राजाची गोष्ट

Submitted by प्रकाश कर्णिक on 13 August, 2012 - 06:33

सांगतो एका राजाची गोष्ट :
कोण्या काळी कोण्या देशी
होता एक राजा महान
होती त्याची पत्नी बहुगुणी आणि छान
राजा होता खूप शूर
करे तो शिकार जाऊन दूर
पराक्रमाच्या त्याच्या अख्याईका
पसरल्या होत्या भरपूर
राणी होती देवाची भक्त
करे सतत उपवास
व्हावे राजाने मोट्ठे
म्हणून तिचा असे प्रयास
प्रेम होते राजाचे
आपुल्या राणी वरी अतुल्य
राणी चाही राजा वर
विश्वास असे बहुमूल्य
सारे काही सुरळीत
राज्य चालले असताना
येते एक सुंदर यक्षीण
कधी राजाच्या स्वप्नाला
होतो राजा विलक्षण मोहित
यक्षिणी च्या सौंदर्याने
त्याचे चित्त उडते सारे
भारावतो तिच्या प्रेमाने
यक्षीण म्हणते राजाला
मी तुझी कोणीही नाही
तू मोठ्ठा राजा असशील
पण आपुल्यात ना साम्य काही
ना तू कधी माझा होशील
ना होईन मी तुझी एकदा
संभ्रमात तू पडू नकोस
हे राजा तू आहेस भाबडा
राजा म्हणे माझ्या प्रिये
केले सर्वांसाठी मी भरपूर
आता आयुष्य आहे माझे मजला
सांग मी सर्वस्व देऊ का तुजला
काय करू मी जेणे करुनी
होशील माझी आज उद्याशी
सोडून देईन राज्य आणि संपदा
सतत जवळ राहीन तुझ्याशी
ती म्हणे मी आहे तेथे बरी
येईन मी तुझ्या स्वप्नात जरी
हातास तुझ्या कधी लागणार नाही
बऱ्या बोलाने राजा जा घरी
राजा झाला वेडा पिसा
पण करू शकतो का काही !
साता समुद्रा पलीकडची हि कथा
घडत असेल का अनेक घरी ?
इति सर्व यक्ष पुराण संपूर्ण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळी उठोनि ।चहा कोफ़ि घ्यावी
तशीच गाठावी । वीज़-गाडी ।।

दाती त्रुण घ्यावे ।' हुज़ूर' म्हणून
दुपारी भोजन । हेचि सार्थ ।।

सन्ध्याकाळ होता । भूक लागे तरी,
पोरा बाळान्वरी । ओकू नये ।।

निद्रेच्या खोपटी । काळ्जीची बिळे
होणार वाटोळे । होईल ते ।।

कुणाच्या पायाचा । काही असो गुण;
आपली आपण । बिडी प्यावी ।।

जेथे निघे धूर । तेथे आहे अग्नी;
आम्हि जमदग्नि । प्रेतरूपी ।। **

--------इती मर्ढेकर----