवलेले बदल मला ही योग्य वाटले. दुरुस्ती केली आहे.